१६ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |16 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ जानेवारी चालू घडामोडी

खाशाबा जाधवांना गूगलची ‘डूडल’सह मानवंदना 

 • जगभरात आंतरजाळाचा (इंटरनेट) वापर करताना हवे ते शोधण्याचे माध्यम (सर्च इंजिन) मानल्या जाणाऱ्या ‘गूगल’ने रविवारी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करत खास ‘डूडल’ तयार करून त्यांना आगळी मानवंदना दिली.
 • स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची रविवारी ९७वी जयंती होती. ऑलिम्पिक पदक मिळवल्यापासून आजपर्यंत खाशाबा आणि त्यांची कामगिरी कायमच दुर्लक्षित राहिली. अशा वेळी जगभरात शोध माध्यमात अग्रस्थानी असलेल्या ‘गूगल’ने त्यांची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त खास ‘डूडल’ची निर्मिती केली.
 • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खाशाबांनी आपली कारकीर्द घडवली. वडिलांकडून वयाच्या दहाव्या वर्षी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केल्यावर खाशाबांनी स्वत:ला असे काही घडवले की त्यांच्या कामगिरीचा डंका सर्वदूर पोहोचला. ऑलिम्पिकचे दरवाजे त्यांना सहज उघडले गेले. सर्वप्रथम १९४८ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मात्र, तेव्हा त्यांना गादीवर (मॅट) खेळायची सवय नसल्याने त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ते स्थानही भारतीयांसाठी सर्वोत्तम होते. खाशाबांचे कौतुक झाले, पण ते स्वत: नाराज होते. पुढील चार वर्षांत त्यांनी वजन गट वाढवून कठोर मेहनत घेतली आणि १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले.
 • ऑलिम्पिक पदकानंतर खाशाबांचे कौतुक झाले. मायदेशी परतल्यावर त्यांची बैलगाडय़ांच्या ताफ्यातून मिरवणूक काढण्यात आली. पण, ज्या मल्लाने जिवंतपणी आपल्या खेळाने देशाची, राज्याची मान उंचावली, तो शासनदरबारी आजपर्यंत दुर्लक्षितच राहिला. त्यांना सन्मान मिळवण्यासाठी अनेक आंदोलने झाली आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस खाशाबांना मरणोत्तर पुरस्कार दिले गेले. अनेकदा मागण्या होऊनही खाशाबा जाधव यांना पद्मश्री हा नागरी सन्मानासाठी अजूनही दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.

रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सचा टाकले मागे; वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

 • भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद दीड शतकाच्या जोरावर श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४२ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.
 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे. हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.
 • रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात २४वी धाव घेताच केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले. डिव्हिलियर्सने वनडे क्रिकेटमध्ये ९५७७ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ९५५४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यादरम्यान त्याने डिव्हिलियर्सला मागे टाकले.
 • वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता १७व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या यादीत तो सहावा भारतीय आहे. या मालिकेत रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९५०० धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात रोहित शर्माने ४९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. रोहित त्याच्या आवडत्या शॉटवर स्क्वेअर लेगला झेलबाद झाला.
 • सामन्याबद्ल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९० धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने ३८ धावांचे योगदन दिले.

दूरस्थ मतदान यंत्राला वाढता विरोध; आज प्रात्यक्षिक

 • स्थलांतरित मतदारांसाठी तयार केलेल्या दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (आरव्हीएम) नमुन्याचे निवडणूक आयोग सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर प्रात्यक्षिक करणार आहे.
 • दरम्यान, दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव अर्धवट असून ठोस नसल्यामुळे त्याला विरोध करण्याचा निर्णय बहुतांश विरोधी पक्षांनी घेतला आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी रविवारी सांगितले.
 • काँग्रेस, जद (यू), भाकप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स व झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर दिग्विजय यांनी हे वक्तव्य केले. या मतदान यंत्राच्या प्रात्यक्षिकासाठी आयोगाने आठ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि ५७ मान्यताप्राप्त राज्य पक्षांना सोमवारी सकाळी आमंत्रित केले आहे.
 • ‘दूरस्थ मतदानाच्या माध्यमातून देशांतर्गत स्थलांतरितांचा मतदानातील सहभाग वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यात आले आहे’, असे आयोगाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यासोबत, या तंत्रज्ञानाच्या संकल्पनेचे टिपणही (कन्सेप्ट नोट) पक्षांना पाठवण्यात आले आहे.
 • दूरस्थ मतदान यंत्राला परवानगी देण्याबाबतच्या कायद्यात आवश्यक असलेल्या बदलांसारख्या मुद्दय़ांवर जानेवारीअखेपर्यंत आपली मते लेखी स्वरूपात देण्यासही पक्षांना सांगण्यात आले होते.या मुद्दयाशी संबंधित असलेल्यांशी चर्चा केल्यानंतर दूरस्थ मतदान लागू झाल्यास, स्थलांतरित मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या गृह जिल्ह्यात जाण्याची गरज उरणार नाही.
 • दूरस्थ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची मोजणी आणि त्याचे इतर राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना हस्तांतरण यांचे वर्णन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ‘तंत्रज्ञानविषयक आव्हान’ असे केले होते. दूरस्थ मतदान यंत्रांचा सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आधारावर ‘मजबूत, चूक न होणारे आणि स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा’ म्हणून विकास केला जाईल आणि ते इंटरनेटशी जोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी आर’बोनी गॅब्रिएल नेमकी आहे तरी कोण 

 • जगभरातील ८४ स्पर्धकांना मागे टाकत यूएसएच्या आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने ७१ व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले आहे. गॅब्रिएलच्या रूपात जगाला नवी मिस युनिव्हर्स मिळाली आहे. १५ जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिव्हर्स किताब जाहीर करण्यात आला.
 • भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले. व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल पहिली तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ दुसरी उपविजेता ठरली. तर, भारतीय दिविता रायने टॉप १६ मध्ये स्थान मिळवले.
बोनी गॅब्रिएल

आर’बोनी गॅब्रिएल नेमकी आहे तरी कोण? 

 • आर’बोनी गॅब्रिएलचा जन्म सॅन अँटोनेयो, टेक्सास येथे २० मार्च १९९४ रोजी झाला. ती रेमिजिओ बोनझोन उर्फ आर. बोन गॅब्रिएल यांची मुलगी आहे जे मूळचे फिलिपियन आहेत. जे नंतर अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. त्यांच्या आईचे नाव डाना वॉलकर आहे, ज्या की अमेरिकन आहेत.
 • गॅब्रिएल ही अमेरिकेतील ह्यूस्टन टेक्सासची रहिवासी आहे. अन्य गॅब्रिएलने २०२२ मध्ये मिस टेक्सासचा किताब जिंकून इतिहास रचला होता. ती मूळ फिलिपीन्स असणाऱ्यांपैकी पहिली अमेरिकन होती जिने हा किताब जिंकला होता. इतकंच नाही तर आर बोनी गॅब्रिएल ही एक प्रोफेशनल फॅशन डिझायनरदेखील आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून तिने शिवणकाम सुरू केले होते. यानंतर तिने आपल्या छंदाला अनुसरून शिक्षण घेतले आणि २०१८ मध्ये यूनिवर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास येथून फॅशन डिझाइनमध्ये पदवी मिळवली.
 • फॅशन डिझायनिंगसोबतच आर बोनी गॅब्रिएलने मॉडेलिंगमध्येही आपला करिष्मा दाखवला आहे. मिस युनिव्हर्स होण्याअगोदर आर बोनी गॅब्रिएलने मिस यूएसचा किताबही जिंकला आहे.

भारतीय वंशाचे रो खन्ना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

 • अमेरिकी काँग्रेसचे भारतीय वंशाचे सदस्य रो (रोहन) खन्ना हे कॅलिफोर्नियातून सेनेटवर निवडून जाण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती खन्ना यांनी दिली आहे. खन्ना यांचा हेतू भविष्यात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा आहे, अशी चर्चा वेगवेगळय़ा राज्यांतील डेमोक्रॅट सदस्यांमध्ये आहे.
 • ४६ वर्षीय खन्ना यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, २०२८ मधील किंवा त्यानंतरची अध्यक्षीय निवडणूक लढण्याचा पर्याय खन्ना यांच्यासाठी खुला आहे. पण त्यांच्या नजीकच्या काही लोकांच्या मतानुसार, जर विद्यमान अध्यक्ष जो बायडेन (वय ८० वर्षे) ही निवडणूक लढण्यास उत्सुक नसतील, तर २०२४ मध्येच खन्ना   स्पर्धेत असतील. पॉलिटिको या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
 • खन्ना हे कॅलिफोर्नियाच्या सतराव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे २०१७ पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या शक्यतेचा त्यांनी स्वत: मात्र इन्कार केला आहे.  पण २०२२ च्या आधी आणि नंतरच्या प्रचारसत्रात खन्ना यांनी त्यांचा जिल्हा असलेल्या सिलिकॉन व्हॅली आणि संभाव्य सेनेट मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च केला आहे.
 • सेज स्ट्रॅटेजीजचे स्टॅसी वॉकर म्हणाले की, आयओवामध्ये खन्ना यांनी अनेक हेतूंनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी एक अध्यक्षीय निवडणुकीची तयारी हा असू शकतो.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.