Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |10 May 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१० मे चालू घडामोडी
युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर
- Twitter ही एक सोशल मीडिया साईट आहे. याचे सीईओ ही एलॉन मस्क आहेत. मागच्या वर्षी मास्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यांतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. यापुढेही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मग ते कर्मचाऱ्यांची कपातीचा निर्णय असो, किंवा blue tick हटवण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आतासुद्धा ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ट्विटर लवकरच वापरकर्त्यांसाठी Voice आणि Video चॅट चे फीचर आणणार आहे.
- ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ही घोषणा केली की प्लॅटफॉर्म लवकरच वापरकर्त्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटिंगचे फीचर आणणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर शेअर न करता सुद्धा ट्विटरवर कोणाशीही संवाद साधता येणार आहे.
- तसेच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर काही प्रमुख फीचर्स जोडण्याची घोषणा केली.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ही स्पष्ट केले, या नवीन फीचरचा वापर करून वापरकर्ते ट्विटरवरील इतर कोणत्याही वापरकर्त्याला व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
- मस्क यांनी सांगितले एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (DMs) व्हर्जन १.० उद्या रिलीज होणार आहे. हे एन्क्रिप्शन इतके मजबूत आहे की त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी तो वापरकर्त्याच्या डीएमचा कंटेंट पाहू शकणार नाही. ट्वीटरला सुपर App बनवण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. हे नवीन व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटचे फीचर त्यांना त्यांच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाईल अशी अपेक्षा आहे.
- ट्वीटर लवकरच Inactive अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती काल मस्क यांनी दिली. ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही.
पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्येही चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटावरील बंदी हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- ‘द केरळ स्टोरी’च्या निर्मात्यांनी पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निर्मात्यांनी त्यांच्या याचिकेद्वारे तमिळनाडू सरकारला राज्यभरातील चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. तामिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. पण काही ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे, त्यांना सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी निर्मात्यांची मागणी आहे.
- ‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “आधी ते काश्मीर फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाईल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”
- दरम्यान, चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी बंदी हटवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात
- सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. आता या कंपन्यांमध्ये LinkedIn कंपनीचा देखील समावेश झाला आहे. LinkedIn कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
- LinkedIn कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के म्हणजेच ७१६ कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. तसेच कंपनी चीन-केंद्रित जॉब अॅप्लिकेशन देखील बंद करणार आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन आणि मागणीत झालेली घट यामुळे कंपनीने ही पाऊल उचलले आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे. लिंकडिनमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा महसूल वाढला असला तरी लिंकडिन कंपनी कर्मचारी कपात केलेल्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.
- LinkedIn चे सीईओ रायन रोस्लान्स्की यांनी याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले, ”कंपनीचे कामकाज अधिक चांगले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपनीला लवकर निर्णय घेण्यास मदत होईल.” कंपनीच्या सेल्स, ऑपरेशन अणि सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
- फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने २१,००० तर गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच Amazon , Meesho , Sharechat , Microsoft यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खुली निवड चाचणी? कुस्तीसाठी ‘आयओए’ नियुक्त हंगामी समिती निर्णय घेणार
- आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. सरकारच्या आदेशानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेली निवड चाचणी या संदर्भात निर्णय घेणार आहे. सध्या ही समिती खुली निवड चाचणी घेण्याचा विचार करत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा या वर्षी २३ सप्टेंबरपासून होणार आहेत. त्यासाठी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अपेक्षित आहेत. या आठवडय़ात या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
- भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमानुसार, गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा, राष्ट्रीय मानांकन, फेडरेशन चषक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंसह गुणवान कुमार कुस्तीगिरांना चाचणीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता बदलत्या चित्रानुसार हंगामी समिती सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा यांनी खुल्या निवड चाचणीची तयारी ठेवली आहे. यामध्ये महासंघाशी संलग्न सर्व राज्य संघटना आपल्या पसंतीचे मल्ल चाचणीसाठी पाठवू शकतील. अर्थात, यावर अजून निर्णय झालेला नाही. प्रशिक्षक आणि तज्ज्ञ पंचांच्या मते चाचणीसाठी वेळ कमी आहे आणि या कमी वेळेत खुली चाचणी पूर्ण होऊ शकणार नाही.
- खुली निवड चाचणी घेतल्यास महासंघाशी संलग्न २५ राज्य संघटना असून, त्यांनी तीन प्रकारांतील (पुरुष ग्रीको-रोमन, फ्री-स्टाइल व महिला) १० वजनी गटात आपल्या पसंतीचे मल्ल पाठवले, तर सहभागी स्पर्धकांची संख्या वाढणार आहे. अशा वेळी निवड चाचणी वेळेत पार पडणे कठीण आहे असे मत प्रशिक्षकांनी मांडले. या संदर्भात एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, १७ आणि २३ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी १७ ते १९ मे या कालावधीत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० ते १८ जूनदरम्यान बिश्केक येथे होईल. कुमार राष्ट्रीय शिबिराची घोषणाही लवकरच अपेक्षित आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१० मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ९ मे २०२३ चालू घडामोडी
- ८ मे २०२३ चालू घडामोडी
- ७ मे २०२३ चालू घडामोडी
- ६ मे २०२३ चालू घडामोडी
- ५ मे २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |