१२ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१२ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |12 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ ऑगस्ट चालू घडामोडी

शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडण्यास युजवेंद्र चहल सज्ज, वेस्ट इंडिजविरुद्ध करावा लागणार ‘हा’ पराक्रम

  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी होणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो. युजवेंद्र चहल १०० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
  • युजवेंद्र चहल सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत सध्या ११व्या क्रमांकावर आहे. त्याने ७८ सामन्यात ९५ बळी घेतले आहेत. चहलला १०० बळी पूर्ण करण्यासाठी ५ बळींची गरज आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो आफ्रिदीला मागे सोडू शकतो. आफ्रिदीने ९९ सामन्यात ९८ विकेट घेतल्या आहेत. त्याने चार विकेट घेतल्यास आफ्रिदी मागे टाकण्यात यशस्वी होईल.
  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने ११७ सामन्यात १४० विकेट्स घेतल्या आहेत. टीम साऊदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज सौदीने १०७ सामन्यात १३४ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८२ सामन्यात १३० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय फिरकीपटू चहलबद्दल बोलायचे, तर तो सध्या ११व्या क्रमांकावर आहे. तो सर्वाधिक टी-२० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारने ८७ सामन्यात ९० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तुळजाभवानी एक्सप्रेस अडीच वर्षांत धावणार; सांजा, वडगाव, तुळजापूरला नवे रेल्वेस्थानक, पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला – आमदार पाटील

  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. ३० महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती. दिलेला शब्द खरा करून दाखवत तुळजाभवानी देवीच्या चरणी पंतप्रधान मोदी यांनी सेवा रूजू केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
  • धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली

  • राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली.
  • राज्याच्या बऱ्याच भागात मध्यंतरी चांगला पाऊस पडला. त्यामुळे विजेची मागणी २१ हजार ते २३ हजार मेगावॅट दरम्यान होती. परंतु, आता गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी ४ वाजता राज्यात विजेची मागणी २४ हजार ६२८ मेगावॅटवर गेली असून त्यापैकी १६ हजार २८१ मेगावॅट विजेची निर्मिती राज्यात होत होती. सर्वाधिक ६ हजार ६९२ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून केली जात होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ६ हजार १६६ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून ४८९ मेगावॅट, सौरऊर्जा प्रकल्पातून ३७ आणि इतर प्रकल्पातून वीजनिर्मिती होत होती, तर अदानीकडून २ हजार ९११ मेगावॅट, जिंदलकडून ३१५ मेगावॅट, आयडियलकडून २६१ मेगावॅट, रतन इंडियाकडून १ हजार ७० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती.
  • केंद्र सरकारच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ३१६ मेगावॅट वीज मिळत होती. यावेळी मुंबईतही ३ हजार २१९ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

डॉ. आंबेडकरांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यास मान्यता

  • दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेऊन गझियाबाद येथील शिल्पशाळेतील आंबेडकरांच्या पुतळय़ाची प्रतिकृती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार ६ एप्रिल रोजी प्रतिकृतीची पाहणी करून, त्यास संमती देण्यात आली.
  • राज्य शासनाने आता गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.