१६ जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |16 June 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ जून चालू घडामोडी

‘बॅझबॉल’ची खरी कसोटी!; प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेला आजपासून प्रारंभ

  • ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक शैली अवलंबली आहे. याला ‘बॅझबॉल’ असे संबोधले जात आहे. मात्र, आता या नव्या रूपातील इंग्लंड संघाची खरी कसोटी लागणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे.  
  • मॅककलमची प्रशिक्षक आणि बेन स्टोक्सची कर्णधार म्हणून निवड झाल्यापासून इंग्लंडने १३ पैकी ११ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच या दोघांनी खेळाडूंना पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्यास सांगितल्याने इंग्लंडचे कसोटी सामने रंजक ठरत आहेत. मात्र, आता ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि नेथन लायन या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज फटकेबाजी करू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन आणि ट्रॅव्हिस हेड या ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्ध इंग्लंडचे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अली यांसारखे गोलंदाज किती यशस्वी ठरतात यावरही अ‍ॅशेसचा निकाल ठरू शकेल.
  • ऑस्ट्रेलियाने नुकतेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्येच झाला, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असेल. सध्या अ‍ॅशेसचा ‘अर्न’ही ऑस्ट्रेलियाकडे असून तो परत मिळवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.

लवकरच भारतातून बँकॉकला बायरोड जाता येणार; महामार्गाचं काम ४ वर्षांत पूर्ण होणार!

  • भारतातून बँकॉक-मलेशियाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या सर्व पर्यटकांना सध्या बँकॉकला जाण्यासाठी विमान प्रवासाशिवाय पर्याय नाही. मात्र, येत्या चार वर्षांत भारतातून बँकॉकला बायरोड अर्थात आपल्या खासगी वाहनानेही जाता येणं शक्य होणार आहे. यासाठीच्या महामार्गाचं बांधकाम सध्या वेगाने चालू असून येत्या चार वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांना बँकॉकला जाण्यासाठी विमान प्रवासावर अवलंबून राहावं लागणार नाही!

कसा असेल हा महामार्ग?

  • हा महामार्ग एकूण तीन देशांना जोडणार आहे. यामध्ये भारत, म्यानमार आणि बँकॉक या तीन देशांचा समावेश आहे. भारतातून हा महामार्ग कोलकाताहून सुरू होईल. कोलकातापासून सिलिगुडी, श्रीरामपूर, गुवाहाटी, कोहिमा आणि मोरेह मार्गे म्यानमारमध्ये जाईल. तिथून तामूमार्गे कलेवा, मंडाले आणि यांगॉनवरून थायलंडला जोडला जाईल. थायलंडमध्ये मई सॉट आणि सुखोथाईवरून तो बँकॉकपर्यंत जाईल. या महामार्गाची एकूण लांबी तब्बल २८०० किलोमीटर इतकी असेल. या मार्गाचा सर्वात मोठा हिस्सा हा भारताच्या हद्दीत असेल, तर सर्वात कमी हिस्सा थायलंडमध्ये असेल.

सध्या प्रकल्पाची स्थिती काय?

  • आजघडीला थायलंडमधील महामार्गाच्या भागाचं काम जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. म्यानमारमधील भागाचं काम नुकतंच सुरू करण्यात आलं असून येत्या दोन ते तीन वर्षांत ते पूर्ण होईल, अशी माहिती म्यानमारच्या वाणिज्य मंत्र्यांनी दिली आहे. भारतातील भागाचंही बांधकाम यादरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ वर्षांत भारतातून बँकॉकला थेट जोडणारा महामार्ग तयार होईल.

उद्योग-व्यवसाय आणि द्विपक्षीय संबंधांसाठी फायदा

  • दरम्यान, या महामार्गाचा दोन्ही देशांमध्ये पर्यटन व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी फायदा होणार असून त्याचबरोबर द्विपक्षीय व्यापारविषयक व्यवहार वाढीस लागण्यासही मदत होईल. यातून दोन्ही देशांचे सबंध अधिक चांगले होण्याची अपेक्षा दोन्ही केंद्र सरकारांनी व्यक्त केली आहे.

५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला देखील कमवता येणार पैसे, YouTube ने नियमांमध्ये केले बदल

  • सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वाप[आर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. काहींचे सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात असतात तर नवीनच सुरूवात असलेले अधिक सबस्क्रायबर्स नसतात. मात्र आता कमी सब्सक्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्ससाठी आनंदाची बातमी आहे.
  • युट्युबने आपल्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे कमी सबस्क्रायबर्स किंवा कमी फॉलोअर्स असणाऱ्या चॅनेल्सना फायदा होणार आहे. लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube ने जाहीर केले आहे की आता ५०० सबस्क्रायबर्स असणारे सदस्य देखील आता पैसे कमवण्यासाठी पात्र असणार आहेत. कारण युट्युबने १००० सबस्क्रायबर्स असण्याची मर्यादा ५०० इतकी केली आहे. युट्युबने पैसे कमवण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेमध्ये बदल केला आहे आणि लहान क्रिएस्टर्सना म्हणजेच ज्यांचे सबस्क्रायबर्स जास्त नसतील अशा चॅनेल्सला प्लॅटफॉर्मवर टिकून राहण्यासाठी व पैसे कमवण्याची संधी मिळावी यासाठी प्लॅटफॉर्मने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

_

  • तसेच युट्युबने पाहण्याचे तास (Watch Hour) मध्ये देखील बदल केले आहेत. त्याची मर्यादा ४००० तासांवरून ३००० तासांवर करण्यात आली आहे. म्हणजेच क्रिएटर्सना वर्षभरामध्ये ४ हजार ऐवजी ३००० Watch Hour पूर्ण करायचे आहे. तसेच युट्युबने जे चॅनेल्स शॉर्ट्स अपलोड करतात त्यांच्यासाठी देखील एक महत्वाचा बदल केला आहे. आता शॉर्ट्सच्या व्ह्यू (View) संध्या आता १० मिलियनवरून ३ मिलियन इतकी करण्यात आली आहे. यामुळे नवख्या किंवा कमी फॉलोवर्स असणाऱ्या क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी प्राप्त होणार आहे.
  • युट्युबने नियमांमध्ये / धोरणामध्ये केलेले बदल सध्या अमेरिका, इंग्लंड, तैवान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये लागू होणार आहेत. लवकरच ते इतर देशांमध्ये देखील लागू केले जातील. यूट्यूबच्या नवीन नियमांमुळे लहान आणि नवख्या युट्युबर्सना याचा फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या कंटेंटवर पैसे कमवण्याची संधी प्राप्त होणार आहे.
  • तथापि यूट्यूबर्सना त्यांचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि जाहिरातींचे पैसे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

२१ व्या वर्षी ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी, राजस्थानची तान्या सिंह जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत कशी पोहोचली?

  • पदवी हातात आल्यानंतर लागलीच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं सगळ्यांचंच स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न साकार होत नाही. इंटर्नशीप, अॅप्रेन्टिशिपच्या नावाखाली वर्ष-दोन वर्ष गेल्यानंतर मूळ पगार सुरू होतो. परंतु, तो पगारही अनेकदा तुटपूंजा वाटतो. त्यामुळे शिक्षण झाल्यानंतरही लागलीच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल हे स्वप्न स्वप्नच राहतं. वयाच्या २०-२१ या उमेदीच्या काळात कमी पगारात नोकरी करावी लागत असल्याने अनेक होतकरू नैराश्येत जातात. परंतु, राजस्थानात एका २१ वर्षीय तरुणीला तब्बल ४५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. वयाच्या २१ व्या वर्षी एवढं पॅकेज मिळवून तिने इतिहास रचला आहे.
  • राजस्थानच्या पिलानी येथील चिदावा रोड येथे राहणाऱ्या तान्या सिंह धाभाई हिने वयाच्या २१ व्या वर्षी ४५ लाख रुपायंच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळवली आहे. तान्या सिंह धाभाई जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत ‘टेक एम’मध्ये डेटा अॅनॅलिस्ट म्हणून ती काम करणार आहे.
  • तान्या सिंहचे वडील हजारी सिंह धाभाई गेल्या तीन वर्षांपासून जपानच्या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी राकुटेनमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते जवळपास दहा वर्षांपासून जपानमध्ये राहत असून त्यांनी अनेक जापानी कंपन्यांमध्ये काम केलं आहे.
  • लाईव्ह हिंदूस्तानच्या वृत्तानुसार, हजारी सिंह म्हणाले की, “तान्या सिंह लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने पहिल्याच प्रयत्नात BITS पिलानीमध्ये प्रवेश मिळवला होता. एवढंच नव्हे तर येथे ती टॉपसुद्धा झाली. तिने नुकतंच BITS मधून शिक्षण पूर्ण केलं असून आठवडाभरात तिला जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीकडून ऑफर मिळाली. तान्या सिंह आता जपानमधील टोकयो येथे कार्यरत आहे. तान्याची आई नीतू सिंह आणि धाकटी बहिण तियाशा सिंह याही जपानमध्ये राहतात.
  • तान्या सिंहचे वडील हजारी सिंग यांनी सांगितले की, “हार्वर्ड वर्ल्ड स्टुंडट लीडर्स प्रोग्राम आहे, यासाठी तान्याची देखील निवड झाली आहे. या कार्यक्रमात जगभरातून २०० विद्यार्थी निवडले जातात, ज्यामध्ये नामवंत उद्योगपती, अर्थतज्ज्ञ इत्यादी या निवडक विद्यार्थ्यांसोबत त्यांचे अनुभव शेअर करतात.”

बोरिस जॉन्सन यांच्याकडून पार्लमेंटची जाणीवपूर्वक दिशाभूल! ब्रिटनच्या पार्लमेंटच्या सर्वपक्षीय समितीचा अहवाल

  • ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मेजवान्या आयोजित केल्याप्रकरणी पार्लमेंटसमोर जाणीवपूर्वक असत्य कथन केल्याचा ठपका सर्वपक्षीय समितीने ठेवला.
  • करोनाकाळात लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करून या मेजवान्या आयोजित केल्या होत्या याची आपल्याला कल्पना नव्हती, असे जॉन्सन यांनी ब्रिटनच्या संसदेला सांगितले होते. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक संसदेची दिशाभूल केली, असे संसदीय समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले.
  • जॉन्सन यांनी पार्लमेंटच्या नियमांचा भंग केला आणि तसेच ते सचोटीने वागले नाहीत, अशी कठोर टीका अहवालात करण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली आहे. मात्र, समितीचे सदस्य आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत, असा आरोप करून त्यांनी काहीच दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला.
  • ब्रिटनमध्ये आणि संपूर्ण जगभरात करोनाची महासाथ असताना, २०२० आणि २०२१ साली, १० डाऊिनग स्ट्रीट येथे मेजवान्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. ब्रिटनच्या कोणत्याही पंतप्रधानांनी हाऊस ऑफ कॉमन्सची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा प्रसंग घडलेला नाही. संसद आणि जनतेसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या विषयावर जॉन्सन यांनी वारंवार असत्य कथन केले, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.