२० मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२० मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |20 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२० मार्च चालू घडामोडी

भारताने नोंदवला वनडेतील सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० गडी राखून ऐतिहासिक विजय

  • तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २६ षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत १२१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. हा भारतीय संघाचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
  • ५०-५० षटकांचा हा एकदिवसीय सामना एकूण ३७ षटकांत संपला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. इतकेच नाही एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताविरुद्ध वनडे दोनदा १० विकेट्सने विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. आता मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणारा तिसरा सामना निर्णायक असणार आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमधील चेंडू शिल्लक राहण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. डावात २३४ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. यापूर्वी न्यूझीलंडने २०१९ मध्ये ही कामगिरी केली होती. न्यूझीलंडने २१२ चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाचा पराभव केला. याशिवाय एका संघाने भारताविरुद्ध कमीत कमी षटकांत लक्ष्य गाठले आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडने २०१९ मध्ये हॅमिल्टनमध्ये १४.४ षटकात २ गडी गमावून ९३ धावा करून भारताचा पराभव केला होता.

भारताविरुद्ध सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठा विजय :

  • १.ऑस्ट्रेलिया – २३४ चेंडू, विशाखापट्टणम २०२३
  • २. न्यूझीलंड – २१२ चेंडू, हॅमिल्टन २०१९
  • ३. श्रीलंका – २०९ चेंडू, डंबुला २०१०
  • ४. श्रीलंका – १८१ चेंडू, हंबनटोटा २०१२
  • ५. श्रीलंका – १७६ चेंडू, धर्मशाळा २०१७

चालक पदासाठी २६ मार्च, तर शिपाईसाठी २ एप्रिलला पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा

  • मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. चालक पदासाठी दि. २६ मार्चला, तर शिपाई पदासाठी दि. २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. 
  • मुंबईवगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. नगर जिल्हा पोलीस दलातील १० चालक पदासाठी ९३ उमेदवार, तर पोलीस शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी १६०६ उमेदवार पात्र ठरवले गेले आहेत. लेखी परीक्षा ९० मिनिटांची व १०० गुणांची असेल. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ असेल.
  • जिल्हा पोलीस दलातील चालक व शिपाई अशा १३९ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एकूण ११२७८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी ६७०७ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. ३६६९ उमेदवार गैरहजर राहिले. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला. उपस्थित उमेदवारांपैकी ६७२१ उमेदवार जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या चाचणीसाठी पात्र ठरले. ८८३ उमेदवार चाचणीपूर्व तपासणीत पात्र ठरले होते.
  • चाचणी दिलेल्या ६७२१ उमेदवारांपैकी ३२७८ उमेदवार उत्तीर्ण झाले. ३४४३ उमेदवारांना २५ पेक्षा कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण ठरविण्यात आले आहे. चालकपदाच्या १० जागांसाठी २१९ उमेदवार उत्तीर्ण झाले, तर शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी ३०५९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. गुणानुक्रमानुसार त्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले गेले आहे.

पुतिन यांची युक्रेनला अचानक भेट

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी मारियुपोल या युक्रेनमधील शहराला अचानक भेट दिली. मारियुपोल हे शहर युक्रेनमधील बंदर असून ते १० महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या भूभागाला दिलेली ही पहिलीच भेट आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने शुक्रवारी अटक वॉरंट बजावल्यानंतर आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यापूर्वी पुतिन यांनी हा दौरा केला.   
  • रशियातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिकृत व्हिडीओमध्ये पुतिन रात्रीच्या वेळी वाहन चालवताना आणि लोकांशी बोलताना दिसतात. पुतिन यांनी शनिवारी क्रिमिया या मारियुपोलच्या नैऋत्य दिशेला असलेल्या जवळच्या शहराला भेट दिली.
  • रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर ताबा मिळवला होता. मारियुपोलला जाण्याचा निर्णय पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे घेतला असे रशियातर्फे सांगण्यात आले. हे शहर रशियन सैन्याच्या ताब्यात जाण्यापूर्वी तिथे अल्प संख्येने असलेल्या युक्रेन सैनिकांनी जोरदार संघर्ष केला होता, त्यामुळे ते युद्धातील युक्रेन सैन्याच्या शौर्याचे प्रतीक बनले आहे. या शहरातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त इमारतींचे नुकसान झाले असून जवळपास साडेतीन लाख लोकांनी शहर सोडले आहे असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. या शहराची पुनर्बाधणी करून तेथील रहिवाशांचे मन जिंकण्यासाठी रशिया प्रयत्नशील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

व्हिसा नसेल तरी भारतीय फिरु शकतात ‘हे’ ४८ सुंदर देश, जाणून घ्या काय आहे जुगाड?

  • तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कदाचित तुम्हाला हे माहित असेल की, अधिकृत भारतीय पासपोर्टसह तुम्हाला २४ देशांमध्ये व्हिसा-फ्रि फिरता येते. पण आता तुम्ही तुमच्या भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये भ्रमंती करु शकता. पण कसे? चला तर मग जाणून घेऊ या.
  • तुम्हाला फक्त एक साधा हॅक वापरुन तुमचा भारतीय पासपोर्ट अपडेट करायचा आहे. तुम्हाला तुमच्या पासपोर्टमध्ये यूएस टूरिस्ट किंवा वर्क व्हिसा हे जोडायचे आहे. याला “व्हिसा-फ्रि ट्रान्झिट” किंवा “ट्रान्झिट व्हिसा” असे म्हणतात.

भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये करु शकता व्हिसा शिवाय प्रवास

  • ट्रॅव्हल कोच आकांक्षा मोंगा यांच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचा भारतीय पासपोर्टवर ४८ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरु शकता. यात सहज भेट देता येणाऱ्या काही देशांमध्ये मलेशिया, अर्जेंटिना, पेरू, सिंगापूर, अल्बेनिया, क्युबा, बहामास आणि इजिप्त यांचा समावेश आहे. आणि तुमच्याकडे यूएस व्हिसा नसल्यास, या या ठिकांनी प्रवास करण्यासाठी तुम्ही फक्त ई-व्हिसासाठी अर्ज करा.
  • हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, व्हिसाचे नियम बदलू शकतात, त्यामुळे प्रवासाचा कोणतीही प्लॅन करण्यापूर्वी तुम्ही ज्या देशाला भेट देण्याची योजना करत आहात त्या देशाच्या दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधणे उत्तम आहे. याव्यतिरिक्त, व्हिसा आवश्यक नसला तरीही, प्रवाश्यांनी अद्याप देशाच्या प्रवेशासाठी आवश्यक नियमांचे पालन केले पाहिजे, जसे की, वैध पासपोर्ट, पुढील प्रवासाचा पुरावा आणि त्यांच्या मुक्कामाच्या कालावधीसाठी पुरेसा बँक बॅलन्स.

भारतीय पासपोर्ट किती शक्तिशाली आहे?

  • भारतीय पासपोर्ट धारक केवळ २४ देशांमध्ये व्हिसा-फ्रि प्रवेशासह ६९ व्या क्रमांकावर आहेत. पासपोर्ट इंडेक्स २०२२ नुसार, त्यांना ४८ देशांसाठी व्हिसा ऑन अरव्हाइल आणि १२६ इतर देशांसाठी व्हिसा आवश्यक आहे.

बीएनपी पारिबा टेनिस स्पर्धा : बोपन्ना-एबडेन जोडीला पुरुष दुहेरीचे जेतेपद

  • भारताचा रोहन बोपन्नाने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅट एबडेनसह बीएनपी पारिबा खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले. या ‘एटीपी’ मास्टर्स (१००० दर्जा) स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवणारा बोपन्ना सर्वात वयस्क खेळाडू बनला आहे. बोपन्ना आता ४३ वर्षांचा आहे. त्याने आणि ३५ वर्षीय एबडेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सच्या वेस्ले कूलहोफ आणि ब्रिटनच्या नील स्कूपस्की या अग्रमानांकित जोडीला ६-३, २-६, १०-८ असे पराभूत केले.
  • आपल्या दहाव्या ‘एटीपी’ मास्टर्सच्या (१००० दर्जा) अंतिम फेरीत सहभाग नोंदवलेला बोपन्ना म्हणाला की,‘‘ माझी ही कामगिरी विशेष आहे. त्यामुळे त्याला टेनिसचे स्वर्ग संबोधले जाते. मी अनेक वर्षांपासून येथे सहभाग नोंदवत आहे आणि अनेकांना मी जेतेपद मिळवतानाही पाहिले आहे. मी आणि मॅट येथे जेतेपद मिळवण्यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. आम्ही अनेक चुरशीचे व कठीण सामने खेळलो. अंतिम सामन्यात आमच्यासमोर सर्वोत्तम खेळाडूंचे आव्हान होते. त्यामुळे हे जेतेपद आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’’
  • बोपन्नाने या कामगिरीनंतर कॅनडाच्या डॅनिएल नेस्टरला मागे टाकले. नेस्टरने २०१५मध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत ४२व्या वर्षी जेतेपद पटकावले होते. बोपन्नाचे एकूण पाचवे आणि २०१७मध्ये मॉन्टेकार्लो खुल्या टेनिस स्पर्धेनंतर पहिले मास्टर्स दुहेरी जेतेपद आहे. भारत व ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा या वर्षांतील तिसरा अंतिम सामना होता.
  • बोपन्ना आणि एबडेन जोडीने उपांत्य फेरीत गतविजेता जॉन इस्नेर आणि जॅक सॉक जोडीला नमवले. त्यापूर्वी, त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमे व डेनिस शापोवालोव जोडीला पराभूत केले. भारत-ऑस्ट्रेलियाच्या जोडीने आपल्या सुरुवातीच्या सामन्यात राफेल माटोस व डेव्हिड वेगा हर्नाडेज जोडीवर विजय मिळवला होता. या कामगिरीचा फायदा बोपन्नाला ‘एटीपी’ दुहेरी क्रमवारीत झाला आहे. बोपन्ना चार स्थानांच्या फायद्यासह ११व्या स्थानी पोहोचला आहे.

राजस्थानात १९ नवे जिल्हे… महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती कधी?

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यावर राज्यकर्त्यांचा भर असतो. लोकांच्या सोयीसाठी जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली, असे कारण देण्यात येत असले तरी त्यामागे राजकीय कारणे अधिक असतात. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १९ नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली. तत्पूर्वी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या राज्यांमध्ये नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. राज्यातही नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी करण्यात येते. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार नव्या जिल्ह्यांची निर्मिती करणार का, याची उत्सुकता असेल.

राजस्थान सरकारने कोणता निर्णय घेतला?

  • राजस्थानमध्ये नव्या १९ जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. राजस्थानमध्ये ३३ जिल्हे होते. परंतु नव्या रचनेत राजधानी जयपूर आणि जोधपूर हे दोन स्वतंत्र जिल्हे म्हणून ठेवण्यात आलेले नाहीत. राजधानी जयपूरची चार जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली. दोन जिल्ह्यांचे स्वतंत्र अस्तित्व काढून टाकण्यात आल्याने आधीचे ३१ तर नवीन १९ असे एकूण ५० जिल्हे या नव्या निर्णयामुळे राजस्थानात झाले आहेत. याशिवाय तीन नवीन महसुली विभागही करण्यात आले आहेत. दहा महसुली विभागांची आता ५० जिल्ह्यांमध्ये विभागणी झाली आहे.

नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे कारण काय?

  • राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्याकरिता सत्ताधाऱ्यांकडून विविध सवलती अथवा प्रलोभने दाखविली जातात. जिल्हा निर्मिती हा विषय फारच संवेदनशील मानला जातो. पुन्हा सत्ता मिळावी या उद्देशाने काँग्रेस सरकारने जिल्ह्यांची निर्मिती करून मतदारांना खूश करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे. छोट्या जिल्ह्यांमुळे कितपत फायदा होतो हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. पण स्थानिक लोकांच्या भावनेला हात घालत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न असतो. सत्ताधारी पक्ष राजकीय लाभाचे निर्णय घेत असतो. त्याचाच नवीन जिल्हा निर्मिती हा भाग आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.