Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |17 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१७ जानेवारी चालू घडामोडी
कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात १० वर्षांसाठी नोकरभरती बंद
- सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उत्तराखंड सरकारकडुन एक नवा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर कॉपी केली, तर त्या उमेदवाराला पुढील १० वर्षांसाठी बॅन करण्यात येईल. म्हणजेच त्या उमेदवाराला १० वर्ष कोणतीही सरकारी नोकरीची परीक्षा देता येणार नाही.
- हा नवा नियम ‘अँटी कॉपींग लॉ’ म्हणून ओळखला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुस्कर सिंग धामी यांनी या नव्या नियमाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, “भरती परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या किंवा चीटिंग करून अयोग्य मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांना पुढील १० वर्षांसाठी बॅन केले जाईल. हा निर्णय UKPSC पेपर लिकनंतर घेण्यात आला आहे, या पेपर लिकमुळे सुमारे १.४ लाख उमेदवारांची ‘पटवारी लेखपाल’ परीक्षा रद्द करण्यात आली.
- सरकारी भरतीदरम्यान होणारी कॉपी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘हा देशातील सर्वात कठोर कॉपी विरोधी कायदा असणार आहे. गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे, यासह त्यांची संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे’ असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार
- स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
- उदय सामंत यांनी सांगितलं की, “डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.”
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे,” अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
‘या’ कंपन्यांनी केला सामंजस्य करार
- ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड – १२ हजार कोटींची गुंतवणूक
- हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – १६ हजार कोटींची गुंतवणूक
- आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल – १६ हजार कोटींची गुंतवणूक
- रुखी फुड्स – २५० कोटींची गुंतवणूक
- निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड – १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: नदाल, त्सित्सिपासचे संघर्षपूर्ण विजय
- रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स या प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या हंगामातील पहिल्याच ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सोमवारी स्पेनच्या अग्रमानांकित राफेल नदाल आणि ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्या फेरीत विजयासाठी झगडावे लागले. त्याच वेळी महिला विभागात अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक, जेसिका पेगुला, कोको गॉफ यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.
- पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत नदालला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने तीन तास झुंजवले. मात्र, नदालने चार सेटपर्यंत रंगलेली लढत ७-५, ३-६, ६-४, ६-१ अशी जिंकली. नव्या हंगामातील नदालचा हा पहिला विजय ठरला.ग्रीसच्या त्सित्सिपासने स्पर्धेची विजयी सुरुवात करताना फ्रान्सच्या क्विन्टिन हॅलिसचा ६-३, ६-४, ७-६ (८-६) असा पराभव केला. तसेच सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणाऱ्या सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने मार्कोस गिरोनला ६-०, ६-१, ६-२ असे सहज नमवले. सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेने चुरशीच्या लढतीत कॅनडाच्याच वासेक पोस्पिसिलवर १-६, ७-६ (७-४), ७-६ (७-३), ६-३ अशी मात केली.
- महिला विभागात अग्रमानांकित श्वीऑनटेकला पहिल्या विजयासाठी झगडावे लागले. मात्र, दोन्ही सेटमध्ये मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्वीऑनटेकने जर्मनीच्या ज्युली नेमायरचे आव्हान ६-४, ७-५ असे परतवून लावले. ही लढत १ तास ५९ मिनिटे चालली. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाने जॅकलिन क्रिस्टियनला ६-०, ६-१ असे नमवले. सातव्या मानांकित गॉफने कॅटरिना सिनियाकोव्हाचा ६-१, ६-४ असा पराभव केला.गतवर्षी उपविजेती ठरलेल्या डॅनिएल कॉलिन्सलाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. तेराव्या मानांकित कॉलिन्सने अॅना कालिस्कायाचा ७-५, ५-७, ६-४ असा पराभव केला. पहिल्या फेरीच्या निकालानंतर महिला विभागात जेसिका आणि गॉफ उपांत्य फेरीत समोरासमोर येऊ शकतात. त्याच वेळी कॉलिन्ससमोर श्वीऑनटेकचे आव्हान उभे राहू शकते. कोकोचा सामना अमेरिकन स्पर्धेची माजी विजेती एमा रॅडूकानूशी होऊ शकेल. रॅडूकानूने पहिल्या फेरीत जर्मनीच्या तमारा कोरपैशचा ६-३, ६-२ असा पराभव केला.
संरक्षण दलांत ‘अग्निपथ’ स्थित्यंतर घडवून आणेल; पंतप्रधान मोदी यांचा विश्वास
- ‘‘अग्निपथ योजना ही संरक्षण दलांना प्रबळ करण्यासाठी व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास समर्थ करण्यासाठी या दलांत स्थित्यंतर घडवणारी योजना ठरेल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. तिन्ही सशस्त्र दलांत अल्पकालीन सेवेसाठी भरतीची योजना असलेल्या ‘अग्निपथ’च्या पहिल्या तुकडीच्या ‘अग्निवीर’ जवानांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते.
- पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार मोदी यांनी सोमवारी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे अभिनंदन केले. या पथदर्शक योजनेत सहभागी झाल्याबद्दल मोदींनी अग्निवीरांची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. ही योजना महिलांना सक्षम करेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, की युवा अग्निवीर सशस्त्र दलांना अधिक तरुण व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ‘तंत्रस्नेही’ बनवतील. विशेषत: सध्याच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. सशस्त्र दलांत तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत असलेले सैनिक महत्त्वाची भूमिका बजावतील.
- पंतप्रधान म्हणाले की, ‘नव्या भारता’त नवा जोश आहे. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासह त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकविसाव्या शतकातील बदलत्या युद्धतंत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष युद्धाच्या नव्या कक्षा व ‘सायबर’ युद्धाच्या आव्हानांवरही विवेचन केले. अग्निवीरांच्या क्षमतेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची भावना व दृढसंकल्पामध्ये सशस्त्र दलांचे शौर्य प्रतिबिंबित होते. आपल्या संरक्षण दलांनी देशाचा राष्ट्रध्वज आपल्या शौर्याने नेहमीच दिमाखात उंच फडकत ठेवला आहे.
महिला ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क व्हायकॉम १८ कडे; ९५१ कोटी रुपयांची विजयी बोली
- महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पाच हंगामांसाठीचे प्रसारण हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम १८ने प्राप्त केले आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल ९५१ कोटी रुपयांची विजयी बोली लावल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. महिला ‘आयपीएल’च्या सामन्यांचे प्रसारण हक्क प्राप्त करताना व्हायकॉम १८ ने डिझ्नी-स्टार आणि सोनी यांना मागे टाकले.
- महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाला मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होण्याची शक्यता असून या स्पर्धेत पाच संघांचा सहभाग असेल. या स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने सोमवारी लिलावाचे आयोजन केले होते. जागतिक प्रसारण हक्कांमध्ये टीव्ही, डिजिटल, तसेच टीव्ही व डिजिटल एकत्रित असे तीन विभाग करण्यात आले होते. या तीनही विभागांसाठी व्हायकॉम १८ ने लावलेली ९५१ कोटी रुपयांची एकत्रित बोली यशस्वी ठरली.
- ‘‘गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची खूप प्रगती होत आहे. आता आपण आपली महिला ट्वेन्टी-२० लीग सुरू करणे हे पुढील पाऊल होते. चाहत्यांना आता महिलांचे अधिक क्रिकेट सामने पाहण्याची संधी मिळेल,’’ असे ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १६ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १५ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १४ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १३ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १२ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |