Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 19 December 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ डिसेंबर चालू घडामोडी
लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी:
- लिओ वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. आयर्लंडमधील तीन पक्षांच्या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख राजकीय पक्षांत ही सत्तासूत्रे हस्तांतरित झाली. वराडकर हे मिश्र वंशाचे आहेत. आयर्लंडमधील सर्वात तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. त्यांनी शनिवारी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
- ४३ वर्षीय वराडकर यांचा पक्ष ‘फाइन गेल’ व मायकल मार्टिन यांच्या ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे होत असलेले आवर्तन आयर्लंडच्या इतिहासात अभूतपूर्व मानले जात आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आयरिश गृहयुद्धात हे दोन्ही पक्ष परस्परांचे विरोधक होते. २०२० च्या निवडणुकीनंतर आयर्लंडच्या ग्रीन्स पक्षासह या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून-पालटून येत असतात.
- वराडकर यांनी २०१७ मध्ये फाइन गेल पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ‘एक नवीन चेहरा’ म्हणून पाहिले होते. पण ताओइसेच पदाच्या (पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द) अडीच वर्षांच्या काळानंतर २०२० च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यांची उपपंतप्रधानपदाची कारकीर्दही वादग्रस्त ठरली. त्यांनी नेतृत्व कौशल्यातील चमक गमावल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली.
- गेल्या शतकातील उत्तरार्धात कठोर, पुराणमतवादी नैतिक विचारसरणीचे वर्चस्व असलेल्या आयर्लंडमध्ये वराडकरांचा आयरिश राजकारणातील उदय उल्लेखनीयच होता. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरले. भारतीय वंश लाभलेले ते पहिले पंतप्रधान ठरले. ‘समिलगी संबंधांचे उघड समर्थक’ अशीही त्यांची ओळख आहे. वराडकर यांचा जन्म डब्लिनमध्ये एका आयरिश आईच्या पोटी झाला. त्या परिचारिका होत्या. वराडकर यांचे पिता भारतातून आयर्लंडमध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झाले होते. ते व्यवसायाने डॉक्टर होते.
आरोग्य विभागात डॉक्टरांसह १७,०५१ पदे रिक्त; आरोग्य विभाग चालतो कसा:
- डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षपरिचर यांसह आरोग्य विभागात हजारो पदे रिक्त असतानाही आरोग्य विभाग रुग्णसेवा कशी करतो हा प्रश्नच आहे. करोना, गोवरसारखे साथीचे आजार असो की केंद्र व राज्याचे आरोग्यविषयक विविध योजना राबविण्याचा मुद्दा, आरोग्य विभागाची गाडी डॉक्टर व परिचारिकांची हजारोंनी पदे रिक्त असतानाही सुरू आहे. आजघडीला राज्याच्या आरोग्य विभागात डॉक्टरांपासून विविध संवर्गाची एकूण १७ हजार ०५१ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात डॉक्टरांची सुमारे एक हजार ५३४ पदे भरण्यात आलेली नसून, अशा प्रतिकूल परिस्थित काम करायचे कसे असा सवाल अस्वस्थ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
- राज्यातील सत्तेत कोणत्याही पक्षाचे सरकार असो आरोग्य विभागाच्या वाट्याला कायमच उपेक्षा आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे आरोग्य विभागातील डॉक्टरांसह अत्यावश्यक असलेली हजारो पदे भरायची नाहीत तर दुसरीकडे आरोग्य विभागाला पुरेसा निधी द्यायचा नाही, हेच प्रत्येक सरकारचे धोरण राहीले आहे. आरोग्य विभागात आवश्यकता नसताना सनदी अधिकाऱ्यांची खोगीरभरती केली जाते, मात्र डॉक्टरांच्या नियमित पदोन्नतीच्या प्रश्नासह पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आणि रिक्त पदे भरण्याबाबत या सनदी बाबू लोकांनी कधीही ठोस पुढाकार घेतलेला नाही. यामुळेच आज आरोग्य विभागाची पुरती वाताहात झाल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- राज्याच्या आरोग्याचा कारभार ज्या आरोग्य संचालनालयामधून चालतो तेथे आरोग्य संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालकांची ७० हून अधिक पदे रिक्त आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांसह विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी मिळून एक हजार ५३४ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मंजूर २९० पदांपैकी नम्मीपदे म्हणजे १४६ पदे भरण्यात आलेली नाहीत, तर जिल्हा शल्य चिकित्सकांची २६० पदे रिक्त आहेत.
- विशेषज्ञांची ५०६ पदे भरण्यात आलेली नाहीत, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ९६२ पदे रिक्त आहे. याशिवाय परिचारिका, तंत्रज्ञ, तसेच मोठ्या प्रमाणावर रुग्णालयीन कर्मचारी वर्ग भरण्यात आलेला नाही. ‘क’ वर्गाची ९,४१४ पदे तर वर्ग ‘ड’ गटाची ४९१५ पदे भरण्यात आलेली नाहीत. यातील गंभीरबाब म्हणजे आरोग्य विभागाला सकल राज्य उत्पन्नाच्या जेमतेम एक टक्का रक्कम अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिली जाते आणि ही अपुरी रक्कमही वेळेवर आरोग्य विभागाला मिळत नाही, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मोदी यांच्या भूमिकेमुळे युक्रेन संघर्षांत जागतिक संकट टळले; ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स यांचे मत:
- अण्वस्त्र वापराबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार घेतलेल्या भूमिकेचा रशियावर परिणाम झाल्यामुळे युक्रेन युद्धात जागतिक संकट टळले, असे प्रतिपादन अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (सीआयए) संचालक विल्यम बर्न्स यांनी केले.
- चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचा पुतिन यांच्यावर परिणाम झाला, असे मला वाटते, असे बर्न्स यांनी पब्लिक ब्रॉडकािस्टग सव्र्हिसला (पीबीएस) दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अण्वस्त्र वापराच्या धमकीमागे भीती दाखवण्याचा उद्देश होता, पण आजच्या घडीला अण्वस्त्र वापराची योजना रशियाकडे असल्याचा कोणताही थेट पुरावा मला आढळत नाही, असेही बर्न्स यांनी नमूद केले.
- संघर्ष आणखी काही वेळ चालेल, रशिया सर्व शस्त्र-साधनांचा वापर युद्धात करेल, असे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ३ डिसेंबरला म्हटले होते. आण्विक युद्धाच्या ‘वाढत्या’ धोक्याबाबतही पुतिन यांनी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बर्न्स यांनी त्यांची निरीक्षणे या मुलाखतीत नोंदवली.
- संवादातून तोडगा काढण्याच्या भारताच्या आवाहनामुळे पुतिन यांनी युक्रेन संघर्षांबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केली होती. सप्टेंबरमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष चर्चाही झाली होती. आजचे युग युद्धाचे नाही, असेही मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते.
इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये घट:
- जैव इंधनयुक्त पेट्रोलमध्ये मिश्रण होणाऱ्या इथेनॉलवरील वस्तू व सेवा कर १८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणाऱ्या शुद्धीकरण कारखान्यांना मदत होणार असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन विदेशी चलनाची बचत होणार आहे.
- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या शनिवारी पार पडलेल्या ४८ व्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वस्तू आणि सेवाकरासंबधीत हेतुपुरस्सर केल्या जाणाऱ्या चुका आणि ठराविक अनियमितता यांना गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवण्याचे मान्य करण्यात आले आहे. जीएसटी कायद्याच्या अनुपालनातील अनियमिततेसाठी खटला चालवण्याची मर्यादा दुप्पट करून दोन कोटी रुपये केली आहे. मात्र बनावट बीजकांसाठी १ कोटी रुपयांची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याचबरोबर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स अर्थात एसयूव्ही वाहनांच्या वर्गीकरणाबाबत परिषदेने भूमिका स्पष्ट केली.
- एसयूव्ही श्रेणीतील वाहनांवर लागू होणारा २२ टक्के उपकर निश्चित करण्यासाठी वाहनांची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. ज्या वाहनाचा उल्लेख एसयूव्ही म्हणून केला आहे, इंजिन क्षमता १५०० सीसीपेक्षा अधिक, लांबी ४,००० मिमीपेक्षा जास्त आणि जिचा ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आणि त्याहून अधिक आहे, अशा अटी पूर्ण करणाऱ्या वाहनांवर २२ टक्के उपकराचा उच्च दर लागू होतो.
विश्वविजयी मेसी:
- लुसेल स्टेडियमवर झालेला अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक झाला. अर्जेटिनाकडे ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मात्र, यानंतर किलियन एम्बापेने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ९७ सेकंदांत दोन गोल करत फ्रान्सला बरोबरी करून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत मेसी आणि एम्बापेने प्रत्येकी एकेक गोल केल्याने सामना ३-३ असा बरोबरीत आला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट झाले. यात मेसी, पाव्लो डिबाला, लिआंड्रो पेरेडेस, गोन्झालो मोन्टिएल यांनी गोल करत अर्जेटिनाला विजय मिळवून दिला.
- अंतिम सामन्याची अर्जेटिनाने आक्रमक सुरुवात केली. भक्कम बचाव, मध्यरक्षकांचे चेंडूवर नियंत्रण आणि आक्रमकांचा तेजतर्रार खेळ यामुळे अर्जेटिनाने पूर्वार्धात फ्रान्सवर वर्चस्व गाजवले. गेले दोन सामने संघाबाहेर बसलेल्या अॅन्जेल डी मारियाला अंतिम सामन्यात सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. २१व्या मिनिटाला फ्रान्सच्या ओस्मान डेम्बेलेने डी मारियाला गोलकक्षात अयोग्यरित्या पाडल्याने अर्जेटिनाला पेनल्टी मिळाली. यावर मेसीने गोल करत अर्जेटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
- मेसीचा हा यंदाच्या विश्वचषकातील एकूण सहावा आणि पेनल्टीच्या साहाय्याने केलेला चौथा गोल ठरला. यानंतर अर्जेटिनाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ३६व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवली. फ्रान्सचा बचावपटू डायोट उपामेकानोकडून चेंडू मिळवल्यानंतर मेसीने अलेक्सिस मॅक अॅलिस्टरकडे पास दिला.
- अॅलिस्टरने उजवीकडून चेंडू पुढे नेत फ्रान्सच्या गोलकक्षात आक्रमण केले. मग त्याने डावीकडून पुढे धावत आलेल्या डी मारियाकडे चेंडू दिला आणि डी मारियाने चेंडूला गोलची दिशा देत अर्जेटिनाची आघाडी भक्कम केली. मग फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेशॉम्प यांनी प्रमुख आघाडीपटू ऑलिव्हिएर जिरूड आणि डेम्बेले यांच्या जागी रँडल कोलो मुआनी आणि मार्कस थुराम या युवकांना मैदानावर उतरवले. त्यामुळे फ्रान्सच्या खेळात अधिक उर्जा संचारली.
ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत एलॉन मस्कचं मोठं ट्वीट, म्हणाले, “मी…” :
- टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलंय. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
- एलॉन मस्क म्हणाले, “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.”
- या ट्वीटवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होऊ नये असं सांगत आहेत. दुसरीकडे मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला काहीही अर्थ नाही, असं सांगत आहेत.
उत्तर कोरियाकडून आणखी दोन क्षेपणास्त्रांची चाचणी:
- उत्तर कोरियाने रविवारी आणखी दोन लांब पल्ल्याची अण्वस्त्र वाहक क्षमतेची क्षेपणास्त्रे चाचणीच्या बहाण्याने डागली.
- जपानने चीन आणि उत्तर कोरियाविरुद्ध नवी अधिक आक्रमक सुरक्षा रणनीती अवलंबल्याच्या निषेधार्थ ही कृती उत्तर कोरियाने केल्याचे मानले जाते.
- उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंतचा पल्ला गाठणारी अधिक अद्ययावत, प्रभावी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे सांगताना त्यासाठी लागणारी महत्त्वाची चाचणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले होते.
- त्यानंतर रविवारी उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र डागली.
- उत्तर कोरियाच्या वायव्य टोंगचांगरी भागातून ही दोन्ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
- ही क्षेपणास्त्रे सुमारे 500 किलोमीटर (310 मैल) पार करून उत्तर कोरिया व जपान दरम्यानच्या सागरी हद्दीत कोसळल्याची माहिती जपान, दक्षिण कोरियाच्या सरकारकडून देण्यात आली.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १७ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १६ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १५ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १४ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |