Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 March 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१३ मार्च चालू घडामोडी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :शुभमनचे संयमी शतक
- India vs Australia 4th Test Seriesयुवा सलामीवीर शुभमन गिलचे संयमी शतक आणि अनुभवी विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी आपल्या पहिल्या डावात ३ बाद २८९ धावसंख्येपर्यंत मजल मारली.
- सर्व प्रारूपांत चांगल्या लयीत असलेल्या गिलने २३५ चेंडूंचा सामना करताना १२८ धावा केल्या ज्यामध्ये १२ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिलचे हे दुसरे शतक असून ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलने कर्णधार रोहित शर्मासह (५८ चेंडूंत ३५ धावा) पहिल्या गडय़ासाठी ७४, चेतेश्वर पुजारासह (१२१ चेंडूंत ४२ धावा) दुसऱ्या गडय़ासाठी ११३ आणि विराट कोहलीसह (१२८ चेंडूंत नाबाद ५९ धावा) तिसऱ्या गडय़ासाठी ५८ धावांची भागीदारी रचली. भारत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या १९१ धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहलीसोबत रवींद्र जडेजा (५४ चेंडूंत नाबाद १६) खेळत होता. दोघांनीही २० हून अधिक षटकांत ४४ धावा जोडल्या आहेत.
- भारताने पहिल्या सत्रात ९३ धावा जोडल्या. मात्र, दुसऱ्या सत्रात त्यांना केवळ ५९ धावाच करता आल्या, कारण चेंडू जुना झाल्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण जात होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने ९४ षटकानंतर नवीन चेंडू घेतला. भारताने तिसऱ्या सत्रात १०१ धावा केल्या; पण सत्रातील अखेरच्या तासात त्यांनी धिमी फलंदाजी केली. गिलला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना कोणतीच अडचण आली नाही. गिलने नेथन लायनच्या गोलंदाजीवर आपले शतक पूर्ण केले.
अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून मतदानाची सुविधा; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच प्रयोग
- कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांत ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि विकलांग यांना घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले.
- ८० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी निवडणूक आयोगाने ही सोय उपलब्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लोकांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी आमची पथके १२-ड हा अर्ज घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या वयोगटातील लोकांना मतदान केंद्रापर्यंत येण्यास आम्ही प्रोत्साहन देतो, मात्र जे लोक तेथे येऊ शकत नाहीत, ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे ते म्हणाले.
- या प्रक्रियेत गुप्तता राखली जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. ‘घरून मतदान करण्याची सोय जेव्हा असेल, तेव्हा सर्व राजकीय पक्षांना त्याबाबत कळवले जाईल’ , असेही त्यांनी सांगितले.
- उमेदवारांचे ‘केवायसी’ – विकलांग व्यक्तींसाठी ‘सक्षम’ हे मोबाइल उपयोजन (अॅप) सुरू करण्यात आले असून, संबंधित व्यक्ती त्यावर लॉगिन करून मतदानाचा पर्याय निवडू शकतात, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने ‘तुमच्या उमेदवाराला जाणून घ्या’ (केवायसी) ही मोहीमही हाती घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.
समिलगी विवाहाला केंद्र सरकारचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल
- समिलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्व वैयक्तिक कायद्यांनुसार एक पुरुष आणि एक स्त्री यांच्याच विवाहाला मान्यता आहे, असा युक्तिवाद करत केंद्र सरकारने समिलगी विवाहाला मान्यता देण्यास विरोध केला आहे.
- समिलगी विवाहाला मान्यता दिल्यास वैयक्तिक कायदे आणि स्वीकारलेले सामाजिक नियम यांच्यामधील संतुलन पूर्णपणे बिघडेल अशी भीती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे. समिलगी विवाहांना मान्यता द्यावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यासाठी न्यायालयाने केंद्राचे मत मागवले होते.
- कलम ३७७ अंतर्गत समिलगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली गेली असली तरी समिलगी विवाह हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकाकर्ते करू शकत नाहीत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. समिलगी व्यक्तींच्या विवाहाला कोणत्याही वैयक्तिक कायद्यात मान्यता नाही किंवा त्याचा स्वीकारही केलेला नाही, असा मुद्दा केंद्राने उपस्थित केला. विवाहाच्या मूळ संकल्पनेनुसार तो भिन्निलगी व्यक्तींमध्येच करायचा असतो आणि या संकल्पनेला सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर आधार आहे. न्यायपालिकेच्या हस्तक्षेपाद्वारे त्यात व्यत्यय आणला जाऊ नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
- भारतातील हिंदूू आणि इस्लाम यांसारख्या प्रमुख धर्माबरोबरच मिताक्षर, दयाभंग यांसारख्या धर्माच्या शाखांमध्ये विवाहासंबंधी असलेल्या रूढींचाही संदर्भ या प्रतिज्ञापत्रात देण्यात आला आहे.नवतेज जोहर वि. केंद्र सरकार या खटल्यामध्ये, २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने राज्यघटनेतील कलम ३७७ रद्दहबातल ठरवले. या कलमाअंतर्गत दोन प्रौढ व्यक्तींमध्ये एकांतात परस्परसंमतीने ठेवण्यात आलेले लैंगिक संबंध हा गुन्हा होता. हे कलम रद्द करताना समलैंगिकता हा गुन्हा नाही असा निर्वाळा खंडपीठाने दिला होता.
सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्याचा फटका भारतीय ‘स्टार्टअप’ना
- आधीच आटलेल्या निधीच्या समस्येचा सामना करत असलेल्या भारताच्या तंत्रज्ञानावर आधारित नवउद्यमींना (स्टार्टअप) आता सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) बुडल्याचा फटका बसू लागला आहे. सॉफ्टवेअर सेवा पुरवठा क्षेत्रातील मोठय़ा संख्येने भारतीय नवउद्यमींची खाती एसव्हीबीमध्ये आहेत. हे स्टार्टअप प्रामुख्याने अमेरिकी ग्राहक कंपन्यांना सेवा प्रदान करतात. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग हे एसव्हीबीचे सर्वात मोठे ग्राहक होते. अमेरिकेतील २००८ च्या वित्तीय संकटानंतर बुडालेली ही सर्वात मोठी बँक आहे.
- या नवउद्यमींच्या एसव्हीबीमधील खात्यांमधील रक्कम प्रत्येकी अडीच लाख डॉलरपेक्षा अधिक आहे. बँक बंद करण्याचा आदेश देणाऱ्या अमेरिकी नियामकांनी (यूएस रेग्युलेटर) संरक्षित केलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे. खात्यांमध्ये अडीच लाख डॉलरपेक्षा अधिक रक्कम असलेल्या कंपन्यांसाठी फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एफडीआयसी) यांनी एक टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्यामुळे खातेदार नवउद्यमींची चिंता कमी झालेली नाही. गेल्या वर्षांच्या अखेरीस एसव्हीबीची एकूण मालमत्ता २०९ अब्ज डॉलर इतकी होती आणि बँकेकडे सुमारे १७५ अब्ज डॉलरच्या एकूण ठेवी होत्या. ठेवीदारांना विम्याने संरक्षित ठेवी, जास्तीत जास्त अडीच लाख डॉलर, सोमवापर्यंत काढून घेता येतील असे ‘एफडीआयसी’ने जाहीर केले आहे. त्यापेक्षा जास्त निधी असलेल्या ठेवीदारांना असंरक्षित निधीसाठी प्रमाणपत्रे दिली जातील, याचा अर्थ मोठय़ा रकमा अडकलेल्या ठेवीदारांना लवकर त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता नाही.
- एका ठेवीदाराने एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीचे सुमारे २० लाख डॉलर एसव्हीबीच्या खात्यामध्ये आहेत. कर्मचाऱ्यांना पगार कुठून द्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. एसव्हीबी बुडाल्यामुळे भारतीय नवउद्यमींचे एकूण नुकसान किती झाले आहे ते येत्या सोमवारीच स्पष्ट होईल, मात्र पैसे काढता येणार नसल्यामुळे व्यवसाय चालवायचा कसा असा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. विशेषत: तरुण उद्योजक यामुळे अधिक अडचणीत येणार आहेत. केवळ स्टार्टअपच नव्हे तर तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक अतिशय श्रीमंत उद्योजकांनीही वैयक्तिक ठेवी एसव्हीबीमध्ये ठेवल्या होत्या. त्यांनाही मोठा फटका बसला आहे. आता या स्टार्टअपना कोणाकडून मदत मिळवायची हे माहीत नाही. अशीच परिस्थिती इतर देशांच्या नवउद्यमींचीही असू शकते, असे गोकुल राजाराम या ज्येष्ठ तज्ज्ञाने सांगितले.
- एसव्हीबीचे समभाग शुक्रवारी गडगडले, मात्र त्यापूर्वी गुरुवारीच अमेरिकेतील अनेक व्हेंचर कॅपिटल फंडांनी एसव्हीबीमधील समभाग काढून घेण्याचा सल्ला दिला होता. वर्षभर एसव्हीबीच्या एका समभागाची किंमत ६०० डॉलरच्या आसपास होती, ती शुक्रवारी थेट ४० डॉलरपेक्षाही खाली आली. बँकेने त्यांचे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व समभागांची १ अब्ज ८० कोटी डॉलरचे नुकसान सोसून विक्री केली, त्यानंतर नियामकांनी ही बँक ताब्यात घेतली.
रेल्वेत तिकीट ‘कन्फर्म’ तरीही आरक्षित जागेसाठी लढा कायम; रेल्वे मंत्रालय देणार का लक्ष?
- एकीकडे वंदे भारत एक्सप्रेससारख्या वातानुकूलित रेल्वेगाडीतून अत्याधुनिक सुविधा मिळायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांना त्यांच्या आरक्षित जागेवर बसण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.
- स्वदेश निगम यांचे कुटुंब १२५२२ एर्नाकुलम-बरौनी एक्सप्रेसने नागपूरहून लखनऊला निघाले होते. ही गाडी नागपुरात आली आणि निगम कुटुंबीय एस-४ मध्ये बसण्यासाठी गेले. परंतु, त्या रेल्वेडब्यात इतकी गर्दी होती की, त्यांना डब्यात चढण्यासाठी कसरत करावी लागली. त्यांच्या आरक्षित जागेवर इतर लोक बसलेले होते आणि ते तेथून उठण्यास तयार नव्हते.
- निगम कुटुंबीयांनी तिकीट तपासणीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही त्या डब्यात आले नाही. त्यानंतर निगम कुटुंबीयांना मिळेल तेथे बसून प्रवास करावा लागला. अशाप्रकारे ‘कन्फर्म’ तिकीट असूनही प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहे. विशेष म्हणजे याची कोणीही दखल घेत नाही. यासंदर्भात भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
- निगम कुटुंबीयांचे एस-४ मध्ये सहा बर्थ कन्फर्म होते. परंतु, त्यांना बसण्यास जागा मिळाली नाही. गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्यास अडथळा निर्माण होत होता. ‘टीटीई’ या रेल्वेत आले नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनीदेखील ढुंकून पाहिले नाही, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.
H3N2 Influenza : चिंतेत भर! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं नीती आयोगाने केलं आवाहन
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं महत्त्वाचं आवाहन नीती आयोगाने आता केलं आहे. भारतात H3N2 इन्फ्लुएंझा या विषाणू संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या इन्फ्लुएंझामुळे दोन जण दगावले आहेत. त्यानंतर आता देशभरात या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक बैठकही बोलावली होती. या बैठकीनंतर नीती आयोगाने सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात सर्दी, ताप, खोकला होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे.H3N2 या व्हायरसमुळे हे होतं आहे. ICMR ने ही माहिती दिली असून काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. तसंच ताप आला तर दुर्लक्ष करू नका असंही म्हटलं आहे.
- केंद्र सरकारची तातडीची बैठक : H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत करोना प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे.
H3N2 ची लक्षणं काय आहेत?
- Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १२ मार्च २०२३ चालू घडामोडी
- ११ मार्च २०२३ चालू घडामोडी
- १० मार्च २०२३ चालू घडामोडी
- ९ मार्च २०२३ चालू घडामोडी
- ८ मार्च २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |