१५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |15 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१५ मार्च चालू घडामोडी

स्कायच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! जिओ सिनेमाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सूर्यकुमार यादवची वर्णी

  • जिओ सिनेमाने सूर्यकुमार यादव यांची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नवीन करारामध्ये सूर्यकुमार यादव ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेले अनेक उपक्रम आणि सोशल मीडिया सहयोग यांचा समावेश असेल. जे क्रिकेटचे प्रदर्शन करणाऱ्या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा दृष्टीकोन वाढवू शकतात.
  • ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी जिओ सिनेमा सोबत सहयोग करताना आनंद होत आहे. जिओ सिनेमा त्याच्या जागतिक दर्जाच्या सादरीकरणासह जगभरातील क्रीडा चाहत्यांसाठी डिजिटल पाहण्याचा अनुभव बदलत आहे, जे स्वस्त आणि सुलभ आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन घडामोडी घडत असल्याने, ही चाहत्यांची पसंतीची निवड झाली आहे, मी या रोमांचक भागीदारीची वाट पाहत आहे.”
  • Viacom18 स्पोर्ट्सचे सीईओ अनिल जयराज म्हणाले, “आम्ही ज्या गुणांसाठी उभे आहोत, त्याच गुणांचे प्रतिनिधित्व सूर्यकुमार यादव करतो. जागतिक दर्जाचे नावीन्य, अतुलनीय रोमांच आणि चाहत्यांना मनोरंजन आणि गुंतवून ठेवण्याची गरज आहे. टाटा आयपीएलचे आमचे सादरीकरण सूर्यकुमारची 360-डिग्री बॅटिंगची धमाकेदार शैली दर्शवेल, ज्यामुळे ग्राहकांना प्रवेश, परवडणारीता आणि भाषेच्या मर्यादांशिवाय संपूर्ण नऊ-यार्ड गेम डिजिटलवर पाहता येईल.”
  • जिओ सिनेमा ही Viacom18 च्या मालकीची भारतीय ओटीटी स्ट्रीमिंग सेवा आहे, जी ५ सप्टेंबर २०१६ रोजी लाँच झाली होती. या घडामोडीपूर्वी, या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई इंडियन्स (MI) च्या फलंदाजाला TIGC, द इंडियन गॅरेज कंपनीच्या D2C मेन्स वियर कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणूनही नियुक्त केले होते. सूर्यकुमार यादव या आठवड्याच्या अखेरीस शुक्रवारी, १७ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिसणार आहे.

आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी, WEF ने पाठ थोपटली

  • वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने २०२३ मधल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते यांच्यासह ७ भारतीय तरुणांचा समावेश केला आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, बायोझिनचे सीईओ बी. जोसेफ, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • जागतिक आर्थिक परिषदेने यावर्षी ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवा नेत्यांची यादी जाहीर करताना म्हटलं आहे की, हे तरुण संवाद करण्यास सक्षम आहेत. सक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते आर्थिक समावेशापर्यंत तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये सहभागी आहेत. यातले अनेक सदस्य नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्र प्रमुख, फॉर्च्यून ५०० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते बनले आहेत.
  • १२० देशांमध्ये तरुणांचा समावेश : World Economic Forum ने म्हटलं आहे की, या वर्षाच्या यादीत १०० युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे जे राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, परिवर्तनात्मक संशोधनासारख्या गोष्टींमध्ये सहभागी असलेले, भविष्यवादी विचारसरणी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १२० देशांमधल्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.

मोदीजी, ऑस्करचे तरी श्रेय घेऊ नका!, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा टोमणा; राज्यसभेत पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन

