१५ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१५ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |15 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१५ जानेवारी चालू घडामोडी

महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा:

  • पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
  • नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले.
  • दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली.
  • भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
  • राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो. आता ते मानधन 20 हजार करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घोषित करूया.
  • हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो, ते आता 15 हजार रुपये मानधन हे देण्याच निर्णय या ठिकाणी जाहीर केलं.

शमन पर्यायाने हरितगृह वायू उत्सर्जन घटवणे शक्य:

  • जागतिक स्तरावर विविध प्रकारचे शमन पर्याय लागू केल्यास हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने काढला आहे.
  • जगातील सुमारे एक चतुर्थाश वीज नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्पांमधून निर्माण होते.
  • यामुळे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामानबदलावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.
  • नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्प सुमारे दहा टक्के ऊर्जासंबंधित उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
  • आता मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने देशानुसार उत्सर्जनाचे प्रमाण मोजण्यासाठी जगभरातील 108 देशांची माहिती जमविली आहे.
  • वायूवर चालणाऱ्या ऊर्जेच्या जीवनचक्रातून एकूण जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी 3.6 अब्ज टन आहे.
  • तसेच जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या शमन पर्यायांची अंमलबजावणी केल्यास सुमारे 71 टक्क्यांनी हे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते, असा निष्कर्ष या चमूने काढला.
  • अधिक कार्यक्षम वनस्पतींद्वारे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी केले जाऊ शकते.
  • अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया आणि जपान, हे देश जगभरातील सर्वात मोठे गॅस उत्पादक आणि ग्राहक आहेत.

अ‍ॅल्युमिनिअम उद्योगातील कचऱ्यापासून क्ष-किरण विरोधी टाईल्सची निर्मिती:

  • देश- विदेशात अ‍ॅल्युमिनिअम- स्टिल उद्योगातून निघणाऱ्या कचऱ्याची (लाल गाळ) विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे.
  • या कचऱ्यावर भोपाळच्या सीएसआरआय- अ‍ॅडव्हान्स मटेरियल अ‍ॅन्ड प्रोसेस रिसर्च इन्स्टिटय़ूटने (सीएसआयआर- एम्प्री) संशोधन करत क्ष- किरण विरोधी टाईल्स तयार केली.
  • ही टाईल्स एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणी यंत्राच्या खोलीत लावणे फायदेशीर आहे.
  • या संशोधनाला स्वामित्व हक्कही मिळाले आहे.
  • नागपुरातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सीएसआईआर- एम्प्रीतर्फे ही टाईल्स प्रदर्शनात ठेवली होती.
  • भारतातही अ‍ॅल्युमिनिअम व स्टिल उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून आपला देश लाल चिखल तयार करणाऱ्या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
  • या चिखलाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भोपाळच्या सीएसआईआर- एम्प्री संस्थेने संशोधन सुरू केले.

शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी:

  • पुण्यात शनिवार 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली.
  • यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
  • महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे.
  • तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.