Contents
- 1 १९ सप्टेंबर चालू घडामोडी
- 1.1 ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड:
- 1.2 एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल:
- 1.3 सर्वोच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’च्या घटनादुरुस्तीला मान्यता:
- 1.4 बजरंगची कांस्यकमाई; जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक:
- 1.5 माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन:
- 1.6 लंडनमध्ये आज अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था; राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी पूर्ण:
- 1.7 कडेकोट बंदोबस्त
- 1.8 राष्ट्रपती मुर्मू लंडनमध्ये दाखल
- 1.9 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित:
- 1.10 आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे ट्वीट
- 1.11 पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाचे आयोजन
- 1.12 एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट
- 2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
- 3 दिनविशेष
- 4 अधिक घडामोडी:
Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 19 September 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ सप्टेंबर चालू घडामोडी
ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड:
- चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
- भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली.
- सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
- ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.
- ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.
एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल:
- ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे.
- यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
- यासोबतच कोविड-19 च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सर्व नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत.
- साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते.
सर्वोच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’च्या घटनादुरुस्तीला मान्यता:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)2019मध्ये घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती.
- 2018मध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारताना तीन-तीन वर्षांच्या कालावधीनंतर विरामकाळ (कूलिंग-ऑफ पिरेड) ही अट मान्य केली होती.
- मात्र, त्यानंतर एका वर्षातच ‘बीसीसीआय’ने घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
- अखेर तीन वर्षांनी ही याचिका निकालात निघाली.
- 14 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्यांच्या अनिवार्य विरामकाळाच्या घटनादुरुस्तीला परवानगी दिली.
- तसेच काही अन्य मुद्द्यांवरही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.
बजरंगची कांस्यकमाई; जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक:
- भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदकाची कमाई केली.
- बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेरावर ११-९ अशी सरशी साधली. बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे. बजरंगने यापूर्वी २०१३मध्ये बुडापेस्ट आणि २०१९मध्ये नूर-सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर २०१८मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दिआकोमिहालीसकडून बजरंगचा पराभव झाला. परंतु जॉनने अंतिम फेरी गाठल्याने बजरंगला रेपिचेजमधून संधी निर्माण झाली.
- रेपिचेजमध्ये बजरंगने अर्मेनियाच्या वेझगेन तेव्हनयानवर ७-६ असा निसटता विजय मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला. मग रिव्हेराला ०-६ अशा पिछाडीनंतरही ११-९ अशा फरकाने नमवत त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटनेही कांस्यपदक पटकावले होते.
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन:
- आदिवासीबहुल नंदुरबार या लोकसभा मतदार संघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे शनिवारी सकाळी नाशिक येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सलग नऊ वेळा ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते. गावित यांच्या पश्चात मुलगी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, मुलगा भाजपचे नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
- नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ माणिकरावांचे एकखांबी वर्चस्व राहिले. दादा म्हणून ते ओळखले जायचे. गांधी घराण्याशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसचा देशातील प्रचाराचा नारळ देखील नंदुरबारमधून फुटायचा. १९६५ मध्ये नवापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये ते नवापूरचे आमदार झाले. वर्षभरात ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
- १९८१ साली ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यावेळी ते ४७ वर्षांचे होते. तेव्हापासून २०१४ पर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघावर त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माणिकराव यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. २०१४ मधील मोदी लाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रविवारी सकाळी नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लंडनमध्ये आज अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था; राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी पूर्ण:
- ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी एलिझाबेथ यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एकीकडे या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच त्याची सुरक्षा हे सर्वात मोठे आव्हान आहे. जगभरातील ५०० पेक्षा जास्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित असतील. त्यामुळे शहरात न भूतो असा कडेकोट बंदोबस्त आहे.
- ‘‘अनेक देशांचे राजे, राण्या, अनेक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि अन्य महत्त्वाचे नेते सोमवारी लंडनच्या ‘वेस्टमिन्स्टर अॅबे’मध्ये असतील. एवढय़ा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी असण्याची नजिकच्या काळातील हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा,’’ असे लंडनचे महापौर सादिक खान म्हणाले. राजशिष्टाचार पाळून या सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे मोठे आव्हान आहे. वेस्टमिन्स्टर अॅबेचा परिसर आणि अंत्ययात्रेच्या मार्गावर हजारो नागरिक जमण्याची शक्यता आहे.
कडेकोट बंदोबस्त
- * १० हजार पोलीस, सैनिक तैनात
- * ब्रिटनमधील सर्व ४३ पोलीसदलांची कुमक
- * उंच इमारतींवर पोलिसांची गस्त
- * थेम्स नदीमध्ये नौदल तैनात
- * ‘ड्रोन’च्या उड्डाणास संपूर्ण बंदी
- * हिथ्रो विमानतळावरील उड्डाणे रद्द
- * सर्व कचरापेटय़ा तपासणी करून बंद दूरचित्रवाणीचे पडदे
नागरिकांना राणीचा अंत्यविधी बघता यावा, यासाठी लंडनमध्ये शेकडो दूरचित्रवाणी पडदे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी अंत्यसंस्कारस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रपती मुर्मू लंडनमध्ये दाखल
लंडन : ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर सोमवारी होत असलेल्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येथे पोहोचल्या आहेत. त्यांचा हा तीन दिवसीय दौरा आहे. त्यांनी भारत सरकारतर्फे शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. लंडनमधील लँकेस्टर हाउसमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत उच्चायुक्त सुजित घोषही उपस्थित होते. मुर्मू यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर सभागृहात ठेवलेल्या महाराणींच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित:
- शनिवारी १७ स्प्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७२ वा वाढदिवस होता. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने ‘रक्तदान अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. १७ स्प्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला. एका दिवसात एक लाखाहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे ट्वीट
- याआधीही आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून ८७ हजार लोकांनी ऐच्छिक रक्तदान करून नवा विक्रम केल्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्विट केले होते की, ‘आज मला कळविण्यात आनंद होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृतमहोत्सवाअंतर्गत आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे, जो एक नवा जागतिक विक्रम आहे. आपल्या लाडक्या प्रधान सेवकाला देशाने दिलेली ही अनमोल भेट आहे, असे ट्वीट मांडविया यांनी केले होते.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाचे आयोजन
- खरं तर, पंतप्रधान मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त, केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांना ‘रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत’ रक्तदान करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप किंवा ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी करण्याची विनंती केली होती. ‘रक्तदान – महादान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या रक्तदान अमृत महोत्सवांतर्गत रक्तदान केले. मानवतेच्या या कार्यात सामील होणे खूप आनंददायी आहे. तुम्हीही या महान कार्यात सहभागी व्हा., असे ट्वीट मांडविया यांनी केले होते.
एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट
- रक्तदान अमृत महोत्सवाची सुरुवात पंतप्रधानांच्या वाढदिवशी म्हणजे शनिवार १७ सप्टेंबरपासून झाली. हा महोत्सव १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे आहे. याशिवाय लोकांना नियमित रक्तदान करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. एक युनिट म्हणजे ३५० मिली रक्त. केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व मंत्रालये आणि विभाग, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय संस्था आणि इतर भागधारकांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- १७ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- १६ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- १५ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- १४ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |