११ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |11 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ ऑगस्ट चालू घडामोडी

सलग तिसऱ्या वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती

  • ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकून सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा बनला. जुलैमध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर २०१७ नंतर प्रथमच फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणारा ऍथलीट म्हणून स्थान मिळवलेला रोनाल्डो, आता २०२३ इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये अव्वल आहे, जो ऑनलाइन प्रभावाचा जागतिक मार्कर आहे.
  • इन्स्टाग्राम शेड्युलिंग टूल, हॉपर एचक्यू द्वारे संकलित केलेल्या २०२३ इन्स्टाग्राम रिच लिस्टनुसार, रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. ही मोठी रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर या दिग्गजाचे जवळपास ६०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.यादीतील त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे २.६ दशलक्ष कमावतो. यामुळे फुटबॉल दिग्गज रोनाल्डो आणि मेस्सी केवळ इतर सर्व क्रीडा व्यक्तिमत्त्वांपेक्षा पुढे आहेत. तसेच गायिका सेलेना गोमेझ, रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन यांसारख्या ख्यातनाम सेलिब्रेंटींच्या देखील पुढे आहेत.
  • भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार हे फक्त दोनच खेळाडू टॉप-२० मध्ये स्थान मिळवू शकले आहेत. नेमार त्याच्या पॅरिस सेंट-जर्मेन संघातील सहकारी किलियन एमबाप्पेच्या प्रत्येक पोस्टपेक्षा जवळजवळ दुप्पट रक्कम कमावतो. हॉपर मुख्यालयाचे सह-संस्थापक, माईक बंदर यांनी प्लॅटफॉर्मवरून दरवर्षी वाढणाऱ्या वार्षिक कमाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तथापि, त्यांनी रोनाल्डो आणि मेस्सी सारख्या खेळाडूंच्या वर्चस्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की या खेळाडूंचा प्रभाव खेळपट्टीच्या पलीकडे डिजिटल क्षेत्रापर्यंत वाढत असून वैयक्तिक ब्रँडिंगची क्षमता प्रकट करते.

विराट कोहलीची 10 वी ची मार्कशिट व्हायरल, IAS अधिकाऱ्याने फोटो शेअर करत लोकांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

  • संपूर्ण क्रिकेटविश्वात धावांचा पाऊस पाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७५ शतके ठोकणारा विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता तर विराटच्या शिक्षणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. विराटची सेकंडरी बोर्ड परीक्षेची दहावीची मार्कशिट इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. आएएस ऑफिसर जितिन यादव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर विराटची इयत्ता १० वीच्या मार्कशिटचा फोटो शेअर केला आहे. मार्कशिटचा फोटो शेअर करत यादव यांनी लोकांना जबरदस्त मेसेज दिला आहे. सुंदर कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केल्याने यूजर्सने खूप चांगल्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
  • आएएस अधिकारी जितिन यादव यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर कॅप्शनमध्ये म्हटलंय की, जर नंबरच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतील, तर संपूर्ण जग या व्यक्तीला पाठींबा देत नसता. यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि जिद्दीची गरज असते. विराट कोहलीला दहावीच्या बोर्ड परीक्षेत सामान्य गूण मिळाले होते. इंग्लिश आणि सोशल सायन्समध्ये ८० पेक्षा जास्त गुण आहेत.परंतु, गणित आणि विज्ञानात विराटला ५१ आणि ५५ गुण मिळाले आहेत. परंतु, सध्याच्या घडीला विराटला मिळालेलं यश मोजण्यासाठी प्रत्येक गोष्ट छोटी वाटेल.
  • तो त्याच्या करीअरच्या अव्वल स्थानावर आहे आणि क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा विराट कोहलीसारखा क्रिकेट बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ९ ऑगस्टला शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, गुण फक्त कागदावर लिहिलेले नंबर असतात. पॅशन आणि डेडीकेशन याच महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्याशी मी सहमत आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, खऱ्या आयु्ष्यात नंबर नाही तर मेहनत कामी येते.

डॉ. आंबेडकरांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यास मान्यता

  • दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेऊन गझियाबाद येथील शिल्पशाळेतील आंबेडकरांच्या पुतळय़ाची प्रतिकृती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार ६ एप्रिल रोजी प्रतिकृतीची पाहणी करून, त्यास संमती देण्यात आली.
  • राज्य शासनाने आता गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.

अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; एकूण १३ हजार ४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले

  • अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून अद्याप ५ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाईल.मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील एकूण जवळपास १ लाख ४७ हजार जागा रिक्त होत्या आणि अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी होते.
  • तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख ७ हजार २९८ जागांसाठी एकूण १८ हजार ७०३ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १३ हजार ४ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले. ८ हजार २२५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १ हजार ७४८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ९८२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
  • मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष फेरीत २ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे. काही महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये जवळपास ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • मुंबई महानगरक्षेत्रातील काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही.पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून ते तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीपर्यंत अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस ही प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये वाढून विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाविद्यालय कधी सुरु होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

देशाच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ

  • देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात सरासरी ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे हिंदी महासागराच्या पाणी पातळीत दरवर्षी सुमारे ३.३ मिली मीटरने वाढ होत आहे. मोसमी पावसात अनियमितात वाढून एकीकडे मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पाऊस न पडणारे दुष्काळी पट्टेही वाढले आहेत. 
  • राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तरात ही माहिती दिली. देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात ०.७ अंश सेल्सिअने वाढ झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात मोसमी पावसात अनियमितता वाढली आहे. एका दिवसांत १५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • एकीकडे पावसाचे दिवस वाढले आहेत. अतिवृष्टी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे १९५१ ते २०१५ दरम्यान, भारतातील दुष्काळाची वारंवारता वाढली आहे. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी पट्टे वाढले आहेत. एकूण पर्यावरण बदल, जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून हिंद महासागरात पाणी पातळीत गेल्या अडीच दशकांत, १९९३ ते २०१७ या काळात दर वर्षी ३.३ मिलीमीटरने वाढ झाली.

युद्धासाठी सज्ज व्हा! सर्वोच्च जनरलला बडतर्फ केल्यानंतर किम जोंग उन आक्रमक

  • उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. किम जोंग उन यांनी त्यांच्या सर्वोच्च जनरलला बडतर्फ केलं आहे. त्यानंतर लष्कराला आदेश दिले आहेत की युद्धासाठी तयार राहा. तसंच किम जोंग उन यांनी शस्त्रसाठा वाढवण्याचे आणि सैन्याने सतर्क राहण्याचेही आदेश दिले आहेत.
  • उत्तर कोरियाचं सरकारी चॅनल KRT ने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी केंद्रीय लष्कर आयोगाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी उत्तर कोरियाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी काय उपाय योजना करता येतील त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी कुठल्याही शत्रू राष्ट्राचं नाव घेतलं नाही. मात्र लष्कराला सज्ज राहा असा इशारा दिला आहे.
  • KRT या वृत्तवाहिनीने एक फोटोही जारी केला आहे. या फोटोत किम जोंग उन हे दक्षिण कोरियाची राजधानी सियोल आणि त्या शेजारच्या ठिकाणांवर पॉईंट करताना दिसत आहेत. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाक सु इल यांना जनरल पदावरुन हटवून री योंग गिल यांची नवे जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाक सु इल यांना का हटवण्यात आलं याचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता री योंग गिल यांना जनरल करण्यात आल्याने ते संरक्षण मंत्री या पदावर राहणार नाहीत.
  • एका अहवालानुसार किम जोंग उन यांनी शस्त्रांची निर्मिती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. मागच्याच आठवड्यात किम जोंग उन यांनी शस्त्रांच्या कारखान्याचाही दौरा केला. मिसाइल इंजिन, तोफखाने आणि इतर हत्यारं यांचं उत्पादन वाढवा असे आदेश त्यांनी दिले आहेत.युद्धाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी तयार राहा. तसंच अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज राहा असंही किम जोंग उन यांनी सांगितल्याचं कळतं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.