२ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |2 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ मे चालू घडामोडी

जगज्जेत्या लिरेनमुळे चीनची बुद्धिबळाच्या पटावरील घोडदौड कायम!

  • जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद, ऑलिम्पियाडमध्ये पुरुष व महिला संघांचे सुवर्णयश, महिलांमध्ये जू वेन्जून जगज्जेती आणि त्यापाठोपाठ पुरुषांमध्ये डिंग लिरेनला जगज्जेतेपद. गेल्या काही वर्षांतील या यशामुळे जागतिक बुद्धिबळातील चीनची प्रगती आणि वर्चस्व अधोरेखित होत आहे.
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डिंग लिरेनने रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला नमवत जगज्जेतेपदाचा मान मिळवला. जगज्जेतेपद मिळवणारा लिरेन हा एकूण १७ वा आणि चीनचा पहिला बुद्धिबळपटू ठरला. मात्र, या अलौकिक यशासाठी लिरेनला २५ दिवस, १४ पारंपरिक डाव आणि ‘टायब्रेकर’चे चार डाव संघर्ष करावा लागला.
  • गेले दशकभर जगज्जेतेपद राखणाऱ्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतल्यामुळे लिरेन आणि नेपोम्नियाशी यांना संधी निर्माण झाली. या दोनही खेळाडूंनी जागतिक लढतीत हार न मानण्याची वृत्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे १४ पारंपरिक डावांअंती लढतीत ७-७ अशी बरोबरी होती. यानंतर ‘टायब्रेकर’मधील तीन डाव बरोबरीत सुटले. परंतु चौथ्या डावात कमी वेळ शिल्लक असतानाही लिरेनने आक्रमक चाली रचत विजय संपादला.
  • या लढतीच्या सुरुवातीला लिरेनला वेळेवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. चाली रचण्यासाठी वेळ कमी असल्याने त्याच्याकडून चुका झाल्या. मात्र, या चुकांमधून तो शिकला आणि ‘टायब्रेकर’मध्ये हीच शिकवण त्याच्या कामी आली.

दहशतवादी वापरत असलेल्या ‘या’ १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर मोदी सरकारकडून बंदी, पाहा यादी

  • देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अ‍ॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी जम्मू काश्मीरमधील त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी हे १४ अ‍ॅप्स वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
  • या १४ अ‍ॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema चा समावेश आहे. आता सरकारने हे १४ अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत.
  • तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हे अ‍ॅप्स डेव्हलप करणारे डेव्हलपर्स भारतातील नाहीत, तसेच हे अ‍ॅप्स भारतातून ऑपरेट केले जात नव्हते. त्यांचं कोणत्याही प्रकारचं कार्यालय भारतात नाही. तसेच कोणतीही माहिती घेण्यासाठी आपण हे अ‍ॅप्स बनवणाऱ्या कंपन्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करू शकत नाही.
  • हे अ‍ॅप्स इतक्या बारकाईने डिझाईन केले आहेत की, या अ‍ॅप्सना किंवा त्यावरील संदेशांना ट्रॅक करता येत नाही. तसेच हे अ‍ॅप्स बनवणाऱ्या डेव्हलपर्सना शोधणं देखील अवघड आहे. देशातील विविध तपास यंत्रणांनी या अ‍ॅप्सवर लक्ष ठेवल्यानंतर लक्षात आलं की, या अ‍ॅप्सचा वापर दहशतवाद्यांकडून होत आहे. तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी त्यांच्या काश्मीरमधील सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचं आढळलं.

युजर्सना मोठा धक्का! सहा महिन्यांची वैधता असणारा ‘हा’ जबरदस्त प्लॅन केला बंद

  • भारत देशामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने ५४९ रुपयांचा एक नवीन प्लॅन देखील लॉन्च केला होता. मात्र आता या ५४९ रूपयांच्या प्लॅनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
  • वोडफोन आयडिया कंपनीने नुकताच आपला ५४९ रुपयांचा प्रीपेड रीचार्ज प्लॅन सादर केला होता. त्याची वैधता १८० दिवसांची होती. हा कंपनीचा हा लेटेस्ट लॉन्ग टर्म असणारा प्लॅन होता. ज्यामध्ये वापरकर्त्यांना १८० दिवसांची वैधता मिळणार होती. हा प्लॅन सुरू करून काही दिवस झालेले असतानाच हा प्लॅन कंपनीने बंद केला आहे. कंपनीने हा प्लॅन पोर्टफोलियोमधून काढून टाकला आहे. आता हा रीचार्ज प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवरून आणि मोबाइल App वरुन देखील काढून टाकण्यात आला आहे.

५४९ रुपयांच्या रीचार्ज प्लॅनमधील फायदे

  • ५४९ रुपयांचा व्हीआयचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना १८० दिवसांची वैधता मिळत होती. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा वापरायला मिळणार होता. तुम्हाला जर का अतिरिक्त डेटा हवा असेल तर तुम्हाला एक्सट्रा डेटा व्हाउचर खरेदी करावे लागणार होता. व्हीआयच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नॅशनल आणि लोकल कॉलिंगसाठी प्रति सेकंदाला २.५ पैसे मोजावे लागणार होते. म्हणजेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध नव्हता. तसेच व्हीआयच्या या प्लॅनमध्ये एसएमएस करण्याची देखील सुविधा मिळणार नव्हती. जे vi चे सिम हे अतिरिक्त पर्याय म्हणून वापरत असतील त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय होता.
  • एअरटेल कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी ५४९ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची वैधता ही ५६ दिवसांची आहे. यामध्ये २ जीबी डेटा प्रत्येक दिवशी वापरायला मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएस देखील करता येतात. एअरटेल वापरकर्ते याप्लॅनसह Xstream अ‍ॅप अ‍ॅक्सेस, Apollo 24/7 circle आणि फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक , Wynk Music चा अ‍ॅक्सेस असे फायदे देखील मिळतात.

करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; दहा दिवसांत आठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे

  • राज्यामध्ये मार्चपासून करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आता हळूहळू कमी होत आहे. मात्र त्याच वेळी करोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मागील १० दिवसांत राज्यात ६ हजार ३८५ इतके करोना रुग्ण आढळले. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे त्यापेक्षा दोन हजारांने अधिक आहे. दहा दिवसांत राज्यात ८ हजार ४८७ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
  • राज्यासह देशातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अचानक मार्चच्या सुरुवातीपासून करोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. यामध्ये रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असली तरी करोनाचा प्रसार वेगाने होत होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारकडून योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या. तसेच रुग्णालये, डॉक्टर, महानगरपालिका यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्या करण्यावर भर देण्यात आला.
  • दर आठवडय़ाला सरासरी १३ ते १४ हजारांपेक्षा अधिक करोना चाचण्या करण्यात येत होत्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांचे प्रमाणही वाढल्याने दैनंदिन करोना रुग्णांचा दरही कमी झाल्याचे दिसून येत आहे. या चाचण्यांमधून करोनाबाधित रुग्णांचा मागील आठवडय़ातील दर हा ६.३ टक्के इतका होता. तो या आठवडय़ात ४.३ टक्के इतका झाला. करोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही मागील १० दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
  • राज्यात मागील १० दिवसांत ८ हजार ४८७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. दररोज साधारणपणे बाधित रुग्णांच्या तुलनेत २०० ते ३०० रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. करोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने मृत्यू रोखण्यासाठी शासनाने करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे दिसून येत आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.