१० जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |10 June 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१० जून चालू घडामोडी

भारतीयांची व्हिसा प्रतीक्षा कमी करावी; अमेरिकी सिनेटरची राष्ट्राध्यक्षांना विनंती

 • भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि काँग्रेसमन मायकेल वॉल्ट्झ यांनी केली आहे.
 • अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून लोकांच्या एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्काने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते, याकडे मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले. मेनेंडेझ हे सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, तर वॉल्ट्झ हे अमेरिकेचे कायदेमंडळ असलेल्या काँग्रेसच्या भारतविषयक धोरणांकडे लक्ष देणाऱ्या हाऊस इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. या दोघांनी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र चर्चादरम्यान भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी ६०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न उपस्थित केला.
 • २१ व्या शतकातील अमेरिकेचे भारताशी असलेले आर्थिक, धोरणात्मक, सुरक्षाविषयक संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत असे मेनेंडेझ म्हणाले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असताना आपण ही समस्या सोडवण्यासाठी काय करणार आहोत, असा प्रश्न वॉल्ट्झ यांनी विचारला.
 • ही समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र विभाग परिश्रम घेत असून त्यासाठी अनेक उपाय करण्यात आल्याचे परराष्ट्र साहाय्यकमंत्री रेना बिटर यांनी मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांना सांगितले.
 • भारतामधून व्हिसासाठी नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. आम्ही या वर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार आहोत. यासाठी आम्ही अत्यंत कार्यक्षमतेने पावले टाकत आहोत.

एमपीएससी संयुक्त परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर; विद्यार्थ्यांचा ‘या’ प्रश्नांवर आक्षेप कायम

 • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही उत्तरतालिका पाहून आपल्या निकालाचा अंदाज बांधता येणार आहे.
 • आश्चर्य म्हणजे, या उत्तरतालिकेमध्ये आयोगाने पुन्हा एकदा चुकीचे प्रश्नोत्तरे दिल्याची उमेदवारांची ओरड सुरू झाली आहे. यात दोन प्रश्न चूक असून तीन प्रश्न रद्द करावे लागणार, अशी मागणी आहे. एमपीएससीच्या वतीने मागील काही वर्षांत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये चुकांचे प्रमाण वाढले आहे. शून्य चुका ही संकल्पना राहिलीच नाही असे चित्र आहे.
 • ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ही परीक्षा घेण्यात आली. त्याच्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही चुका कायम असल्याची उमेदवारांची ओरड आहे. दोन प्रश्न रद्द तर चार प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत. त्यामुळे आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतलेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट; म्हणाले, “भारताची टेक…”

 • OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या भारत भेटीतील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅम ऑल्टमन यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सॅम ऑल्टमन यांना धन्यवाद दिले आहेत.
 • ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे गेले काही दिवसांपासून भारतामध्ये आहेत. त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची देखील भेट घेतली आहे. आयआयटी दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाग घेऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.
 • गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ऑल्टमन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यावर या भेटीत कशावर चर्चा झाली हे उघड केले. ऑल्टमन म्हणाले, ” देशमसमोर असणाऱ्या संधी, त्यासाठी देशाने काय काय केले पाहिजे तसेच उतार चढाव रोखण्यासाठी जागतिक नियमनाबद्दल विचार करणे आवश्यक आहे. या विषयांवर चर्चा झाली. ” तसेच त्यांनी पुढे खुलासा केला की, पंतप्रधान मोदी यांनी AI ची क्षमता, भारतात याद्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या किंवा निर्माण केल्या जाणाऱ्या संधी व त्यासाठीचे आवश्यक असणारे नियम यावर चर्चा केली. तसेच त्यांनी या नवीन टेक्नॉलॉजीच्या नकारत्मक बाजूबद्दल देखील काही गोष्टींवर चर्चा केली.
 • तसेच या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील ऑल्टमन यांना ट्विट करून धन्यवाद दिले आहे. त्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ” ” भारताची टेक इको सिस्टीम वाढवण्यासाठी AI मध्ये खूप मोठी क्षमता आहे. तसेच ती क्षमता विशेषतः तरुणांमध्ये आहे. आम्ही अशा सर्व गोष्टींचे स्वागत करू ज्या आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देऊ शकतात.”

Reliance Jio ने एकाच वेळी लॉन्च केले ५ प्रीपेड प्लॅन्स, बरोबर मिळतेय ‘या’ अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन

 • Reliance Jio ही भारतातील एक प्रमुख आणि सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने सर्वात पहिल्यांदा आपले ५ जी नेटवर्क देशामध्ये सुरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन रीचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आता देखील कंपनीने आपले ५ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. ते प्लॅन किती रुपयांचे आहेत व त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
 • रिलायन्स जिओने गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी ‘Jio Saavan Pro’ सब्स्क्रिप्शनसह नवीन bundled प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. ग्राहकांची मोबाइल कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक सब्स्क्रिप्शनची गरज हे प्लॅन पूर्ण करतील असे कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त economictimes ने दिले आहे.
 • रिलायन्स जिओच्या पाच प्रीपेड रिचार्ज प्लॅनपैकी २६९ , ५२९ आणि ७३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि sms चे फायदे मिळतात. याची वैधता २८ दिवसांपासून ८४ दिवसांपर्यंत आहे. तर जिओच्या ५८९ आणि ७८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनुक्रमे ५६ आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि SMS ची मिळते.
 • JioSaavn Pro सबस्क्रिप्शनची किंमत सामन्यतः ९९ रुपये इतकी प्रति महिना इतकी आहे. वापरकर्ते जाहिरातीशिवाय गाणी, अमर्यादित डाउनलोड आणि अमर्यादित जिओ ट्यून्सचा आनंद घेऊ शकतात आणि चांगल्या क्वालिटीची गाणी ऑफलाईन पद्धतीने ऐकू शकतात.वरील पाचपैकी कोणत्याही प्लॅनचे रिचार्ज केल्यावर वापरकर्ते जिओ सावन डाउनलोड किंवा साइन इन करू शकतात. तसेच जाहिराती शिवाय गाणी ऐकणे सुरू ठेवण्यासाठी आपली जिओ मोबाइल नंबरच्या मदतीने म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये साइन इन करू शकतात.
 • ज्यांच्याकडे जीओचा प्लॅन आहे ते जिओ सावनवर स्विच करू शकतात. नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ App किंवा जिओच्या वेबसाइटवरून अ‍ॅक्टिव्ह करता येऊ शकतो.

आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप, विश्वचषक स्पर्धा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मने केली घोषणा

 • नुकतीच IPL 2023 ही स्पर्धा पार पडली. यावर्षीचे विजेतेपद हे चेन्नई सुपर किंग्स या टीमने पटकावले. संपूर्ण आयपीएल स्पर्धा JioCinema वर पाहता येत होती. मोफत स्पर्धा दाखवल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यापाठोपाठ आता डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने देखील आशिया काप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे मोबाइलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • डिस्नी + हॉटस्टारने या OTT प्लॅटफॉर्मने हे जाहीर केले आहे, ज्यांच्याकडे डिस्नी + हॉटस्टार असलेल्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांना या दोन्ही स्पर्धा मोफत पाहता येणार आहेत. क्रिकेट या खेळाचे लोकशाहीकरण करणे आणि भारतातील जास्तीत जास्त मोबाईल वापरकर्त्यांना ते उपलब्ध करून देणे हा कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
 • डिस्नी + हॉटस्टारचे प्रमुख साजिथ शिवनंदन यांच्या अधिकृत विधानानुसार, ” डिस्नी+ हॉटस्टार भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ओटीटी व्यवसायामध्ये आघाडीवर राहिले आहे. तसेच दर्शकांना चांगला अनुभव मिळावा म्हणून आम्ही अनेक नवीन कल्पना सुरू केल्या आहेत. त्या विविध नवकल्पनांमुळे आम्हाला आमच्या दर्शकांना खुश करता आले आहे. आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप या स्पर्धा मोबाइल वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला इको सिस्टीम विकसित करण्यासाठी मदत मिळेल. ”
 • जिओसिनेमावर आयपीएल २०२३ संपल्यानंतर आणि डिस्नी + हॉटस्टारवर WTC फायनल सुरू झाल्यानंतर दर्शक या प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला आहे. या संख्येने आधीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून जिओसिनेमाने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या क्वालिफायर २चा सामना जो मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये खेळला गेला त्यामध्ये २.५७ कोटी लोकांनी जिओसिनेमावर हा सामना पाहिला. ज्यामध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली होती.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu GhadamodiMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.