Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |20 September 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२० सप्टेंबर चालू घडामोडी
जेईई, नीट, नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; निकाल असे लागणार
- एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीने पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांबाबत देशभरातील विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहलेली असते. देशातील आयआयटी प्रवेशासाठी जे ई ई परीक्षा सर्वात महत्वाची असते. या परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी तर दुसरा टप्पा १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
- ५ मे रोजी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी परीक्षा होणार आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा १५ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत. तर पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ११ ते २८ मार्च या कालावधीत होईल. युजीसी नेट ही परीक्षा १० ते २१ जून दरम्यान होत आहे.
- सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना दिल्या जाणार आहे. या सर्व संगणक आधारित परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यात जाहीर होतील. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
अमृता शेरगिल यांच्या कलाकृतीला विक्रमी मूल्य; ६१.८ कोटींना चित्राची विक्री
- सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’च्या लिलावामध्ये ६१.८ कोटी रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. शेरगिल यांनी १९३७ साली रेखाटलेल्या या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच्च किंमत आहे.
- यापूर्वी सय्यद हैदर रझा यांच्या १९८९च्या ‘गेस्टेशन’ या चित्राला गेल्याच महिन्यात पुंडोलेंच्या लिलावात ५१.७५ कोटी रुपये किंमत मिळाली होती. सॅफ्रॉनआर्ट येथे शनिवारी झालेल्या लिलावामध्ये एम एफ हुसैन, वासुदेव गायतोंडे, जामिनी रॉय आणि एफ एस सौझा यासारख्या ७० नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश होता.
- अमृता शेरगिल यांचे ‘द स्टोरी टेलर’ हे चित्र एक मैलाचा दगड आहे. त्यातून त्यांचे कौशल्य आणि अमर वारशाची साक्ष मिळते अशी प्रतिक्रिया ‘सॅफ्रॉनआर्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वझिरानी यांनी व्यक्त केली.अमृता शेरगिल यांची आवडती कलाकृती खुद्द अमृता शेरगिल यांनी ‘द स्टोरी टेलर’ ही आपल्या सर्वोत्तम १२ कलाकृतींपैकी असल्याचे सांगितले होते. हे चित्र त्यांच्या सर्वात प्रामाणिक आणि अभिव्यक्तीपूर्ण रचनांपैकी एक मानले जाते. हे चित्र सर्वात प्रथम नोव्हेंबर १९३७ मध्ये लाहोरच्या फालेती हॉटेल येथे झालेल्या अमृत शेरगिल यांच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
भारतासमोर चीनचे आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरुवात
- अखेरच्या क्षणी संघाची निवड झाल्यामुळे भारतीय फुटबॉल संघ सराव सत्र व पुरेशा विश्रांतीशिवाय मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या साखळी फेरीत चीनचा सामना करेल. इंडियन सुपर लीगच्या काही संघांनी आपल्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग होण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे भारताने शुक्रवारी आपल्या अंतिम संघाची घोषणा केली. संघ रविवारी चीनला रवाना झाला, ज्यामध्ये खेळाडूंना एकत्र सराव करण्याची संधी मिळाली नाही.
- भारताच्या २२ सदस्यीय संघातील दोन खेळाडू बचावपटू कोन्सम चिंगलेनसाना सिंह व लालचुंगनुंगा यांना ‘व्हिसा’ तयार नसल्याने ते नंतर संघासोबत येतील. हे दोघेही चीनविरुद्ध होणाऱ्या सामन्यात उपलब्ध नसतील. त्यामुळे भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री पहिल्या सामन्यात खेळणार नाही. कारण संघ व्यवस्थापन त्यांना पुढील दोन सामन्यांत उतरवण्याच्या विचारात आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सांगितले. भारताकडे बांगलादेश (२१ सप्टेंबर) व म्यानमार (२४ सप्टेंबर) संघांविरुद्ध विजयाची संधी जास्त आहे. चीन मजबूत संघ आहे आणि भारतीय संघ पुरेसा सराव व विश्रांतीशिवाय या सामन्यात खेळेल. या सर्व परिस्थितीकडे पाहता मुख्य प्रशिक्षकांना आपली रणनीती आखावी लागली.
- चीन आपल्या देशात खेळत असल्याचा फायदा त्यांना मिळेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोन्ही देशांमधील अखेरचा सामना २००२ मध्ये कोरियाच्या बुसान येथे झाला होता. त्यावेळी भारताला ०-२ असे पराभूत व्हावे लागले होते. चीनविरुद्ध सामना जिंकण्याची भारताला कमी संधी असल्याची कल्पना स्टिमॅच यांना आहे. ‘‘चीनचा संघ बऱ्याच काळापासून एकत्र सराव करत आहे. त्यांनी मार्चमध्ये मजबूत संघांविरुद्ध चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना तीनमध्ये पराभव तर, एका सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आम्ही साखळी फेरीच्या पुढे आगेकूच करू शकतो. मात्र, त्यासाठी आम्हाला नशिबाचीही साथ मिळायली हवी. यासह संघातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीही करावी लागेल,’’ असे स्टिमॅच यांनी सांगितले. संघांची विभागणी सहा गटात करण्यात आली आहे. गटातील शीर्ष दोन संघ आणि दुसऱ्या स्थानावर असणारे चार सर्वश्रेष्ठ संघ उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करतील.
“भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान
- गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली असून, इंधन, वीज आणि धान्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिस्थितीला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माजी लष्करप्रमुख आणि न्यायाधीशांना जबाबदार धरलं आहे. तसेच, ‘भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय,’ असं विधान शरीफ यांनी केलं आहे.
- लंडनस्थित असलेल्या नवाझ शरीफ यांनी सोमवारी ( १८ सप्टेंबर ) दूरदृष्शप्रणालीच्या माध्यमातून लाहोरमधील पक्षाच्या बैठकीला संबोधित केलं. शरीफ म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताने यशस्वीरित्या जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरातून पैशांची भीक मागत आहेत. भारताने जे साध्य केलं, ते पाकिस्तान का करू शकला नाही?”
- “भारत सरकारने १९९० साली आर्थिक सुधारणा केल्या होत्या. त्याचं पालन भारताने केलं,” असा दावा शरीफ यांनी केला आहे.
- “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा, भारताकडे फक्त १ अब्ज डॉलर होते. पण, आता भारताकडे परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर झाला आहे. भारत आज कुठं पोहोचला आणि काही रूपयांसाठी भीक मागणारा पाकिस्तान मागे का राहिला?” असा सवाल नवाझ शरीफ यांनी उपस्थित केला आहे.
- दरम्यान, चार वर्षापासून लंडन येथे वास्तव्यास असणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार आहेत. “२१ ऑक्टोबरला नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतणार आहेत,” असं माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितलं.
चांद्रयान-३ साठी लाँचपॅड तयार करणाऱ्या तंत्रज्ञावर इडली विकायची वेळ, व्यथा ऐकून पाणावतील डोळे
- २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने जागतिक विक्रम केला. भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश ठरला. पण चांद्रयान-३ साठी लाँचर पॅडची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. यातील काही तंत्रज्ञांवर इडली, चहा आणि तर काहींवर मेमोज विकण्याची वेळ आली आहे.
- ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, रांची येथील Heavy Engineering Corporation Limited (HEC)ने मागील काही वर्षांत इस्रोसाठी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेलं लाँचर पॅडही याच कंपनीने निर्माण केल्याचा दावा केला जात आहे. पण या कंपनीच्या २८०० कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामुळे रांचीच्या धुर्वा येथील ‘हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ (HEC) चे कर्मचारी आंदोलन करत आहेत.
- पगार न मिळाल्याने अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आहे. एचईसीचे तंत्रज्ञ दीपक कुमार उपरारिया हे गेल्या काही दिवसांपासून इडली विकत आहेत. रांचीच्या धुर्वा भागातील जुन्या विधानभवनासमोर त्यांचं दुकान आहे. ते दररोज सकाळी इडली विकतात आणि दुपारी ऑफिसला जातात. पुन्हा संध्याकाळी ते इडली विकतात आणि मग घरी जातात.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १९ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १८ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १७ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १६ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
- १५ सप्टेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |