Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ सप्टेंबर चालू घडामोडी
Aditya L1 आणि ISRO चं चॅटिंग सुरु; पृथ्वीपासून ५०,००० किमी दुरून पाठवतोय डेटा, ज्यामुळे..
- भारताची पहिली वहिली सौर मोहीम आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि Ions आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करतो, असे इस्रोने सोमवारी सांगितले आहे. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पट पेक्षा जास्त आहे.
- इस्रोच्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किमी पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सामान्य पॅरामीटर्समध्ये कार्यरत आहे असेही इस्रोने सांगितले आहे.
- STEPS म्हणजे काय?
- स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्स मध्ये सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो. कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.”
- फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) द्वारे इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) च्या समर्थनासह स्टेप्स विकसित करण्यात आले आहे. अंतराळयान त्याच्या कक्षेत निश्चित ठिकाणी स्थिरावल्यावर स्टेप्सचे सेन्सर चालू असतील. L1 च्या आसपास गोळा केलेला डेटा अवकाशातील हवामानाविषयी, सौर वारा आणि अॅनिसोट्रॉपी (दिशांनुसार बदलणारे वस्तुमान) याबद्दल माहिती देईल.
गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले…
- मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचं आगमन कालपासूनच (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
- “सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
- गणेशोत्सव हा जगभर साजरा केला जाणारा सण असला तरी हा महाराष्ट्राचा आणि मराठी बांधवांचा प्रमुख सण आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरादेखील याच महाराष्ट्राने देशाला दिली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेत ट्वीट करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. इतर राज्यांमधील सणांच्या वेळी पंतप्रधान मोदी त्या-त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेत शुभेच्छा देत असतात.
- दरम्यान, देशभरात बॉलिवूड सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेत्यांच्या घरीदेखील लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या घरी काल रात्रीच गणरायाचं आगमन झालं. या दोन्ही कलाकारांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीपेक्षा चौपट मोठा ग्रह नेपच्यूनची १९ सप्टेंबरला प्रतियुती; अवकाशात नेमकं काय घडणारं, मानवी जीवनावर काय परिणाम होणार?
- सूर्यमालेतील सर्वांत दूरचा व पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असलेल्या नेपच्यून ग्रहाची प्रतियुती १९ सप्टेंबर रोजी होत आहे. प्रतियुतीवेळी पृथ्वीच्या एका बाजूस ग्रह व विरुद्ध बाजूस सूर्य असतो. प्रतियुतीच्या दिवशी ग्रह पूर्वेस सूर्यास्तास उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. तसेच यावेळी तो पृथ्वीजवळ आल्याने मोठा व तेजस्वी दिसतो. या निळसर रंगाच्या ग्रहाला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे.
- जेव्हा ग्रह आणि सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आणि पृथ्वीजवळ असतो, तेव्हा त्याला प्रतियुती असे म्हणतात. या ग्रहाचे निरीक्षण केले असता फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. १९ सप्टेंबरला हा ग्रह पूर्व क्षितीजावर उगावेल व पश्चिमेकडे मावळेल. रात्रभर आकाशात हा ग्रह दिसेल. मात्र साध्या डोळ्यांनी हा ग्रह पाहता येणार नाही तर यासाठी शक्तिशाली दुर्बिनची आवश्यकता असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.
- पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहाला १६५ वर्षे लागतात व स्वत:भोवती एक फेरी तो १६ तासांत पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहेत. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८६०० किमी आहे व भुपृष्ठाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे.
- २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. पृथ्वीपासून या ग्रहाचे अंतर ४.३ अब्ज किलोमीटर आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नसल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
- संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज मंगळवारपासून (आज) नव्या इमारतीत होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. जुन्या संसद भवनाप्रमाणे नव्या इमारतीमध्येही नवा इतिहास घडवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
- संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना मंगळवारी सकाळी ९ वाजता संसदेमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जुन्या संसद भवनाच्या आवारात सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेतले जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सर्व सदस्य एकत्र जमतील. तिथल्या स्नेहसंमेलनानंतर खऱ्या अर्थाने जुन्या संसद भवनातील अधिवेशनाचे कामकाज संपुष्टात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीमध्ये सुरू होईल.
- नव्या इमारतीमध्ये अधिवेशनाचे कामकाज घेण्याची तयारी पूर्ण झाली असून तेथील कर्मचारी, सुरक्षारक्षक, मार्शल या सर्वाना नवा पोषाख देण्यात आला आहे. सर्व सदस्य, पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती आदींच्या प्रवेशासाठी स्वतंत्र द्वारांची सुविधा असून तेथे कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. नव्या इमारतीचे २८ मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. रविवारी नव्या इमारतीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
- विशेष अधिवेशनामध्ये आठ विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेमध्ये दुरुस्ती विधेयक, प्रेस व रजिस्ट्रेशनसंदर्भातील विधेयक, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा व अनुसूचित जाती व जमातींसदर्भातील पाच विधेयके संसदेत मंजूर केली जाणार आहेत. मात्र, हीच कार्यक्रमपत्रिका अमलात येईल असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये महिला खासदारांची संख्या व योगदान वाढत गेल्याच्या उल्लेख केला होता. त्यामुळे महिला आरक्षणाचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक संमत करण्याची मागणी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्क्ष सोनिया गांधी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रातून केली होती. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून सर्वपक्षीय बैठकीमध्येही काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी, आज लोकसभेत मांडण्याची शक्यता
- केंद्र सरकारने बोलावलेलं संसदेचं विशेष अधिवेशन सोमवारपासून (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. हे अधिवेशन नेमकं कशासाठी बोलावलं आहे? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. परंतु, आता या अधिवेशनाचं मुख्य कारण समोर आलं आहे. महिला आरक्षण विधेयक या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असेल. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
- या विधेयकाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना बाजूला सारत केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या बहुप्रतिक्षित विधेयकाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आता महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे. विशेष अधिवेशनातच हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत संकेत दिले होते. विशेष अधिवेशन छोटं असले तरी ऐतिहासिक निर्णय घेतले जातील, असंही ते म्हणाले होते.
- संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावरील चर्चेची सुरुवात करताना लोकसभेतील भाषणातही मोदींनी महिला आरक्षणावर भाष्य करत संसदेतील महिला खासदारांच्या योगदानाचे कौतुक केले होते. हे कामकाज संपल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाजमाध्यमाद्वारे दिली. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी महिला आरक्षणला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे संसदेमध्ये या विधेयकाचा मार्ग सुकर असल्याचे मानले जात आहे.
- दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये महिला आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्याचं पाहायला मिळालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महिला आरक्षणाच्या उल्लेखानंतर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली. काँग्रेसच्या या मागणीला इतर पक्षांकडूनही पाठिंबा मिळू लागला. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच, अन्य पक्षांच्या खासदारांनीही ही मागणी केली. विरोधी पक्षांचे खासदार ही मागणी करत असताना केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १६ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १५ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १४ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |