१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |1 March 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१ मार्च चालू घडामोडी

राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून,१६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.
  • राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
  • गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत, असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली, तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा

  • युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा धोका निर्माण होईल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा इशारा आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या आठवडय़ाच्या सुरूवातीला म्हटले होते की युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांचे सैन्य तैनात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या विधानाचा संदर्भ देऊन, पुतिन यांनी असा इशारा दिला.
  • रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे. पण तणाव अद्याप कायम आहे. युद्ध अद्याप थांबलेले नाही आणि युक्रेनच्या बाजूने आक्रमकताही कमी झालेली नाही. आमच्या विषयांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही. जो कोणी रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, त्याला दुसऱ्या विश्वयुद्धाहून भयंकर परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे लागेल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
  • रशियामध्ये १५ ते १७ मार्च या कालावधीत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या प्रमुख समीक्षकांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले आहे किंवा ते परदेशात राहत आहेत, तर बहुतेक स्वतंत्र माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. पुतिन यांची पुन्हा निवड होणे हे  खात्रीशीर मानले जात आहे.

‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती

  • नोकरीच्या आमिषाने रशियात गेलेले काही भारतीय तरुण रशिया-युक्रेन संघर्षात अडकले आहेत. या तरुणांची सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केला जातोय. भारतीय परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार अशा २० तरुणांची रशियन सैनिकांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न केले जातायत. रशियात असेलेल्या भारतीयांनी युद्धात सहभाही होऊ नये. तसेच युद्धाच्या क्षेत्रात जाऊन कठीण परिस्थितीत अडकू नये, असे आवाहन भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी केले आहे.

“भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत”

  • “आम्ही रशियन प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दिल्ली तसेच मॉस्कोतून आमचे या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत,” असेही जैस्वाल यांनी सांगितले. सोमवारी परराष्ट्र खात्याने याआधीच रशियाने काही भारतीयांची सुटका केली आहे, असे सांगितले होते.

“निदर्शनास आलेल्या सर्व प्रकरणांची गंभीर दखल”

  • रशिया-युक्रेन युद्धात रशियाने काही भारतीयांना सपोर्ट स्टाफ म्हणून सामील करून घेतले आहे. तसेच रशियाकडून लढण्यासाठीही या भारतीयांवर दबाव टाकण्यात येतोय, असे माध्यमांत सांगितले जात होते. त्यालाच उत्तर म्हणून “माध्यमांत चुकीचे वृत्त दिले जात आहे. रशियन सैनिकांकडून आमची सुटका करा, अशी मागणी काही भारतीयांकडून केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले होते. परराष्ट्र खात्याच्या निदर्शनास आलेल्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जात आहे. याआधीच काही भारतीयांची रशियाने सुटका केलेली आहे,” असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले.

एका तरुणाचा मृत्यू

  • दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने याआधी दिलेल्या वृत्तानुसार मूळचा सुरत येथील राहिवासी असलेल्या २३ वर्षीय हेमिल मंगुकिया या तरुणाचा रशियात क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मंगुकिया हा तरुण रशियात युक्रेनच्या सीमेवर युद्धक्षेत्रात होता. तो मदतनीस म्हणून या युद्धभूमीवर काम करत असल्याचे इंडियन एक्स्प्रेच्या या वृत्तात म्हणण्यात आले होते.

ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीसाठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्या धर्तीवर राज्य मंडळाकडून येत्या काळात ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार केला जाणार आहे.
  •  राज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तके, मार्गदर्शक साहित्याचा वापर करण्याची मुभा असते. सीबीएसईकडून ओपन बुक परीक्षा पद्धत वापरण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धत वापरून, त्याचे फायदे, तोटे, मर्यादा यांचे मूल्यमापन केल्यानंतर सीबीएसईकडून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
  • या पार्श्वभूमीवर राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाला मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळे ओपन बुक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याबाबत गोसावी म्हणाले, की ओपन बुक परीक्षा पद्धत काही पदभरती परीक्षांमध्ये वापरली जाते. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना, सूत्रे समजण्यासाठी ही परीक्षा पद्धत उपयोगी पडू शकते. त्यामुळे येत्या काळात या परीक्षा पद्धतीबाबत विचार करता येऊ शकेल.

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!

  • आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज (२९ फेब्रुवारी) विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्यामाध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आले होते २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन

  • महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.
  • दरम्यान, वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून आज आदेश देण्यात आले.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.