Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 11 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
११ जानेवारी चालू घडामोडी
टीम इंडियाने रचला नवा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियाला मागे टाकत बनला जगातील पहिलाच संघ:
- भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटीत खेळला जातोय. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ३७४ धावांचे लक्ष्य दिले. या बरोबरच भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम रचला आहे.
- भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध एक मोठा कारनामा केला आहे. टीम इंडियाने विक्रमी ९व्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक धावा केल्या. भारताने या विक्रमाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाला हा कारनामा भारताविरुद्ध केला आहे.
- श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या – गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकात ७ गडी गमावून ३७३ धावा केल्या. भारताच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या आहेत. आता हा नवा विश्वविक्रम झाला आहे.
- ऑस्ट्रेलियाला टाकले मागे – यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नावावर नोंदवला गेला होता, ज्याने भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा ३५० हून अधिक धावा केल्या होत्या. परंतु आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेविरुद्ध नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ११३, रोहित शर्माने ८३, शुबमन गिलने ७० आणि केएल राहुलने ३९ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाइन द्वितीय यांचे निधन
- ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाइन द्वितीय यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. यादरम्यान, त्यांना अनेकवेळा रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रॉटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
- कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे माजी राजा किंग पॉल आणि राणी फ्रेडरिका यांचे पुत्र होते. १९६४ मध्ये राजा किंग पॉल यांच्या मृत्यूनंतर कॉन्स्टंटाइन द्वितीय यांना राजा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, २१ एप्रिल १९६७ रोजी लष्करी उठावानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं. काही महिन्यांनंतर त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची कारकीर्द ग्रीसच्या इतिसाहातील सर्वात अशांत कालखंडांपैकी एक मानली जातो.
- दरम्यान, १९७४ मध्ये कोन्स्टँटिनोस कॅरामॅनलिस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता सरकारने घेतलेल्या जनमत चाचणीत ग्रीक नागरिकांनी दुसऱ्यांना राजेशाही नाकारली आणि कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे शेवटचे राजा ठरले. त्यानंतर अथेन्सने त्यांचे नागरिकत्वदेखील काढून घेतले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला आहे.
- वित्त विभागाने याबाबतचा आदेश प्रसृत केला आहे. त्यानुसार १ जुलै २०२२ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे.
- महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.
नोकरभरतीतील अडथळे दूर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा
- राज्यात सुरू केलेल्या नोकर भरतीतील त्रुटी तपासून त्या दूर करण्याकरिता मुख्य सचिवांची समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला केल्याचे समजते.
- सरकारने काही दिवसांपुर्वी ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व विभागाला नोकर भरतीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच नोकर भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारने दोन कंपन्यांची निवड केली होती. ग्रामविकास विभागातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील जागासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून काही लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत.
- मात्र या कंपंन्यांची राज्यातील सर्व जिल्ह्यात केंद्र नसल्यामुळे ग्रामविकास विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. यातच १५ लाखांच्या आसपास अर्ज आल्याने या कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याचे पुढे आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची समिती नेमण्याची सूचना सरकारने केल्याचे समजते.
आरोग्य वार्ता – जागतिक स्तरावर करोना लसीकरणात वाढ:
- जागतिक स्तरावर करोना लसीकरणात मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ७५.२ टक्के लसीकरण झाले होते, तर २०२२ मध्ये ७९.१ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. विशेष म्हणजे २३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
- स्पेनमधील बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी या संस्थेने हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास देशांमधील व्यापक परिवर्तनशीलता आणि लससंकोच सोडवण्यासाठी अनुकूल संवाद धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतो.
- २३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असले तरी आठ देशांमध्ये मात्र लस स्वीकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या देशांमध्ये विशेषत: तरुणच वर्धक मात्र घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असे अभ्यासात म्हटले आहे. ‘नेच मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. हा डाटा मिळविण्यासाठी या संस्थांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने २०२० पासून २३ उच्च लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सर्वेक्षणांची मालिका सुरू केली, ज्यांना साथीच्या रोगाचा जोरदार फटका बसला.
- ब्राझील, कॅनडा, चीन, इक्वेडोर, फ्रान्स, जर्मनी, घाना, भारत, इटली, केनिया, मेक्सिको, नायजेरिया, पेरू, पोलंड, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, तुर्कस्तान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हा डाटा मिळविण्यात आला आहे.
–
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
११ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १० जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ९ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ८ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ७ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ६ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |