शेतकरी कर्ज माफी योजना
शेतकरी कर्ज माफी योजना

शेतकरी कर्जमाफी योजना 31 मार्च, 1997 ते 29 फेब्रुवारी, 2008 पर्यंतच्या कृषी कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली.

FDRP अंतर्गत सीमांत व छोट्या शेतकऱ्यांना कृषी कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले.

FDRP अंतर्गत एक हेक्टरपर्यंत शेती करणारा शेतकरी सीमांत शेतकरी व 1 हेक्टरपेक्षा अधिक आणि 2 हेक्टरपर्यंत शेती करणारा शेतकरी छोटा शेतकरी मानण्यात आले.

FDRP या योजनेअंतर्गत 4.29 कोटी शेतकऱ्यांना 71.680  कोटी कर्ज माफ करण्याचे लक्ष ठेवण्यात आले.

प्रत्यक्षात मात्र 2.98 कोटी सीमांत व छोट्या शेतकऱ्यांना 50. 254 कोटी रुपये व 65 .82 लाख इतर शेतकऱ्यांना 16 . 223 कोटी रुपये असे एकूण 3. 64 कोटी शेतकऱ्यांना 66.447 कोटी रुपये कर्ज माफी देण्यात आली.

FDRP योजनेत सर्वाधिक कर्जमाफी स्टेट बँक ऑफ इंडिया (7,000 कोटी रुपये) अंतर्गत देण्यात आली.

FDRP योजना व्यापारी बॅंका, क्षेत्रीय ग्रामीण बॅंका, सहकारी कर्ज संस्था व स्थानिक बँकांमार्फत राबविण्यात आली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.