Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |18 August 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१८ ऑगस्ट चालू घडामोडी
लिपिक-टंकलेखक, कर सहायक पदाच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. लिपिक टंकलेखक संवर्गात मराठीसाठी १ हजार ६२, इंग्रजीसाठी १६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली, तर कर सहायक पदासाठी २२५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
- एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. टंकलेखक भरतीमध्ये मराठी टंकलेखनामध्ये लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम, राधिका गोलहार यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. तर इंग्रजी टंकलेखनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक, मनोहर माळी यांनी मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक आणि ज्योती काटे यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
- तसेच कर सहायक पदासाठीच्या भरतीचा निकालही जाहीर करण्यात आला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल जेंगठे यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक, तर अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात आल्याचे एमपीएससीने नमूद केले.
पेपर फुटला की कॉपी? तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट
- तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथील एका केंद्रावर पेपर फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नांची छायाचित्रे आढळून आली असली तरी प्रथमदर्शनी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी करण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारामुळे तब्बल चार वर्षांनी होत असलेल्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
- १० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षा एकाच वेळी न घेता टप्प्याटप्प्याने होणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, गुरूवारी येथील म्हसरूळच्या केंद्राबाहेर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे टॅब, दोन भ्रमणध्वनी, वॉकी टॉकी, हेडफोन असले अत्याधुनिक साहित्य आढळून आले. त्याच्या झडतीमध्ये भ्रमणध्वनीमध्ये तलाठी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे छायाचित्र आढळून आले आहे. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा रंगली असतानाच तपास यंत्रणेने मात्र ही शक्यता नाकारली आहे.
- संशयिताची तातडीने चौकशी सुरू केली असून तो काही परीक्षार्थीना कॉपी पुरवित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. या प्रकारात आणखी तीन-चार जण सहभागी असण्याची शक्यता असून त्यांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तर या प्रकरणी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेकडून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास तसेच लेखी पत्र देण्याची सूचनाही पोलिसांना केल्याची वाघ म्हणाले.
चंद्रयानाच्या ‘लँडर’चे विलगीकरण यशस्वी; २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर ‘लँडिंग’
- ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पार पडला. मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडय़ूल) लँडर मॉडय़ूल विलग करण्यात यश आले असून आता या लँडिंग मॉडय़ूलचा चंद्र पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची (लँडिंग) सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे.
- ‘विक्रम’ हा लँडर आणि त्यावर असलेला ‘प्रग्यान’ हा रोव्हर मुख्य यानापासून यशस्वीरीत्या विलग झाल्याचे ‘इस्रो’ने एक्स या समाजमाध्यम खात्यावर जाहीर केले. आता विलग झालेले लँडर मॉडय़ूलची चंद्राभोवतीची कक्षा अधिक घटविली जाणार असून प्रोपल्शन मॉडय़ूल येते काही महिने किंवा वर्षे आहे त्याच कक्षेमध्ये चंद्रभोवती परिभ्रमण करेल आणि चंद्र तसेच पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास सुरू ठेवेल, असे इस्रोने स्पष्ट केले. २३ ऑगस्ट रोजी या मोहिमेतील सर्वाधिक अवघड आणि शेवटचा टप्पा असेल. या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे अवतरण केले जाईल. चंद्रयान-२ मोहीम याच टप्प्यावर अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने या प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले असून यावेळी निश्चित यश येईल, असा संशोधकांना विश्वास आहे.
- आतापर्यंत अस्पर्शित राहिलेल्या चंद्राच्या दक्षिण धृवावर ‘विक्रम’ उतरणार आहे. त्यानंतर त्यावर बसविलेला ‘प्रग्यान’ हे स्वयंचलित यान चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल आणि तेथील माती, दगड आदीचा अभ्यास करेल. या मोहिमेमुळे चंद्राबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची भारताबरोबरच जगभरातील संशोधकांना अपेक्षा आहे.
Chandrayaan-3 चे एक पाऊल पुढे, चंद्रावर उतरण्याच्या पूर्वतयारीला झाली सुरुवात
- ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रो ( ISRO ) तर्फे चंद्रावर उतरण्यापूर्वी चांद्रयान ३ ची वाटचाल ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली जात आहे. चंद्राभोवती १५० ते १७७ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेतील एक महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे.
- चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारे Vikram lander हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे आणि आता त्याने मुख्य यानापासून काही अंतरावर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे अशी घोषणा इस्रोने केली आहे. आता उद्या म्हणजे १८ ऑगस्टला lander ची कक्षा आणखी कमी जाईल आणि ते आणखी चंद्राजवळ आणले जाईल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
- तेव्हा सर्व पुढील नियोजित टप्पे सुरळित पार पडले तर येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी ५५० विशेष बसगाडय़ा
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी महामंडळाने ५५० इतक्या विशेष गाडय़ांचे नियोजन केले असून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
- गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. त्यामुळे वसई, विरारमधून दरवर्षी मोठय़ा संख्येने कोकणवासीय हे गणेशोत्सव काळात आपल्या मूळ गावी जातात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष सेवा पुरविली जाते. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी पालघर एसटी महामंडळातर्फे वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून विशेष गाडय़ांचे नियोजन करून नोंदणी सुरू झाली आहे.
- ५५० विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यापैकी आताच ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे. मागील वर्षांपासून एसटीच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला केवळ अडीचशे ते तीनशे गाडय़ा सोडल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पाचशेहून अधिक गाडय़ांचे नियोजन आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १७ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १६ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १५ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १४ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
- १३ ऑगस्ट २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |