१३ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१३ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१३ जानेवारी चालू घडामोडी

जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज; आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०.३० वाजता जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 • ‘ही’ आहेत क्रूझची वैशिष्टे – ‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ ५१ दिवसांत ३२ प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार २०० किमीचा प्रवास करणार आहे. या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे. याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.
 • १ मार्चला आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता – ‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करेन. १३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.
 • याबाबत बोलताना ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या महासंग्रामाला आजपासून प्रारंभ

 • गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ४८ वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.
 • ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे. १९७१च्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर १९७३च्या पुढील पर्वात भारताने रौप्यपदक जिंकले. त्यानंतर १९७५च्या विश्वचषकात भारताने एक पाऊल पुढे जात जेतेपदावर मोहोर उमटवली होती. परंतु, १९७८ ते २०१८ या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही. यंदा मात्र भारताकडून अधिक दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे.
 • जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला विश्वचषकाच्या जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. बचावपटू आणि ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचाही भरघोस पाठिंबा लाभेल. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-४ अशी गमावली. मात्र, भारताने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. त्यांना सहा वर्षांत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यातही यश आले. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
 • ग्रॅहम रीड यांची २०१९ मध्ये प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह भारताने प्रो लीग हॉकीच्या २०२१-२२च्या हंगामात तिसरे स्थान मिळवले होते. रीड यांनी खेळाडूंना आत्मविश्वास देताना त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली आहे. तसेच भारतीय संघ आक्रमक शैलीत खेळत असून तांत्रिकदृष्टय़ा खेळाडूंमध्ये सुधारणा झाली आहे.
 • यंदाच्या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना शुक्रवारी स्पेनशी राउरकेला येथे रंगणार आहे. त्यानंतर भारताचे पुढील साखळी सामने इंग्लंड (रविवार, १५ जानेवारी) आणि वेल्स (गुरुवार, १९ जानेवारी) यांच्याविरुद्ध भुवनेश्वर येथील किलगा स्टेडियमवर होतील. भारताला साखळी फेरीचा अडथळा पार करण्यात यश आल्यास अंतिम आठमध्ये त्यांच्यापुढे गतविजेत्या बेल्जियमचे आव्हान असू शकेल.

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

 • जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचं निधन झाल्याची माहिती समजत आहे.
 • शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे वडील शरद यादव यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘पापा नहीं रहे’ असं हिंदी भाषेतून लिहिलं आहे.
 • ७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतून शरद यादव यांनी भारतीय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी जनता दलापासून फारकत घेत १९९७मध्ये जनता दल (युनायटेड) ची स्थापना केली. २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जेडीयूवरील आपला दावा गमावला. 
 • पुढे नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले. २०१८ मध्ये, जेडी (यू) पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एलजेडीमध्ये प्रवेश केला होता.

जगासमोरील संकटांना विकसनशील देशांनी एकजुटीने सामोरे जावे: मोदी‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेतील संबोधन

 • ‘‘जग सध्या संकटात आहे आणि ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत विषमता दूर करण्यासाठी व संधी निर्माण करण्यासाठी विकसनशील देशांनी जागतिक, राजकीय व आर्थिक शासनप्रणालीच्या पुनर्रचनेसाठी एकत्र आले पाहिजे. जगाच्या दक्षिण क्षेत्रातील देशांनी (ग्लोबल साउथ) त्यांना अनुकूल नसलेल्या प्रणाली व परिस्थितींवर अवलंबून राहण्याचे दुष्टचक्र टाळले पाहिजे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सांगितले.
 • ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेस दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मोदींनी अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किमती, करोना महासाथीचा आर्थिक परिणाम तसेच हवामान बदलामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींबद्दल चिंता व्यक्त केली. विविध विकसनशील देशांतील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले, की आम्ही नवीन वर्षांरंभी भेटत आहोत. हे वर्ष नवीन आशा आणि नवी ऊर्जा घेऊन आले आहे. आपण मागील वर्षांचे पान आता उलटले आहे. या सरलेल्या वर्षांत आम्ही युद्धे, संघर्ष, दहशतवाद आणि भू-राजकीय तणाव अनुभवला. 
 • करोना महासाथ, अन्न, खते, इंधन यांच्या वाढत्या किमती, हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आपत्ती आणि त्याचा दूरगामी आर्थिक परिणामांनाही आपण गेल्या वर्षी सामोरे गेलो. समावेश आहे. जग अजूनही संकटाच्या स्थितीत आहे. ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे.
 • सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यासाठी कायद्याचे राज्य, मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण आणि अधिक कालसुसंगत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचा सल्लाही यावेळी मोदींनी दिला.

हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा

 • अनेकांना बदलत्या हवामानाचा त्रास होत असतो. कारण अशा लोकांच्या शरीरावर हवामान बदलेलं तसे काही फरक जाणवतात. सध्या हिवाळा सुरु असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशा दिवसांमध्ये काही लोकांना रात्रभर झोपूनही शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरातील सुस्तीही जात नाही. त्यामुळे अशा लोकांना सतत अंथरुणावर झोपायला आवडतं. शिवाय ते हिवाळ्यात कामं करण्याची, स्वयंपाक करण्याची किंवा घराबाहेर पडण्याचं धाडही ते लोक करत नाहीत. त्यांना फक्त अंथरुणावर झोपायला, उबदार कपडे घालून निवांत पडायला आवडतं. मात्र, या थकवा आणि सुस्तीचा तुमच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत असतो.
 • जेपी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. ए. झीनत यांच्या मते, अनेक लोकांना सतत थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. थकवा आणि सुस्ती येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये काही लोक आरामदायी जीवन आणि लठ्ठपणामुळे सुस्त असतात. तर शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी 12 ( vitamin b12)च्या कमतरतेमुळेही थकवा येऊ शकतो. महिलांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळेही अशा प्रकारची समस्या उद्भवते.
 • हिवाळ्यात अनेकांची चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) कमकुवत होते, त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्याला चयापचय म्हणतात. शरीराला काम करण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी, हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते, त्यामुळे चयापचय वाढवणे आवश्यक असते. मेटाबॉलिज्म कमी असताना थकवा आणि सुस्ती जाणवते. तुम्हालाही हिवाळ्यात एनर्जीने परिपूर्ण राहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. शिवाय तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा लागेल ज्यामुळे ऊर्जा वाढेल आणि आणि शरीराती सुस्ती निघून जाईल.
 • कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ विनोद मिश्रा यांच्या मते, मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये प्रथिनांचे स्रोत समाविष्ट केले पाहिजेत. शरीराच्या प्रत्येक अवयवाची देखभाल करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. यासाठी तुम्ही हिवाळ्यात शेंगदाणे, हिरवी मूग डाळ, हरभरा आणि पनीर या पदार्थांचे सेवन करायला हवं.

भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध:

 • कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे.
 • डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत.
 • या औषधाची परिणामकारकता वैद्यकीय संशोधनातून (क्लिनिकल ट्रायल) स्पष्ट झाली असून, ‘जर्नल ऑफ ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने त्याची दखल घेतली आहे.
 • या संशोधनामुळे प्राथमिक अवस्थेतील तोंडाच्या कर्करोगावर तीव्र औषधांच्या वापराशिवाय उपचार करणे शक्य होणार आहे.
 • त्यामुळे, भविष्यात केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या उपचारांवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.