९ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ मे चालू घडामोडी

येत्या प्रजासत्ताकदिनी ‘नारी शक्ती’चे दर्शन, कर्तव्यपथावर केवळ महिला सैनिकांचेच संचलन होण्याची शक्यता

  • पुढल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी, अर्थात २६ जानेवारी २०२४ रोजी ‘कर्तव्य पथा’वर केवळ महिला सैनिकांचा सहभाग असलेले संचलन अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातील एका प्रस्तावावर काम सुरू असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून गेल्या मार्चमध्ये तिन्ही सेना दले, विविध मंत्रालये आणि विभागांना २०२४ च्या प्रजासत्ताक दिन संचलनाच्या नियोजनाविषयी एक अंतर्गत सूचना पाठवण्यात आली होती.

_

  • महिला सैनिकांच्या संचलनाबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आल्याचे या सूचनेत म्हटले होते. बैठकीत या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात आला असून २०२४च्या प्रजासत्ताक दिनाला केवळ महिला सैनिकांच्या तुकडय़ांचेच संचलन होईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संचलनाबरोबरच वाद्यवृंद तसेच विविध मंत्रालये आणि राज्यांचे चित्ररथ तसेच अन्य सादरीकरणांमध्ये केवळ महिलांचाच सहभाग असण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात सरकारने सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर वाढवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.

एक पाऊल पुढे

  • यंदाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये भारताने आपले लष्करी सामथ्र्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले. ‘नारी शक्ती’चे दर्शन ही मुख्य कल्पना होती. त्यात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांनी आपल्या चित्ररथांमधून ‘नारी शक्ती’ची झलक सादर केली होती. तसेच संचलनात भारतीय वायू सेनेच्या १४४ हवाई योद्धय़ांच्या तुकडीचे नेतृत्व तीन पुरुष अधिकाऱ्यांसह एका महिला अधिकाऱ्याने केले होते. आता देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी याच्या पुढे एक पाऊल टाकत कर्तव्यपथावर केवळ ‘नारी शक्ती’च अवतरण्याची शक्यता आहे.
  • Samsung कडून ChatGpt बॅन ते भारतात १४ अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी
  • सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Amazon आणि Flipkart चा समर सेल सुरू आहे. देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अ‍ॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. तसेच अनेक नवीन स्मार्टफोन लॅान्च हॉट आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्टवाचेस , फोनवर सेलमध्ये बंपर ऑफर मिळत आहेत. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी झाल्या आहेत ते जाणून घेणार आहोत.
  • केंद्र सरकारने घातली १४ Apps वर बंदी
  • देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अ‍ॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. या १४ अ‍ॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema चा समावेश आहे.
  • Samsung ही एक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी आहे. Samsang कंपनीने कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या ChatGpt , Bard आणि Bing या ai टूल्स वर बंदी घातली आहे. कर्मचाऱ्यांकडून या ai टूलवर कंपनीचे काही संवेदनशील कोड्स लीक झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याआधी इटली या देशाने एक महिन्यासाठी ChatGpt वर बंदी घातली होती.

Twitter युजर्ससाठी मोठी बातमी! लवकरच ‘ही’ अकाउंट्स होणार बंद, लॉग इन करा अन्यथा…

  • Twitter हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आहे. मागील वरशील त्यांनी ट्विटरची खरेदी केली आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. मग ते कर्मचाऱ्यांची कपातीचा निर्णय असो, किंवा blue tick हटवण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आतासुद्धा ट्विटर वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ट्वीटर लवकरच Inactive अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
  • ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही.
  • जे कोणी आपले अकाऊंट नियमितपणे वापरत नाहीत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लवकरच कमी होऊ शकते. मायक्रोब्लॉगिंग साईट असलेले ट्वीटर लवकरच कोणत्याही प्रकारची गतिविधी नसलेले अकाउंट्स हटवण्यास सुरुवात करेल.
  • जर का ट्विटर अकाऊंट कायमचे बंद होण्यापासून रोखण्यासाठी महिन्यातून किमान एकदा वापरकर्त्यांना त्यांच्या आकाऊंटमध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे असे ट्विटरचे धोरण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी नॅशनल पब्लिक रेडिओची ५२ ट्विटर अकाउंट्स अन्य कोणत्यातरी कंपनीला देण्याची धमकी दिली होती. या मागचे कारण म्हणजे त्या अकाउंट्सनी ट्वीटर फिडवर कंटेंट पोस्ट करणे बंद केले होते.
  • ट्वीटरने गेल्याच महिन्यात सेलिब्रेटी, पत्रकार आणि प्रमुख राजकारण्यांसाह हजारो लोकांच्या अकाऊंटवरुन मोफत असणारी Blue Tick काढून टाकली होती. कारण ट्वीटरने blue tick साठी पेड सब्स्क्रिप्शन सुरू केले होते. मात्र अनेकांनी त्यासाठी पैसे भरले नाहीत म्हणून कंपनीने ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला होता.

प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कारांची घोषणा, असोसिएटेड प्रेसला मानाच्या ‘सार्वजनिक सेवा पुरस्कारा’सह दोन सन्मान

  • यंदाच्या पुलित्झर पत्रकारिता पुरस्कारात ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) या वृत्तसंस्थेने आपला ठसा उमटवला आहे. एपीला मानाच्या ‘सार्वजनिक सेवा पुरस्कारा’सह दोन पुलित्झर पुरस्कार मिळाले. युक्रेन युद्धाच्या वृत्तांकनासाठी एपीला सार्वजनिक सेवेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्सला रशियाच्या घुसखोरीवरील वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • वॉशिंग्टन पोस्टचे वार्ताहर कॅरोलिन किचनर यांना त्यांनी मागील वर्षी अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताबाबत दिलेल्या निकालावर केलेल्या वार्ताकनासाठी राष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. सध्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये काम करत असलेल्या ईली सस्लोव यांना त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये केलेल्या कामासाठी फिचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • यंदा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पुलित्झर पुरस्काराच्या दोन श्रेण्यांमध्ये अंतिम फेरीत समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार समितीने रॉयटर्सचा विशेष उल्लेख केला. यात त्यांच्या नायजेरियातील मानवाधिकारांच्या उल्लंघनावर केलेल्या चार भागातील शोध पत्रकारितेचा समावेश आहे. राष्ट्रीय वृत्तांकनामध्येही रॉयटर्सच्या बालकामगाराबाबतच्या वृत्ताकनाचा अंतिम फेरीत समावेश झाला.

कुणाला कोणता पुरस्कार?

  • सामाजिक सेवा – मिस्टिस्लव चेर्नोव्ह, लॉरी हिनांट, अव्हगॅनी मलोलेटका, व्हेसेलिसा स्टेपनइन्को (असोसिएटेड प्रेस)
  • ब्रेकिंग न्यूज- दी लॉस एंजल्स टाइम्स
  • शोध पत्रकारिता- दी वॉल स्ट्रीट जर्नल
  • स्पष्टीकरणात्मक वार्ताकन- कॅटलिन डिकरसन (दी अटलांटिक)
  • स्थानिक वार्ताकन- जॉन आर्किबाल्ड, ऍशले रेम्कस, रॅमसे आर्चीबाल्ड आणि चॅलेन स्टीफन्स (एएल डॉट कॉम) आणि अण्णा वुल्फ (मिसिसिपी टुडे)
  • राष्ट्रीय वार्ताकन- कॅरोलिन किचनर (वॉशिंग्टन पोस्ट)
  • आंतरराष्ट्रीय वार्ताकन- दी न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार
  • फीचर लेखन- एली सास्लो, वॉशिंग्टन पोस्ट
  • ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी- असोसिएटेड प्रेस
  • फीचर फोटोग्राफी- क्रिस्टीना हाऊस, (दी लॉस एंजल्स टाइम्स)
  • टिप्पणी पत्रकारिता- काइल व्हिटमायर (एएल डॉट कॉम)
  • समीक्षा- अँड्रिया लाँग चू (न्यूयॉर्क मॅगेझीन)
  • संपादकीय लेखन- नॅन्सी अँक्रम, एमी ड्रिस्कॉल, लुईसा यानेझ, इसाडोरा रंगेल आणि लॉरेन कोस्टँटिनो (मियामी हेराल्ड)
  • संपादकीय व्यंगचित्रे- मोना चालबी (न्यूयॉर्क टाईम्स)

‘१७५ शतक अन् ५९६७९ धावा…’, किंग कोहली अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यात काय चर्चा झाली?

  • आयपीएल २०२३ चा ५४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. तत्पूर्वी आरसीबीचा स्क्वॉड मैदानात पोहोचला असून खेळपट्टीचा आढावा घेत असल्याचं समोर आलं आहे. पण सोशल मीडियावर संपूर्ण क्रीडाविश्वात धावांचा पाऊस पाडणाऱ्या दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची चर्चा जास्त रंगली आहे. किंग कोहली विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकचरी वानखेडे मैदानात भेट घेतली आणि दोघांमध्ये एकच चर्चा रंगली. जगातील महान क्रिकेटर्स मैदानात एकमेकांना भेटले आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इंटेरनेटवर तुफान व्हायरल झाले.
  • आरसीबीच्या आगामी सामन्याआधी संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली त्याचा आयडॉल आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरला भेटला. या खास मुलाखतीदरम्यान दोन्ही महान खेळाडू मस्ती करताना दिसले. आरसीबीकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत कोहली आणि सचिन एकमेकांना हात मिळवून गळाभेट देत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर किंग कोहली सचिनच्या कानात काहीतरी सांगत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर दोन्ही भारतीय खेळाडू हसत असल्याचं दृष्य कॅमेरात कैद झालं आहे. भारताच्या या दिग्गज फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत ५९६७९ धावा कुटल्या आहेत. तर दोघांनी मिळून १७५ शतक ठोकले आहेत.
  • आयपीएलच्या १६ व्या सीजनमध्ये या दोन्ही संघांनी त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरोधात खेळताना केली होती. ज्यामध्ये आरसीबीने ८ विकेट्सने शानदार विजय संपादन केला होता. आगामी सामन्यात रोहित शर्माची पलटण बंगळुरुला घरेलू मैदानावर हरवून मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या हेतून मैदानावर उतरेल. तर दुसरीकडे विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सीजनमध्ये त्याने १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६.५६ च्या सरासरीनं आणि १३५.१६ च्या स्ट्राईक रेटनं ४१९ धावा कुटल्या आहेत. तसंच कोहलीने सहा अर्धशतक ठोकण्याची चमकदार कामगिरी केली आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.