१२ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१२ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |12 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ एप्रिल चालू घडामोडी

चंद्रपूर: महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

  • ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.
  • महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते.
  • महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर, अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला. महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला. कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार मिळाला आहे.

अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूक : २० उमेदवार बिनविरोध विजयी

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जवळ येत असून नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ परस्परांसमोर ठाकले आहेत. येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राज्यभरातील ६० पैकी २० जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली. अनेक ठिकाणी नेमक्याच उमेदवारांनी अर्ज केल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी म्हटले.
  • गेली पाच वर्षे मराठी नाट्य परिषद नाट्य विश्वातील विविध उपक्रमांबरोबरच अंतर्गत वादांमुळे अधिकच चर्चेत होती. करोनाकाळात नाट्यसृष्टी ठप्प झाल्यानंतर परिषदेच्या सभासदांनी आणि पदावर असलेल्या मंडळींनी कलाकार, तंत्रज्ञांना आर्थिक साहाय्य केले होते. परंतु त्यावरूनही परिषदेमधील दोन गटांमध्ये वाद झाले.
  • अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्यभरात एकूण १०३ उमेदवार उतरले असून मतदारांची संख्या २८ हजार ३११ इतकी आहे. राज्यभरात २९ केंद्रांवर हे मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी आणि कलेच्या जपणुकीसाठी परिषदेचे आजीव सभासद आणि उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे.

भाजपला पुन्हा तीनशेहून अधिक जागा मिळतील: अमित शहा

  • पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला देशभरात तीनशेहून अधिक जागा मिळतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सलग तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी येथे केला.
  • भाजपच्या उर्ध्व आसाम क्षेत्रीय कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभानंतर झालेल्या येथील जाहीर सभेत ते बोलत होते.  आसाममध्ये भाजपला लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा मिळतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असे ते म्हणाले. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत.
  • शहा म्हणाले की, ईशान्येकडील प्रांत हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानजा जात होता. पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही त्या पक्षाला अलीकडील विधानसभा निवडणुकांत येथे यश मिळू शकले नाही. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अवमान केला आहे. त्यांनी देशाचा अवमान आणि सरकारवर खोटे आरोप करणे सुरूच ठेवल्यास ईशान्येकडे काँग्रेसची जी गत झाली, तीच संपूर्ण देशभरात होईल, अशी टीका शहा यांनी केली. काँग्रेस मोदींविरोधात जेवढी गरळ ओकेल, तेवढे भाजपचे कमळ फुलत राहील, असा दावाही त्यांनी केला.

२० एप्रिलला दिल्लीमधील ‘या’ मॉलमध्ये उघडणार अ‍ॅपलचे स्टोअर, जाणून घ्या कधीपासून करता येणार खरेदी

  • Apple ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन आणि अन्य उपकरण वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. Apple भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. Apple उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने आपले प्लांट उभे करत आहेत. फॉक्सकॉन कंपनीने तर तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता Apple भारतातील आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.
  • Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
  • भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. मुंबईमधील रिटेल स्टोअरचे लॉन्चिंग १८ एप्रिल रोजी होणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. याबाबतचे वृत्त Economic Times या वृत्तसंस्थेने दिले आहे.
  • डेटा अ‍ॅनालिटिक फर्म CRE मॅट्रिक्स द्वारे अ‍ॅक्सेस केलेल्या करारानुसार आणि इकॉनॉमिक टाइम्सने मूल्यांकन केल्यानुसार, २२ ब्रँड हे Apple च्या रिटेल स्टोअरजवळ त्यांचे शॉप्स उघडू शक्त नाहीत. तसेच त्यांची जाहिरात देखील करू शकत नाहीत. Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony, Twitter, Bose, Dell, Devialet, Foxconn, Garmin, Hitachi, HP, HTC, IBM, Intel, Lenovo, Nest, Panasonic आणि Toshiba इत्यादी ब्रँड Apple रिटेल स्टोअर ज्या ठिकाणी लॉन्च होईल तिथे आपले शॉप्स उघडू शकणार नाहीत. 

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.