१६ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 16 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ डिसेंबर चालू घडामोडी

नागपूरनिर्मित राफेल विमानाच्या सुटय़ा भागांचा फ्रान्सला पुरवठा:

 • राफेल या युद्ध विमानाच्या पाच वेगवेगळय़ा भागांची निर्मिती नागपूरच्या मिहानमधील कारखान्यात केली जात आहे. हे सुटे भाग केवळ भारतासाठी नव्हे तर जगभरातील राफेल विमानासाठी वापरण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत जेन मार्क सेरे शेव्हरले यांनी दिली. शेव्हरले नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दसॉल्त रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडला भेट दिली. माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील व्यापारसंबंध, गुंतवणूक यावर सविस्तर चर्चा केली.
 • मिहानमध्ये दसॉल्त रिलायन्स एअरोस्पेस लि.चा कारखाना आहे. दसॉल्त एव्हीएशन (फ्रान्स) आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि.(इंडिया) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. येथे राफेलचे कॉकपीट तयार होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, राफेलचे वेगवेगळे पाच भाग तयार केले जात आहे. ते सुटे भाग फ्रान्सला पाठवले जातात. तसेच इतर ठिकाणांहून या विमानाचे सुटे भाग फ्रान्सला आणले जातात. त्यानंतर तेथे विमानाची बांधणी केली जाते. नागपुरात तयार होत असलेले राफेलचे सुटे भाग केवळ भारतातील विमानांसाठीच नाहीतर जगभर जेथे कुठे राफेल आहेत तेथे या सुटय़ा भागांचा उपयोग केला जातो.
 • फ्रान्सकडून भारताने राफेल युद्ध विमानांची खरेदी केली. त्यावेळी झालेल्या करारानुसार भारतात त्या विमानाच्या काही भागाची निर्मिती केली जात आहे. ‘ऑपसेट क्लॉझ’ नुसार फ्रान्सच्या दसॉल्त या कंपनीने रिलायन्स कंपनीला फॉल्कन विमान, हेलिकॉप्टर, इतर उपकरणे बनवण्याचे तसेच देखभाल-दुरुस्तीचे काम दिले आहे.

शक्तिशाली ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ; बीजिंगपर्यंत मारा करण्याची आहे क्षमता: 

 • भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना, भारताने शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘अग्नि-5’ या शक्तीशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम आहे. तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे. पहिल्यांदाच हे क्षेपणास्त्र त्याच्या पूर्ण अंतरावर डागण्यात आले.
 • ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
 • संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, क्षेपणास्त्रावर नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणं वापरण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत आवश्यकता भासल्यास रेंज वाढवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केले आहे.
 • याशिवाय, नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे. अग्नि 5 क्षेपणास्त्राची उंची १७ मीटर आहे, ५० टन वजनाचे हे क्षेपणास्त्र १.५ टन पर्यंत अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. याशिवाय ध्वनीच्या २४ पेट वेगाशी हे क्षेपणास्त्र स्पर्धा करू शकते.
 • इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल(ICBM) अग्नि-5 शिवाय, अग्नि शृंखलेत भारतीय शस्त्रागारात अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3 , अग्नि-4 आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.

फ्रान्सची पुन्हा विश्वविजेतेपदाकडे कूच: 

 • फ्रान्सच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. फ्रान्सने बुधवारी मध्यरात्री झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत लढवय्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे परतवून लावले. पूर्वार्धात थिओ हर्नाडेझ (पाचव्या मिनिटाला), तर उत्तरार्धात रँडल कोलो मुआनी (७९व्या मि.) यांनी फ्रान्ससाठी निर्णायक गोल नोंदवले.
 • गतविजेत्या फ्रान्सला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रान्सच्या करीम बेन्झिमा, एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा यांसारख्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले. मात्र, अन्य खेळाडूंनी आपला खेळ उंचावत फ्रान्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आहे. आता रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत फ्रान्सपुढे लिओनेल मेसीच्या अर्जेटिनाचे आव्हान असेल.
 • मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सने आपल्या शिस्तबद्ध आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवले. या सामन्यात मोरोक्कोने ६२ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, फ्रान्सने भक्कम बचाव करताना त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करू दिल्या नाहीत.  दुसरीकडे, फ्रान्सने संधी मिळताच त्यावर गोल केले.
 • सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्सचा बचावपटू राफाएल वरानने मोरोक्कोच्या कक्षात मुसंडी मारली. त्यानंतर त्याने अ‍ॅन्टोन ग्रीझमनला अचूक पास दिला. मग ग्रीझमनने गोलकक्षात धावत आलेल्या किलियन एम्बापेकडे चेंडू दिला. मात्र, मोरोक्कोच्या बचावपटूंनी त्याच्या भोवती जात एम्बापेने मारलेला फटका अडवला. परंतु, चेंडू मोरोक्कोच्या बचावपटूच्या अंगाला लागून गोलपोस्टच्या डावीकडे उभ्या थिओ हर्नाडेझकडे गेला. हर्नाडेझने कोणतीही चूक न करता गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतर मोरोक्कोने सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न सुरू केले. ओनाहीने मारलेला फटका फ्रान्सचा कर्णधार व गोलरक्षक ह्युगो लॉरिसने अडवला. त्यानंतर ४४व्या मिनिटाला मोरोक्कोच्या एल यामिकने ‘ओव्हरहेड किक’च्या साहाय्याने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. त्यामुळे फ्रान्सची आघाडी कायम राहिली.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला यंदा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिली जाणार ‘मानाची गदा’ : 

 • राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळालेला आहे. तर आता या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अंतिम सामान्यास फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
 • ‘ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठीचे आमंत्रण दिले. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्याच हस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. यावेळी समवेत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ अध्यक्ष पै. संदीप भोंडवे आणि राष्ट्रीय तालीम संघ पुणे अध्यक्ष हिंदकेसरी पै.योगेश दोडके उपस्थित होते.’ असं मोहोळ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 • या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या अगोदर दिलेली आहे.
 • नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रतीक्षा; अमेरिकेत झालेले संशोधन मूलभूत स्वरूपाचे; शास्त्रज्ञांचे मत: 

 • अखंड आणि स्वच्छ ऊर्जेसाठी अणू केंद्रक संयोगातून (न्यूक्लिअर फ्युजन) ऊर्जानिर्मिती महत्त्वाची आहे. अणू केंद्रक संयोगाचा अमेरिकेत यशस्वी झालेला प्रयोग ही त्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचे दिसून येत असले, तरी त्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.   
 • सूर्याच्या गर्भात सुरू असलेल्या ‘अणू केंद्रक संयोग’ या प्रक्रियेची प्रयोगशाळेत पुनरावृत्ती करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करण्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया लॉरेन्स लिव्हरमूर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले. गेली काही दशके अणू केंद्रक संयोगाबाबत जगभरात मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू असताना अमेरिकेतील प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती आता दृष्टिक्षेपात आल्याचे मानले जात आहे.
 • अमेरिकेत झालेले संशोधन मूलभूत स्वरूपाचे आहे. या संशोधनात आणखी प्रयोग करून अधिक ऊर्जा विकसित झाल्यास ते फारच उपयुक्त होईल. ही ऊर्जा शाश्वत आणि स्वच्छ असल्याने इंधनाचा प्रश्न सुटेल. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संशोधनात भारताचाही सहभाग आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनातून झालेली जास्त ऊर्जानिर्मितीची  घटना उत्साहवर्धक आहे. येत्या काही वर्षांत अणू केंद्रक संयोग प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे अणुशास्त्रज्ञ डॉ. संजय ढोले यांनी सांगितले.
 •  ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन प्रोजेक्ट संलयनच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने अणुकेंद्रक संयोगासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेतील संशोधनाविषयी प्रा. रंजन म्हणाले,की अमेरिकेत झालेले संशोधन हा महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र त्याचा व्यावसायिकदृष्टय़ा वापर अद्याप शक्य नाही. या बाबत अजून बरेच संशोधन, प्रयोग होणे बाकी आहे. 

राज्यातील १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे होणार – प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारणार:

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अंतर्गत राज्यातील १० हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार आहेत.
 • शिवाय, प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास देखील मान्यता दिली गेली. याचबरोबर, विधानसभेत प्रलंबित कृषी विषयक तीनही विधेयके मागे घेण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेतला गेला.
 • राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार राज्यातील १० हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्ते बांधणीचे कामे करण्यात येणार आहेत.
 • राज्याच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण सडक विकास योजनेंतर्गत ग्रामीण भाागातील रस्ते विकासासाठी ४० हजार कि.मी.लांबीचे रस्त्यांचे काम हाती घेवून ते २०२० ते २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांनी नमूद केले होते. त्यानुसार यावर्षी सुमारे १० हजार किमी.लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ब्रिटनमध्ये Omicronचा उद्रेक; एकाच दिवसात ७८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद:

 • ब्रिटनमध्ये बुधवारी करोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. करोना महामारी सुरू झाल्यापासून देशातल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद काल ब्रिटनमध्ये झाली.
 • काल एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ७८ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. या आधीचा उच्चांक जानेवारीमध्ये नोंदवण्यात आला, जेव्हा एकाच दिवसात १० हजार रुग्णांची नोंद झाली होती. पुढील काही दिवसांत करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, असं एका वरिष्ठ ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने सांगितलं.
 • सुमारे ६७ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आता ११ दशलक्षाहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची लाट आल्याचा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.
 • तथापि, मंगळवारी जेव्हा १०० हून अधिक खासदारांनी या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरोधात मतदान केले तेव्हा त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अधिकाराला धक्का बसला.

मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी:

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती.
 • मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल.
 • ही मंजुरी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर २०२० मध्ये नीति आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. या आयोगाची स्थापना मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी, माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता, पोषण सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी करण्यात आली होती. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिलं आहे.
 • इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जेटली म्हणाले, “मला हे स्पष्ट करायचे आहे की या शिफारशीमागील आमचा तर्क लोकसंख्या नियंत्रणाचा कधीच नव्हता. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेद्वारे जारी केलेल्या अलीकडील डेटाने आधीच दर्शविले आहे की एकूण प्रजनन दर कमी होत आहे आणि लोकसंख्या नियंत्रणात आहे. त्यामागील कल्पना (शिफारशी) महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहेत.”

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज साधणार शेतकऱ्यांशी संवाद; झिरो बजेट शेतीवर देणार माहिती:

 • गुजरातमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक आणि शून्य-बजेट शेतीवर सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना संबोधित करणार आहेत. नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय तीन दिवसीय शिखर परिषद १४ डिसेंबरपासून सुरू झाली आणि १६ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.
 • दरम्यान, पीएम किसान सन्मान निधीच्या १०व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १२ कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गुजरात सरकारने नैसर्गिक शेती पद्धतींवर आयोजित केलेल्या कृषी कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ऑनलाइन संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे ५,००० शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
 • “गुजरातमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक आणि शून्य-बजेट शेतीवर सुरू असलेल्या शिखर परिषदेला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. भाजपा पंतप्रधानांचे भाषण पाहण्यासाठी शेतकऱ्यांना आमंत्रित करेल. कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल आणि तो दुपारी एक पर्यंत चालेल,” असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले.

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा – सुयश, प्रियंकाकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व:

 • जबलपूर, मध्य प्रदेश येथे २६ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ५४व्या राष्ट्रीय र्अंजक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी बुधवारी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे या स्पर्धेत अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील.
 • सोलापूर येथे झालेल्या राज्य र्अंजक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड करण्यात आली. बिपीन पाटील आणि महेश पालांडे यांच्याकडे यावर्षीही अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय महाराष्ट्र खो-खो संघटनेने घेतला आहे.
 • ’ पुरुष : सुयश गरगटे (कर्णधार), प्रतीक वाईकर, ऋषिकेश मुर्चावडे, र्मिंलद कुरपे, सागर लेंगरे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, अरुण गुणकी, सूरज लांडे, गजानन शेगाळ, राहुल सावंत, लक्ष्मण गवस, अभिषेक पवार, श्रेयस राऊळ. ’ महिला : प्रियंका इंगळे (कर्णधार), दीपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव, रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, अंकिता लोहार, पायल पवार, संध्या सुरवसे.

चंद्रपूर वन अकादमीची वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत:

 • पुण्यातील यशदाच्या धर्तीवर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून उभारण्यात आलेली वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी अर्थात वनअकादमीची भव्य व सुंदर इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ही अकादमी देशातील दुसºया क्रमांकाची सर्वोत्तम इमारत आहे. वन प्रबोधिनीचे स्थावर बांधकाम पूर्ण झाले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप इमारती ताब्यात दिलेल्या नाहीत.
 •  वनसंरक्षण कायद्यांतर्गत वनजमिनीला मुक्त करणे, महापालिकेकडून अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि इमारतीसाठी लागणारा लाकूड थेट वन विभागाकडून खरेदी करण्यात आल्याने सुमारे १७ कोटींचा निधी बांधकाम अनुदानातून वळता केला होता. त्यामुळे सदर निधीची तरतूद वन विभागाकडून करणे व सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच वन प्रबोधिनीचा परिसर ताब्यात देण्यात येणार आहे.
 • चंद्रपूर-मूल मार्गावर वनराजीक महाविद्यालयाच्या जागेवर वन प्रबोधिनी ४ डिसेंबर २०१४ मध्ये स्थापन झाली असून ही संस्था १०० टक्के शासन अनुदानावर आहे. विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांपासून प्रबोधिनीला शासन अनुदान मिळालेले नाही. या अकादमीसाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करण्याची मागणी वेळोवेळी होत असली तरी निधी अजूनही मिळालेला नाही.

शक्तिशाली ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी:

 • भारताने शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘अग्नि-5’ या शक्तीशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
 • आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम आहे.
 • तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे.
 • पहिल्यांदाच हे क्षेपणास्त्र त्याच्या पूर्ण अंतरावर डागण्यात आले.
 • ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
 • याशिवाय, नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे.
 • अग्नि 5 क्षेपणास्त्राची उंची 17 मीटर आहे, 50 टन वजनाचे हे क्षेपणास्त्र 1.5 टन पर्यंत अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
 • याशिवाय ध्वनीच्या 24 पेट वेगाशी हे क्षेपणास्त्र स्पर्धा करू शकते.
 • इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल(ICBM) अग्नि-5 शिवाय, अग्नि शृंखलेत भारतीय शस्त्रागारात अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3 , अग्नि-4 आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.
अग्नि-5

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.