९ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 9 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ जानेवारी चालू घडामोडी

टाटा खुली महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीवर तीन सेटमध्ये विजय: 

  • नेदरलॅंड्सच्या टॅलन ग्रीक्सपूरने अत्यंत चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीचे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावताना टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. ग्रीक्सपूरचे कारकीर्दीमधील एटीपी २५०च्या मालिकेतील हे पहिलेच विजेतेपद ठरले. दुहेरीत बेल्जियमची सॅण्डर गिले-जोरान व्लिजेन जोडी विजेती ठरली.
  • म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम लढतीत ग्रीक्सपूरने वेगवान सव्र्हिसच्या जोरावर फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीचे आव्हान ४-६, ७-५, ६-३ असे मोडून काढले. ही लढत २ तास १६ मिनिटे चालली. अंतिम लढतीत भारताचा खेळाडू नसतानाही पुणेकर टेनिस चाहत्यांनी दोन्ही खेळाडूंना दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.
  • वेगवान आणि अचूक सव्र्हिस हेच ग्रीक्सपूरच्या विजयाचे वैशिष्टय़ राहिले. बोन्झीने दहाव्या गेमला ब्रेकची संधी साधून पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटला ११व्या गेमला ब्रेकची संधी साधून ग्रीक्सपूरने आघाडी घेतली आणि नंतर १२व्या गेमला आपली सव्र्हिस राखत दुसरा सेट जिंकला. एक सेटच्या बरोबरीनंतर तिसऱ्या सेटला ग्रीक्सपूर अधिक आत्मविश्वासाने आणि आक्रमक खेळला. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला आणि शेवटी नवव्या गेमला ब्रेकची संधी साधून ग्रीक्सपूरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
  • ग्रीक्सपूरने लढतीत १७ बिनतोड सव्र्हिस केल्या. बोन्झीनेदेखील ११ बिनतोड सव्र्हिस करताना आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचूकतेच्या आघाडीवर ग्रीक्सपूरने बाजी मारली. ग्रीक्सपूरला संपूर्ण लढतीत ब्रेकच्या सात संधी मिळाल्या. त्यापैकी ग्रीक्सपूरने तीन संधी साधल्या. बोन्झीला चारच संधी मिळाल्या. त्यापैकी त्याने एकच संधी साधली.

मतदानाच्या पंधराव्या फेरीत यश; डेमोक्रॅटिक उमेदवार चार मतांनी पराभूत,अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी मॅकार्थी: 

  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी केव्हिन मॅकार्थी यांची निवड झाली. या पदासाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या ऐतिहासिक १५ व्या फेरीत त्यांना हे यश मिळाले. यामुळे या संदर्भातील देशातील दीर्घकाळ निर्माण झालेला राजकीय पेच संपला.५७ वर्षीय मॅकार्थीनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ८२ वर्षीय नॅन्सी पलोसी यांच्याकडून सूत्रे घेतली. ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर पलोसी यांनी सभागृहातील आपले बहुमत गमावले होते.
  • या मध्यावधी निवडणुकीत ४३५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाने २२२ जागा जिंकल्या होत्या. तर डेमोक्रॅटिक पक्षाने २१२ जागा जिंकल्या होत्या.सभागृह अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाच्या पंधराव्या फेरीत मॅकार्थी यांना २१६ मते मिळाली, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ५२ वर्षीय हकीम सेकौ जेफरीज यांना २१२ मते मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांपैकी सहा कथित बंडखोरांनी मॅकार्थी यांना मतदान केल्यानंतर बहुमताच्या जादूमय आकडय़ाला ते स्पर्श करू शकले.
  • मॅकार्थी हे अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह)चे ५५ वे अध्यक्ष असतील. मतदानाच्या १५ व्या फेरीअखेर मॅकार्थी यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. या पदासाठीची ही सर्वात दीर्घकाळ चाललेली निवडणूक आहे. अमेरिकेच्या इतिहासात १८५५ मध्ये सर्वात दीर्घकाळ म्हणजे दोन एक निवडणूक झाली. त्यात मतदानाच्या १३३ फेऱ्या झाल्या होत्या.
  • चिनी साम्यवाद लक्ष्य : मॅकार्थी यांनी अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या संबोधनात प्रतिनिधीगृहास सांगितले की ते सार्वजनिक कर्जाच्या मुद्दय़ाकडे लक्ष देतील आणि सभागृहात ‘चिनी साम्यवादी पक्षाच्या उदया’विषयी चर्चा करेल. या प्रश्नांवर सभागृहात एकमत असले पाहिजे. परस्परांवर विश्वास टाकण्याची ही एक संधी आहे.
  • तडजोडीतून पद : सिनेटचे नेते चुक शुमर यांनी म्हटले आहे की, मॅकार्थीचे स्वप्न अमेरिकी जनतेसाठी दु:स्वप्न ठरू शकते. मॅकार्थीनी रिपब्लिकन पक्षाच्या छोटय़ा घटकांसमोर गुडघे टेकले आहेत. या तडजोडीत केव्हिन मॅकार्थीनी त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी कोणत्याही सदस्याला मतदान करण्याची मुभा देण्यास मान्यता दिली असल्याचे बोलले जात आहे.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन, शिवशक्ती संघांना जेतेपद: 

  • बंडय़ा मारुती सेवा मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या बाबुराव चांदेरे फाऊंडेशन पुरुष गटात, तर मुंबई शहरच्या शिवशक्ती संघाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. स्वस्तिकचा आकाश रूडले पुरुषांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. तर, शिवशक्तीची अपेक्षा टाकळे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
  • ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाचा प्रतिकार ३५-१९ असा सहज मोडून काढत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटांतच स्वस्तिकवर लोण देत १०-०१ अशी आघाडी घेतली. 
  • पण, स्वस्तिकने देखील त्यानंतर जशास तसे उत्तर देत हा लोण फेडत ही आघाडी ११-१२ अशी कमी केली. मध्यंतराला १५-१३ अशी फाऊंडेशनकडे आघाडी होती. दुसऱ्या डावात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने आपला खेळ अधिक गतिमान करीत आणखी दोन लोण स्वस्तिकवर चढविले. दुसऱ्या डावात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने २३ गुणांची कमाई केली तर, स्वस्तिकला अवघे सहा गुण मिळविता आले.
  • महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ३९-१८ असा सहज पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले. धारदार चढाया व भक्कम पकडी करीत शिवशक्तीने पूर्वार्धातच प्रतिस्पध्र्यावर तीन लोण चढवीत ३१-०९ अशी भक्कम आघाडी घेतली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या शिवशक्तीने सामना लीलया आपल्या बाजूने झुकवला.

सूर्यकुमार यादवचा नवा विश्वविक्रम: ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज: 

  • भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ९१ धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
  • सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय ३ शतके झळकावता आलेली नाहीत.
  • भारताचा मिस्टर ३६० डिग्री बॅटर म्हटल्या जाणार्‍या सूर्यकुमार यादवच्या आधी जगात असे फक्त चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत, परंतु हे सर्व खेळाडू सलामीला खेळताना शतक झळकावण्यात यशस्वी ठरले आहेत. पण सूर्यकुमार यादवने दोनदा चौथ्या क्रमांकावर आणि एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावले आहे.
  • सर्वात जास्त शतके – भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. सूर्या आता ३ शतकांसह दुसऱ्या तर केएल राहुल २ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट; दिल्लीत पारा १.९ अंश सेल्सिअसवर, रेल्वे-विमान वाहतूक विस्कळीत: 

  • देशाच्या उत्तर व पूर्व भागात रविवारी धुक्याची दाट चादर पसरली होती. दिल्लीसह मैदानी प्रदेशात सध्या तीव्र थंडीची लाट आली आहे. या भागात किमान तापमान १.९ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्यामुळे ४८० रेल्वेगाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी दिल्लीतील किमान तापमान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बहुतांश ठिकाणांपेक्षा कमी होते. 
    रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे ३३५ रेल्वेगाडय़ांना विलंब झाला. ८८ रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या. ३१ रेल्वेगाडय़ांचा वाहतूक मार्ग बदलण्यात आला, तर ३३ रेल्वेगाडय़ांचा प्रवास त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानाच्या आधीच थांबवण्यात आला.
  • विमानप्रवाशांना विमान वाहतुकीच्या ताज्या माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुमारे २५ विमानांच्या उड्डाणास विलंब झाला.भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे भटिंडा व आग्रा येथे दृश्यमानता शून्य मीटर आणि पतियाळा, चंडीगढ, हिस्सार, अलवर, पिलानी, गंगानगर, लखनौ, कूचबिहार आणि अमृतसर, लुधियाणा, अंबाला, भिवानी येथील दृश्यमानता २५ मीटपर्यंत घसरली.
  •  पालम (दिल्ली), फुर्सतगंज, वाराणसी, मेरठ, गया आणि धुबरी येथे ५० मीटपर्यंतचे दिसू शकत होते. हरियाणातील रोहतक, दिल्लीतील सफदरजंग, रिज आणि अयानगर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बहराइच आणि बरेली, बिहारमधील भागलपूर, पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि जलपायगुडी व आसाम, मेघालय त्रिपुरातील अनेक ठिकाणी २०० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे रोहित पवारांकडे:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आ.रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.
  • त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले.
  • महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
  • निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली.
रोहित पवार

सूर्यकुमार यादवचा नवा विश्वविक्रम:

  • भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-20 सामना खेळला गेला.
  • या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 91 धावांनी पराभूत केले.
  • त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
  • भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
  • सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण केले.
  • असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला.
  • त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय 3 शतके झळकावता आलेली नाहीत.
  • भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
  • आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.