१६ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |16 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ मार्च चालू घडामोडी

रिलायन्स जिओने Jio Plus सह लॉन्च केले नवीन प्लॅन्स, OTT प्लॅटफॉर्मसह मिळणार…

  • रिलायन्स जिओ देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असून त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी Jio Plus सेवा सुरू केली आहे. जिओ प्लस सह कंपनी ग्राहकांना १ महिन्यासाठी अनलिमिटेड सेवा देणार आहे. जिओने ३९९ रुपयांचा एक नवीन प्लान आपल्या ग्राहकांसाठी लॅान्च केला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या असलेल्या जिओचे म्हणणे आहे की , वापरकर्ते या जिओ पोस्टपेड प्लॅनसह तीन अतिरिक्त कनेक्शन देखील जोडू शकतील. प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी, ग्राहकांना ९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन : Jio Plus च्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जर का ग्राहक तीन अतिरिक्त कनेक्शन घेत असतील तर त्यांना एकूण ६९६ रुपये (३९९+९९+९९+९९) भरावे लागणार आहेत. या पोस्टपेड प्लॅनमध्ये एकूण ७५ जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. म्हणजेच, ग्राहकांना एकूण ४ कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमधील एका सिमवर दरमहा सुमारे १७४ रुपये खर्च करावे लागतील.याशिवाय जय ग्राहकांकहा अधिक डेटा खर्च होतो ते १०० जीबीचा प्लॅन घेऊ शकतात. यासाठी पहिल्या कानेक्शनसाठी ६९९ रुपये तर प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाथी ९९ रुपये अधिकचे मोजावे लागतील.
  • जिओ ग्राहकांसाठी असलेल्या ऑफर्स : रिलायन्स जिओच्या नवीन जिओ प्लस प्लॅनसह नेक ऑफर लॉन्च करण्यात आल्या आहेत. Jio True 5G वेलकम ऑफर अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा दिला जाणार आहे. हा डेटा प्लॅन प्रत्येक सिम कार्ड वापरकर्त्याच्या वापरासाठी उपलब्ध असेल. याशिवाय डेटासाठी कोणतीही दैनंदिन मर्यादा नाही म्हणजेच ग्राहक त्यांना पाहिजे तितका डेटा वापरू शकतात.

७०० भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाहून ‘घर’वापसी; बनावट व्हिसाप्रकरणी होणार कारवाई

  • कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचा निर्णय कॅनडा सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी कॅनडातील शैक्षणिक संस्थाना दिलेली कागदपत्रे आणि व्हिसा बनावट असल्याचं उघड झाल्यानंतर कॅनडा बॉर्डर एजन्सीकडून या विद्यार्थ्यांना भारतात जाण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे.
  • “द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या ७०० विद्यार्थ्यांनी जालंधरमधील ब्रिजेश मिश्रा नावाच्या ट्रॅव्हल एजंटद्वारे व्हिसासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून १६ लाख रुपये घेतले होते. यामध्ये कॅनडातील नामांकीत हंबर महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क आणि तिथे राहण्याच्या खर्चाचा समावेश होता.
  • हे ७०० विद्यार्थी २०१८-१९ साली कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले होते. मात्र, कॅनडामध्ये कायमस्वरुपी रहिवासी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यातील आली. यावेळी त्यांनी व्हिसासाठी दिलेले प्रवेश पत्र बनावट असल्याचं उघड झालं. यापैकी अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं असून त्यांनी कॅनडात काम करण्याचा परवानाही प्राप्त केला आहे.
  • जालंधरमधील एका ट्रॅव्हल एजंटने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, की या प्रकरणी विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयाचे प्रवेश प्रत्र देण्यात आली, ज्या महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एकतर महाविद्यालय बदलण्याची पाळी आळी, किंवा त्यांना पुढच्या सेमीस्टरपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे व्हिसासाठी अर्ज करताना त्यांच्या कागदपत्रांवर चालू सेमीस्टरचा उल्लेख नव्हता.

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

  • माजी बिशप पी.सी. सिंहच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सीएनआय) विविध कार्यालयांवर ‘ईडी’कडून बुधवारी छापेमारी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने ‘सीएनआय’च्या नागपुरातील सदर परिसरात असलेल्या कार्यालयावरदेखील धाड टाकली. यावेळी दोन तास शोधमोहीम चालली व विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.
  • मागील दोन आठवड्यांतील नागपुरातील ‘ईडी’ची ही दुसरी मोठी कारवाई आहे. वादग्रस्त बिशप पी.सी. सिंहने ‘सीएनआय’अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अनेक गैरप्रकार केले. याशिवाय संस्थेच्या जमिनी व इतर आर्थिक बाबींमध्येदेखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पी.सी. सिंहला नागपूर विमानतळावरून अटक केली होती.
  • ‘ईडी’नेदेखील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ‘ईडी’ने देशभरातील ११ जागांवर बुधवारी छापे मारले. यात नागपुरातील कार्यालयाचादेखील समावेश होता. ‘सीएनआय’च्या सदर भागातील कार्यालयाची यावेळी झडती घेण्यात आली. यावेळी तेथील विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व बरीच महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे ‘सीएनआय’च्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली.

शालांत विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणवाढीस पुन्हा मुदतवाढ, या तारखेपर्यंत..

  • शास्त्रीय कला, चित्रकलेत प्रावीण्य व लोककला प्रकारात सहभागी दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.
  • प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२३ अशी नवी मुदत मिळाली. मात्र, या मुदतीत काही तांत्रिक कारणास्तव माध्यमिक शाळांना गुणवाढीचे प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही. परिणामी, पात्र विद्यार्थी या गुणांपासून वंचित ठरणार होते. हे घडू नये म्हणून बुधवारी सायंकाळी राज्य शिक्षण मंडळाने वाढीव मुदत जाहीर केली आहे.
  • प्रस्ताव २० मार्चला सायंकाळपर्यंत सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे वाढीव मुदत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संपात सहभागी शिक्षक व मुख्यध्यापक यांनाच हे प्रस्ताव सादर करायचे असल्याने ते काय भूमिका घेणार ही औत्सुक्याची बाब ठरते.

आरसीबी संघाला मोठा धक्का! १४० षटकार लगावणारा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

  • आयपीएल २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे, परंतु अनेक खेळाडू स्पर्धा सुरु होण्यापूर्वी दुखापतींच्या कारणामुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे काही फ्रँचायझींना मोठा फटका बसला आहे. अशात आरसीबी संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. कारण आरसीबीचा खेळाडू विल जॅक दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३.२ कोटींमध्ये करारबद्ध केले होते.
  • त्याला मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलला कव्हर द्यायचे होते, पण बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.
  • मायकेल ब्रेसवेलशी चर्चा – ईएसपीएन क्रिकइंफोमधील वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल याच्याशी जॅकची संभाव्य बदली म्हणून चर्चा करत आहे. ब्रेसवेल यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. डिसेंबरच्या लिलावातही तो विकला गेला नाही, त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये आहे. २ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पहिला सामना होणार आहे.
  • घरच्या मैदानावर ४ वर्षांनंतर पहिलाच सामना – बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांच्या घरच्या मैदानावर मे २०१९ नंतरचा हा त्यांचा पहिला सामना असेल. रीस टोपले, जॅक सरे यांनाही आरसीबीने लिलावात करारबद्ध केले. हंगामाच्या सुरुवातीला ते वेळेत तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. या हिवाळ्यात जॅकने तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. बांगलादेशमध्ये एकदिवसीय पदार्पण करण्यापूर्वी त्याने पाकिस्तानमध्ये टी-२० आणि कसोटी कॅप्स मिळवली होती.
  • विल जॅक्सने १४० षटकार लगावले आहेत – विल जॅक्स हा टी-२० चा जबरदस्त फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १०९ सामन्यांच्या १०२ डावांमध्ये २९.८० च्या सरासरीने २८०२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १०८ धावांच्या नाबाद शतकी खेळीसह २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर १४० षटकार ४९ चौकार आहेत. जॅक गोलंदाजीही करतो. त्याने ४२ डावात २६ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र तो आतापर्यंत आयपीएल खेळलेला नाही.

BCCI ने आयपीएल २०२२ साठी बदलले ‘हे’ महत्त्वाचे नियम :

  • IPL 2022 New Rule: आयपीएल २०२२ मध्ये अनेक नवीन नियम पाहायला मिळतील. आयपीएलच्या १५व्या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या खेळात काही मोठे बदल केले आहेत. आयपीएलच्या नवीन हंगामात अनेक डीआरएस रेफरल्स असतील. कोविड-१९ मुळे आयपीएलचे नियमही अपडेट करण्यात आले आहेत. बीसीसीआयने एमसीसीच्या नवीन नियमांमध्ये आणखी एक नियम जोडला आहे की, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू स्ट्राइक घेतील.
  • IPL नियम बदल क्रमांक १ – जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर तो सामना नंतर पुन्हा शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल.
  • IPL नियम बदल क्रमांक २ – आयपीएल २०२२ मधील दुसरा सर्वात महत्वाचा बदल DRS बाबत आहे. नवीन नियमानुसार, बीसीसीआयनुसार, प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या एक वरून दोन करण्यात आली आहे. बीसीसीआयने हा निर्णय मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) नुकत्याच दिलेल्या सूचनेच्या समर्थनार्थ घेतला आहे की, फलंदाज झेल घेत असताना क्रिझच्या मध्यभागी असला तरीही नवीन फलंदाजाने स्ट्राइकवर यावे.
  • टाय झाल्यानंतरचा नियम – आयपीएल २०२२ मध्ये आणखी एक नियम खूप खास असणार आहे. या वेळी बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात टाय झाल्यानंतर, सुपर ओव्हर किंवा त्यानंतर सुपर ओव्हरने कोणताही निर्णय न झाल्यास लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल. जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल. याचाच अर्थ आता सर्व संघांसमोर हे आव्हान असेल की प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याबरोबरच या संघाला गट टप्प्यातही अव्वल स्थान मिळवावे लागेल.

१६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना करोना लस, अशी करा नोंदणी :

  • देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दररोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. २४ तासांत २,५०३ लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ही संख्या ६८० दिवसांतील सर्वात कमी आहे. ३ मे २०२० रोजी संसर्गाची २,४८७ प्रकरणे होती. संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या देखील ३६,१६८ वर आली आहे. करोनावर मात मिळवण्यासाठी वेगाने लसीकरण मोहीम सुरु आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, देशात १६मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होईल. सध्या देशातील ६० वर्षांवरील सर्व लोकांना करोनावरील बुस्टर डोस दिला जाणार आहे. याआधी हा डोस फक्त या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या लोकांनाच दिला जात होता. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने वैद्यकीय संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर १२-१३ वर्षे आणि १३-१४ वर्षे वयोगटातील (२००८ ते २०१० मध्ये जन्मलेल्या) मुलांसाठी अँटी-करोना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना हैद्राबाद येथील बायोलॉजिकल ई कंपनीने निर्मित ‘कोर्बेवॅक्स’ या अँटी-करोनाव्हायरस लसीचा डोस दिला जाईल. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित असल्याचं मांडवीय यांनी ट्विट केलं आहे. मला कळविण्यात आनंद होत आहे की,”१६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे.” तसेच ६० वर्षांवरील प्रत्येकाने बुस्टर डोस घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं.

हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय :

  • हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.
  • दरम्यान, या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
  • कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून वाद सुरू झाला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
  • कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

मल्याळी वृत्तवाहिनीवरील मनाई आदेशास स्थगिती :

  • सुरक्षेच्या कारणावरून मीडिया वन या मल्याळी वृत्तवाहिनीच्या प्रसारणास मनाई करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. या वाहिनीचे प्रक्षेपण पुढील आदेशापर्यंत पूर्वीसारखेच सुरू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
  • केंद्राच्या निर्णयास विरोध करणाऱ्या या वाहिनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १० मार्च रोजी सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. या वाहिनीला ३१ जानेवारीस सरकारने मनाई आदेश बजावला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या वाहिनीचे प्रसारण आधीसारखेच सुरू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  
  • न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. सूर्य कांत आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. या वाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय ज्या कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आला, त्यांचा तपशील या वाहिनीला त्यांची बाजू मांडण्यासाठी उपलब्ध करून द्यावा की नाही, हा प्रश्न न्यायालयाच्या विचाराधीन आहे. केंद्राच्या मनाई आदेशाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला या वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याबाबत केंद्राने प्रतिज्ञापत्राद्वारे आपली तपशीलवार बाजू २६ मार्चपर्यंत मांडावी असे न्यायालयाने सांगितले आहे.

युक्रेनमधून परतण्यास अनेक विद्यार्थ्यांचा नकार :

  • युद्धग्रस्त युक्रेनमधून आत्तापर्यंत २२ हजार भारतीय नागरिकांना मायदेशात आणले गेले आहे. तिथे दैनंदिन अनंत संकटांचा सामना करावा लागत असूनदेखील कित्येक विद्यार्थ्यांनी परत येण्यास नकार दिला असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
  • रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने गंगा मोहीम सुरू केली होती. त्यासाठी नोंदणी करण्याची विनंतीही युक्रेनमधील भारतीय नागरिकांना केली होती. त्याद्वारे प्रामुख्याने युक्रेनमध्ये वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यमर्ना भारतात येण्यासाठी विमानांची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.
  • बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत आहेत. युक्रेनमधील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगितले आहे, त्यांनी ऑनलाइन वर्ग घेण्यासही नकार दिला आहे. तरीही अनेक विद्यार्थी भारतात परत येण्यास तयार नाहीत. देशातील ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून युक्रेनमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी गेले आहेत. केरळ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तामीळनाडू, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून प्रत्येकी एक हजार विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता, असे जयशंकर म्हणाले.
  • सध्या पूर्व युक्रेनमध्ये युद्ध अधिक उग्र बनले असून प्रामुख्याने या भागांतील विद्यापीठांमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे तिथून विद्यार्थाना मायदेशी आणले गेले. गंगा मोहिमेअंतर्गत विमानांच्या ९० फेऱ्या झाल्या असून त्यापैकी ७८ नागरी विमानांमधून नागरिकांना मायदेशी सुखरूप आणले गेले. रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या देशांतून या नागरिकांना आणण्यासाठी लष्करी विमानांचा तसेच, खासगी विमानांचा वापर केला गेला, असे जयशंकर यांनी सांगितले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.