१४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |14 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१४ जानेवारी चालू घडामोडी

ब्रिटन नव्हे तर ‘या’ देशाचा पासपोर्ट आहे सगळ्यात पॉवरफुल; भारताचा नंबर कितवा?

 • देशाबाहेर प्रवास करायचा असेल तर आपल्याला पासपोर्टची गरज भासते. सर्व देशांमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल आहे, म्हणजे कोणत्या देशाचा पासपोर्ट असेल तर जास्तीत जास्त देशांमध्ये फिरता येते? याचे उत्तर आहे जपान. पासपोर्ट जपानचा असेल तर 193 देशांत व्हिसा-फ्री एन्ट्री मिळते. ‘हेनली पासपोर्ट इंडेक्स’नुसार ही क्रमवारी ठरवण्यात येते. या यादीत पाहिला क्रमांक मिळवण्याचे जपानचे हे सलग पाचवे वर्ष आहे. या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे जाणून घ्या.
 • या क्रमवारीमध्ये सिंगापूर आणि साऊथ कोरिया यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्यानंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग यांचे नाव आहे. तर या यादीत सर्वात शेवटी अफगाणिस्तानचे नाव आहे.
 • पासपोर्टधारक व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणाऱ्या देशांच्या संख्येनुसार ही क्रमवारी ठरवली जाते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडुन मिळालेल्या डेटावरून ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ही क्रमवारी ठरवतात. या १०९ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ८९ वा आहे.

अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरकपातीस सुरुवात, भारतात १००० जणांची नोकरी जाण्याची भीती

 • ट्विटर, मेटा या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता अ‍ॅमेझॉन कंपनीतही मोठी कर्मचारी केली जात आहे. या कर्मचारी कपातीची अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जासी यांनी पुष्टी केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण १८००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. भारतातही या प्रक्रियेस सुरुवात झाली असून मिळालेल्या माहितीनुसार भारतात एकूण १००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे.
 • अ‍ॅमेझॉन कंपनीत कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. या निर्णयांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यता आला आहे, ते आता इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी ट्विटर तसेच LinkedIn वर तशा पोस्ट केल्या असून नव्या नोकरीच्या शोधात आहोत, असे सांगितले आहे. भारतातही ही कर्मचारी कपात केली जात आहे. भारतातील बंगळुरू, गुरुग्राम तसेच अन्य कार्यालयांतून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे. यामध्ये फ्रेशर्स तसेच कामाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
 • कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केल्याचा निर्णय मेलद्वारे सांगितला जात आहे. तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तुमच्या टीम लिडरची भेट घ्या. तसेच तुमच्या नोकरीची नेमकी काय स्थिती आहे याबाबत त्यांच्याकडून जाणून घ्या, असे या मेलद्वारे सांगण्यात येत आहे. तसेच याच मेलमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांचे सेपरेशन पगार (Separation Payment) देण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांच्या विधवांसाठी वेगळी पेन्शन योजना नाही; संजय गांधी निराधार योजनेतूनच अर्थसहाय्य

 • शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांसाठी कोणतीही शासकीय पेन्शन योजना नाही. अशा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजार रुपये अर्थसय्य्य केले जात आहे.
 • राज्यात जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सुमारे एक हजार ८७५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. विभागामार्फत दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या किंवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असलेल्या किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अंपगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात प्रमस्तिष्कघात, एडस, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त यांना संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये  अर्थसहाय देण्यात येते. या योजनेतील ज्या लाभार्थ्यांला एक अपत्य असेल त्या विधवा महिलेला ११०० रुपये आणि दोन अपत्य असलेल्या विधवा महिलेला १२०० रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
 •  जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सुमारे एक हजार ८७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
 • राज्यात २०१५ नंतरपासून सुमारे १५ हजार शेतकरी विधवा आहेत. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत महिन्याला एक हजार रुपये दिले जातात. परंतु एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ २६ टक्केच महिला या अनुदानासाठी अर्ज करू शकल्या आहेत. त्यापैकी ४७ टक्के महिलांनाच अनुदान मिळू शकत आहे. तसेच या महिलांना स्वंतत्र रेशनकार्डची मुभा असून केवळ ३४ टक्के आत्महत्याग्रस्त महिलांचे नाव अद्यापही स्वतंत्र रेशनकार्डवर नाही, अशी माहिती मकान किसान अधिकारी मंच या संस्थेने केलेल्या अभ्यासातून पुढे आली. ६५ टक्के विधवा महिलांची संपत्ती, घर, शेजजमिनीचे हक्क देखील डावलले जातात. त्यामुळे प्रतिकूल व हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकरी विधवांचे पुनवर्सन करण्यासाठी शासकीय पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणी.

ट्वीटरला पुन्हा दणका! मार्केटिंग कंपनीचे पैसे भरले नाहीत, एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ

 • ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका मार्केटिंग फर्मने ट्विटर कंपनीविरोधात खटला दाखल केल्याने एकच खळबळ उडालीय. सॅन फ्रान्सिस्को येथील एका कार्यालयाच्या भाड्याचे पैसे न दिल्याने ट्विटर कंपनीवर यापूर्वीही खटला दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ट्विटरला मोठा दणका बसला आहे. कारण सॅन फ्रान्सिस्को येथील कॅनरी मार्केटिंग फर्मने ट्विटर कंपनीवर त्यांचे शुल्क न भरल्याचा आरोप केला आहे. या कंपनीने ट्विटरवर जवळपास ३.१९ कोटी रुपयांसह व्याजाचे पैसे थकवल्याचा आरोपाखाली खटला दाखल केल्याचं समजते.
 • बिझीनेस इनसायडरने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने या मार्केटिंग फर्मच्या कराराचे उल्लंघन केल्याने तसेच शुल्क न भरल्याने ६ जानेवारीला ट्विटरविरोधात खटला दाखल करण्यात आला. दिग्गज मार्केटिंग एजन्सी असलेल्या कॅनरा मार्केटिंग फर्मने ट्विटरव कायदेशीर कारवाई करण्यसाठी पावलं उचलली आहेत. ही मार्केटिंग फर्म गुगल, स्लॅक, केएफसी आणि सेफोरा या कंपनींसाठी कॅम्पेन आणि पॅकेजेस डिझाईन करतात, अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
 • खटल्यात नमूद असलेल्या माहितीनुसार, जून २०२० ते ऑगस्ट २०२२ पर्यंत कॅनरी मार्केटिंग फर्म ट्विटर कंपनीला व्यापारासंबंधातील मालाचा पुरवठा करत होती. ट्विटर आणि या कंपनीत झालेल्या करारानुसार ६० दिवसांच्या आत ट्विटरने कॅनरी फर्मला शुल्क देणं अपेक्षित होतं. परंतु, दोन टप्प्यातील पेमेंट ट्विटरकडून आला नसल्याचा दावा या कपंनीने केला आहे. खरंतर, एप्रिल २०२२ मध्ये ट्विटरवर बोली लावण्यता आली. त्यानंतर मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आली. मात्र, या कंपनीसोबत अधिकृत करार ऑक्टोबर २०२२ ला करण्यात आला होता. त्यामुळे कॅनरा मार्केटिंग फर्मसोबतचे जास्तीत जास्त व्यवहार त्यावेळी ट्विटर कंपनीत असणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले होते.

निर्मला सीतारामन १ फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

 • संसदेच्या अर्थसंक्लपीय अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.
 • केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ६६ दिवसांमध्ये एकूण २७ बैठका होतील. तर १४ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. १२ मार्चपासून संसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल. या दरम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोंधित करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.
 • प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटमध्ये सांगितले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होईल आणि सर्वसाधारण सुट्टीसह ६ एप्रिलपर्यंत चालेल. या ६६ दिवसांमध्ये २७ बैठका बैठका होतील. अमृतकाळात राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य मुद्द्यांवरील आभार प्रस्तावावर चर्चा.
 • गेल्यावर्षीप्रमाणे २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारीला सादर करतील. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी ३१ जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.