सांसद आदर्श ग्राम योजना
सांसद आदर्श ग्राम योजना

योजनेची सुरुवात जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त 11 ऑक्टोंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली.

उद्देश

  • निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायती स्थानिक विकासाच्या केंद्रात विकसित करणे
  • मानव विकासामध्ये वाढ करणे
  • प्राथमिक सोयीसुविधांमध्ये सुधारणा करणे
  • असमानता कमी करणे
  • लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदारांनी एक गाव दत्तक घेऊन काळातील व्यक्तींना प्रगत पायाभूत सुविधा आणि योग्य संधी उपलब्ध करून त्यांचा विकास करणे
  • प्रत्येक खेडे गावाचा आराखडा करून तीन बाबींवर अवलंबून असेल
  1. समाजाकडून प्रेरित विकास
  1. गरज व मागणी आधारित विकास
  2. लोक सहभागातून विकास

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक खासदारांसमोर वर्ष 2016 पर्यंत एक व वर्ष 2021 पर्यंत तीन गावांमध्ये पायाभूत विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार स्वतःचे गाव तसेच सासरवाडी चे गाव सोडून देशातील कोणत्याही गावाची निवड करू शकतात

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावाचा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि भौतिक असा संपूर्ण विकास केला जातो

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावातील शाळांना आदर्श शाळा बनविणे

संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 2024 पर्यंत पाच आदर्श गावांची निवड करून त्यांचा विकास करणे

सांसद आदर्श ग्राम योजना ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केली जाते

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासाचा समग्र दृष्टीकोन स्वीकारण्यात आल्या नाहीत निवडलेल्या गावांमध्ये कृषी शिक्षण आरोग्य पर्यावरण स्वच्छता उपजीविका इत्यादी क्षेत्रांचा विकास प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खेड्यातील लोकांमध्ये पायाभूत सुविधा विकासाबरोबर लोकसहभाग अंतोदय महिला प्रतिष्ठान लैंगिक समानता स्वच्छता सामाजिक न्याय पर्यावरण जागृती समुदाय सेवेची वृत्ती स्वयंसिद्धता आपापसातील सहकार्य शांतता व एकोपा इत्यादी मूल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे

सांसद आदर्श ग्राम योजना दृष्टिकोण

मॉडेल ग्रामपंचायत विकसित करण्यासाठी संसद सदस्यांची नेतृत्व क्षमता प्रतिबद्धता आणि ऊर्जेचा वापर करणे

स्थानिक पातळीवरील विकासासाठी लोकसहभाग जोडणे

परिणाम आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे

स्वयशी संघटना सहकारी समित्या आणि शैक्षणिक व संशोधन संस्थानांबरोबर सहभाग विकसित करणे

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत बनारस मधील जयापुर गावाची निवड करण्यात आली आहे

जयापुर बनारस पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे

जयापुर गावाची एकूण लोकसंख्या 2974 आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.