शेतकरी जनता अपघात विमा योजना
शेतकरी जनता अपघात विमा योजना
  1. 2006 मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली
  1. 2009 मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले

योजनेची वैशिष्ट्ये

शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्ता रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो.

यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा कमी उतरविला असल्यास त्याच्या या योजनेशी काही संबंध राहणार नाही. या विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित केलेली पाळत प्रपत्रे कागदपत्रे वगळता अन्य कोणती कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर करण्याची आवश्यकता नाही

या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

  • लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई
  • लाभार्थ्याचे अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई
  • लाभार्थ्याच्या अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई
  • अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास 50 हजार रुपये नुकसान भरपाई

लाभार्थी पात्रतेच्या अटी व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र राज्यातील दहा ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी
  • शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा समावेश असलेल्या सातबारा किंवा 8 अ नमुन्यातील उतारा
  • ज्या नोंदीवरून अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे नाव सात-बारावर आली असेल अशी संबंधित फेरफार नोंद नमुना नंबर  6 ड
  • शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठी कडून गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद

  • अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे

विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी

  • रस्ता, रेल्वे अपघात
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणीभूत कारणांमुळे विषबाधा
  • विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
  • वीज पडून मृत्यू
  • खून
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • सर्पदंश व विंचूदंश
  • नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या
  • जनावरांचा खाण्यामुळे/ चावण्यामुळे जखमी, मृत्यू दंगल
  • अन्य कोणतेही अपघात

संरक्षणामध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी

  • नैसर्गिक मृत्यू
  • विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
  • आत्महत्येचा प्रयत्न
  • आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून देण्याच्या उद्देशाने कायद्यांचे उल्लंघन करत त्यांना झालेला अपघात
  • अमली पदार्थांच्या अंमलाखालील असताना झालेल्या अपघात
  • भ्रमिष्टपणा
  • बाळंतपणात मृत्यू
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव
  • मोटार शर्यतीतील अपघात
  • युद्ध सैन्यातील नोकरी
  • जवळच्या लाभ धारकाकडून  खून

वारसदार

  • मृत शेतकऱ्याची पत्नी मृत शेतकरी स्त्रीचा पती
  • मृत शेतकऱ्याची अविवाहित मुलगी
  • मृत शेतकऱ्याची आई
  • मृत शेतकऱ्याची मुले
  • मृत शेतकऱ्याची नातवंडे

विमा प्रस्ताव सादर करण्याची पद्धत

  • शेतकरी वारसदारांनी विमा कालावधी तलाठी यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावयाचा आहे
  • जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रस्तावांची नोंद घेऊन शासनाचे विमा सल्लागार यांच्या विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावयाचे आहेत
  • उमा सल्लागार यांच्या कार्यालयाकडून प्राथमिक छाननी होऊन तो विमा कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवावयाचा आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.