२० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 20 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२० सप्टेंबर चालू घडामोडी

बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले

– 18 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून चार पदके जिंकणारा बजरंग पुनिया हा एकमेव भारतीय ठरला.
– कुस्तीपटूने पुरुषांच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले.
– बजरंग पुनियाने पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन सी रिवेराचा ११-९ असा पराभव केला.
– बजरंग पुनियाला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन मायकेल डायकोमिहलिसकडून पराभव पत्करावा लागला.

बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले

धर्मेंद्र प्रधान यांनी रामकृष्ण मिशनचा प्रबोधन कार्यक्रम सुरू केला

– केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रामकृष्ण मिशन ‘जागरण’ कार्यक्रम सुरू केला.
– हा उपक्रम NEP 2020 च्या तत्त्वज्ञानाशी संरेखित मुलाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सुनिश्चित करेल.
– NEP 2020 9वी आणि 12वी साठी मूल्य-आधारित शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्यासोबतच इयत्ता पहिली ते आठवी साठी कार्यक्रम तयार करण्यावर भर देते.

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू एफसीने पहिले ड्युरंड चषक जिंकले

– सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू एफसीने ड्युरंड कपच्या १३१व्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत मुंबई सिटी एफसीचा २-१ असा पराभव केला.
– ब्रिटिश भारताचे माजी परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरंड यांनी १८८८ मध्ये ड्युरंड कपची स्थापना केली.
– ड्युरंड चषक सुरुवातीला फक्त सशस्त्र सेवांद्वारे खेळला जायचा पण नंतरच्या काळात हा खेळ अधिकृतपणे व्यावसायिक फुटबॉल क्लबसाठी खुला करण्यात आला.
– अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या संयुक्त विद्यमाने ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू एफसीने पहिले ड्युरंड चषक जिंकले

बीएसएफचे पहिले महिला उंट स्वार पथक

– सीमा सुरक्षा दल (BSF) चे पहिले महिला उंट स्वार पथक राजस्थान आणि गुजरातमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात केले जाईल.
– 1 डिसेंबर रोजी बीएसएफ रेझिंग डे परेडमध्ये हे पथक प्रथमच सहभागी होणार आहे.
– BSF हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आहे जे केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्य करते.
– भारत-पाकिस्तान युद्धानंतर 1965 मध्ये त्याची उभारणी करण्यात आली होती.

बीएसएफचे पहिले महिला उंट स्वार पथक

सियामचे नवे अध्यक्ष म्हणून विनोद अग्रवाल यांची निवड

– सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने 2022-23 साठी विनोद अग्रवाल यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
– Volvo Eicher Commercial Vehicles चे MD आणि CEO, अग्रवाल, मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष केनिची आयुकावा यांची जागा घेत आहेत.
– सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ही भारतातील सर्व प्रमुख वाहने आणि वाहन इंजिन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारी नफा न करणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे.

जागतिक बांबू दिन 2022

– या अत्यंत उपयुक्त वनस्पतीच्या संवर्धनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन 2022 साजरा केला जातो.
– 2009 मध्ये बँकॉक येथे झालेल्या 8व्या जागतिक बांबू काँग्रेसमध्ये 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू संघटनेने WBD अधिकृतपणे घोषित केले.
– दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळणारा, बांबूचा वापर अन्न म्हणून आणि लाकूड, इमारत आणि बांधकाम साहित्याचा पर्याय म्हणून विविध मार्गांनी केला जाऊ शकतो.

केरळ निवडणुकीचा निकाल

– केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत.
– LDF 140 पैकी 92 जागांवर आघाडीवर आहे तर UDF 45 वर घसरला आहे आणि NDA 3 जागांवर आघाडीवर आहे.

केरळ निवडणुकीचा निकाल

आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन

– आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
– आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन हा लैंगिक वेतनातील तफावतीचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो.
– UN-मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय समान वेतन दिनाची उद्घाटन आवृत्ती 18 सप्टेंबर 2020 रोजी पाळण्यात आली.
– 1996 मध्ये प्रथमच राष्ट्रीय वेतन इक्विटी समितीने आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन साजरा केला.

ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा – प्रज्ञानंदची दमदार कामगिरी:

 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्याला अमेरिकेच्या १५ वर्षीय ख्रिस्तोफर योकडून पराभव पत्करावा लागला.
 • १७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे वॅसिल इव्हान्चुक, यान क्रिस्टोफ-डुडा आणि बोरिस गेलफंड या अनुभवी खेळाडूंवर मात केली. त्यामुळे आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर प्रज्ञानंद गुणतालिकेत अन्य तीन खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर होता.
 • जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने तीन सामने जिंकत आणि एक लढत बरोबरीत सोडवत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. मॅग्नसने भारताच्या अर्जुन एरिगेसीवरही मात केली. मात्र, अर्जुनने पहिल्या फेरीतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना सलग तीन लढती जिंकल्या.

महत्त्वाची बातमी – पुढील वर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या: 

 • राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
 • फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
 • १. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षेचा कालावधी मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २० मार्च २०२३
 • २.माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा – गुरुवार ०२ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३
 •  हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 • मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे.  अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

IRCTC ची नवरात्री निमित्त प्रवाशांना खास भेट; ट्रेनमध्येही मिळणार उपवासाची ‘स्पेशल थाळी’; पाहा कोणते पदार्थ असणार:

 • नवरात्री हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लवकरच गरब्याचा आवाज आपल्या कानांमध्ये घुमू लागेल. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा खेळणाऱ्यांची संख्या जितकी मोठी आहे तितकीच उपवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या काळात लोक कडक उपवास करतात. मात्र, उपवास करत असताना आपल्याला लांबचा प्रवास करावा लागला तर? अशा प्रवासात उपवास करणाऱ्यांची खूपच पंचाईत होते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आयआरसीटीसीने (IRCTC) रेल्वे प्रवाशांना नवरात्रीची खास भेट दिली आहे.
 • भारतीय रेल्वेने नवरात्र स्पेशल मेन्यूला मंजुरी दिली आहे. यानुसार रेल्वेमध्ये उपवास करणाऱ्या प्रवाशांना फलाहाराबरोबरच उपवासात खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीमध्ये फलाहाराची व्यवस्था केली जात आहे. एवढेच नाही तर याची शुद्धता राखण्यासाठी नवरात्रीच्या काळात पॅन्ट्रीमध्ये मांसाहारी पदार्थ तयार केले जाणार नाहीत. आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 • यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवात अनेक घरांमध्ये घटस्थापना तसेच कुलदेवतेची पूजा केली जाते. यादरम्यान शहरात राहणारे लोक आपल्या घरी जातात. अशा परिस्थितीत उपवास करणाऱ्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या ‘नवरात्र स्पेशल मेन्यू’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 • सप्तक्रांती एक्स्प्रेसचे पॅंट्री कार व्यवस्थापक असगर अली सांगतात की, नवरात्रीत तयार होणारे अन्न शुद्ध आणि सात्विक असेल. उपवास करणाऱ्यांना चार प्रकारच्या थाळी दिल्या जातील. २६ सप्टेंबरपासून ही सेवा दिली जाणार आहे.

रशियामुळे भारताला ३५ हजार कोटींचा फायदा; जाणून घ्या नेमकं घडलं काय:

 • रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल विकत घेतल्याने भारताला जवळजवळ ३५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळेच आपला व्यापार सुरु रहावा म्हणून रशियाने भारताला स्वस्त दरामध्ये कच्चं तेल विकण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टांचा फायदा भारताला झाल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
 • याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केलं. त्यावेळी जगभरामध्ये तणावपूर्ण राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच रशियाकडे अनेक वर्षांपासून तेल विकत घेणाऱ्या काही देशांनी निर्बंध लादत रशियाकडून तेल घेणं बंद केलं. या निर्बंधांमुळे रशियाला कच्च्या तेलाचे लाखो पिंप निर्यातीसाठी तयार असूनही देशाबाहेर पाठवता आले नाही.
 • त्यामुळेच रशियाने कच्च्या तेलाच्या जागतील दरांपेक्षा बऱ्याच कमी दराने इतर देशांना तेल विक्री करणं सुरु केलं. त्यावेळी भारताने अमेरिकेसहीत इतर अनेक देशांकडून दबाव टाकला जात असतानाही रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. सवलतीमध्ये रशियाकडून मिळणारं तेल भारतामध्ये आयात करण्यात आलं.
 • रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चीननंतर दुसरा सर्वात मोठा देश म्हणून भारताचं नाव घेतलं जाऊ लगालं. त्यावेळी भारतामधील एकूण तेल आयातीपैकी १२ टक्के तेल हे रशियाकडून आयात केलं जात होतं. पूर्वी हीच आकडेवारी एका टक्क्यांहूनही कमी होती. याच वर्षी जुलै महिन्यामध्ये रशिया भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश ठरला. सौदी अरेबिया सध्या भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्ट महिन्यात भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये रियाद दुसऱ्या स्थानी असून रशिया तिसऱ्या स्थानी आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

आता भारतीयांपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेलाही परत हवाय ‘त्यांचा कोहिनूर’; जाणून घ्या ५०० कॅरेटच्या ‘या’ हिऱ्याबद्दल:

 • ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटिश साम्राज्याकडे असलेले इतर देशांमधून नेण्यात आलेले हिरे परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्रिटनने ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ हा हिरा परत करावा, अशी मागणी दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आली आहे. ‘कुलीनन’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा हिरा १९०५ साली दक्षिण आफ्रिकेत उत्खननात सापडलेल्या एका रत्नातून कापण्यात आला होता, असे वृत्त ‘सीएनएन’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी राज्यकर्त्यांनी हा हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे सुपुर्त केला होता. दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट स्टार हिरा महाराणीच्या शाही राजदंडावर बसवण्यात आला आहे.
 • ५०० कॅरेटचा हा हिरा परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाईन याचिकेवर ६ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ब्रिटनने केलेल्या हानीची भरपाई करावी, दक्षिण आफ्रिकेतून चोरून नेलेले सोने, हिरे परत करावेत, अशा आशयाचे ट्वीट दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य वुयोल्वेथू झुन्गुला यांनी केले आहे.
 • ब्रिटिशांकडे असलेल्या भारताचा ‘कोहिनूर’ हिरा मायदेशी परतावा यासाठी अनेक दशकांपासून मागणी केली जात आहे. १०५.६ कॅरेटचा ‘कोहिनूर’ हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले.
 • १८४९ साली ब्रिटिशांनी भारतातील पंजाबवर ताबा मिळवल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात सजवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटाचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक हिऱ्याच्या मालकीवरुन भारतासह चार देशांमध्ये अनेक शतकांपासून वाद सुरू आहेत. जॉर्ज सहावे यांच्या १९३७ मधील राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांच्या आई महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी प्लॅटिनम धातूच्या मुकुटामध्ये हा हिरा सजवण्यात आला होता. हा मुकुट लंडन टॉवरमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.