  • आरोप-प्रत्यारोपांच्या संघर्षमय वातावरणातही मंगळवारी राज्यसभेत हलके-फुलके क्षण सदस्यांना अनुभवता आले. दोन भारतीय चित्रनिर्मितींना प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल वरिष्ठ सभागृहात पुरस्कारविजेत्यांचे कौतुक करण्यात आले. इथेही अभिनंदनाच्या भाषणात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही.
  • ‘या पुरस्कारांचे श्रेय मोदींनी घेऊ नये.. पहिल्यांदाच भारतीय चित्रनिर्मितीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. दोन्ही पुरस्कारांचे मानकरी दक्षिण भारतीय असून त्यांचा मला अभिमान वाटतो. मला इथे भाजपला एकच विनंती करायची आहे की, या पुरस्कारांचे श्रेय त्यांनी घेऊ नये. नाही तर म्हणाल की, कविता आम्हीच लिहिली, नृत्य दिग्दर्शन आम्हीच केले, मोदींनी हा चित्रपट दिग्दर्शित केला..’, असे खरगे मिश्कीलपणे म्हणाले.
  • खरगेंनी केलेली ही गंमत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मनावर घेतली नाही, उलट त्यांनीही खरगेंच्या विनोदाला भरभरून दाद दिली. पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, एस. जयशंकर, मनसुख मंडाविया या केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेचे सभापती जगदीप धनखडही सभागृहातील हास्यकल्लोळात सहभागी झाले. ‘आर. आर. आर.’ या तेलुगु चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यासह ‘एलिफंट विस्परर’ या माहितीपटाला ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार पहिल्यांदाच भारतीय चित्रनिर्मितीला मिळाला आहे. राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहरामध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ऑस्करविजेत्यांचे अभिनंदन केले.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, ‘या’ संघटनेनं घेतली माघार

  • महाराष्ट्रातील सुमारे १८ लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहे. आपल्या विविध मागण्यासाठी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत हा संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सोमवारी कर्मचारी संघटनेच्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती.
  • पण या चर्चेतून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शासकीय कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून संपावर जाण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील विविध शासकीय कार्यालयातील जवळपास १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कर्मचारी संपावर गेल्यानंतर सरकारी कामाचा फज्जा उडाला आहे.
  • अशी एकंदरीत स्थिती असताना १८ लाख कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडली आहे. प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटेनेनं संपातून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना दिली. या संघटनेत राज्यभरात जवळपास अडीच लाख कर्मचारी आहेत.

राज्यात बहुतांश ठिकाणी जनसुविधा सेवा कोलमडण्यास सुरुवात

  • जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केल्यावर जनतेचे हाल सुरु झाले असून बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला आहे.
  • प्रचंड आर्थिक बोजामुळे जुन्या निवृत्तीवेतन योजनेची मागणी मान्य करणे अशक्य असले तरी शिक्षक आणि अन्य कर्मचारी संघटनांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडग्यासाठी चर्चा सुरु आहे.
  • राजपत्रित अधिकारी महासंघाने या संपाला पाठिंबा जाहीर केला असला तरी ते २८ मार्चपासून संपात उतरणार आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग आणि कंत्राटी कर्मचारी आणि राज्यातील काही महापालिकांमधील कर्मचारी कामावर होते. मात्र जिल्हा परिषदांमध्ये कडकडीत संप असल्याने पाणी, कर बिले, स्थानिक स्वराज्य संस्थांची देयके, जन्म-मृत्यू दाखले आणि अन्य जनसुविधांच्या कामांना फटका बसला होता. महसूल कर्मचारी संपात सामील झाल्याने सातबारा फेरफार, दस्तनोंदणी आणि अन्य कामे बहुतांश ठिकाणी होऊ शकली नाहीत.
  • परिवहन कर्मचारी संपात उतरल्याने राज्यभरातील बहुतांश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता आणि वाहन परवाना नोंदणी, मुदतवाढ, नवीन वाहन नोंदणी आदी सर्व कामे ठप्प झाली होती.

बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही

  • कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे राज्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. शासकीय कर्मचारी संपाचा या परीक्षेवर परिणाम झालेला नाही.
  • जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या संपाचा परिणाम परीक्षांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
  • मात्र बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत महासंघाने जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बारावीची आजची परीक्षा वेळेवर, कोणत्याही अडचणींविना सुरू झाली आहे.

जागतिक युवा नेत्यांच्या यादीत आदित्य ठाकरे, मधुकेश्वर देसाई

  • ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने प्रसिद्ध झालेल्या ‘जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह देशभरातील सहा तरुण नेत्यांचा समावेश आहे.
  • अन्य भारतीयांमध्ये ‘टीव्हीएस मोटर’चे व्यावस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, ‘जिओ हाप्तिक टेक्नॉलॉजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आक्रित वैश, ‘बायोझीन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विबिन बी. जोसेफ आणि ‘पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी रत्न यांचा समावेश आहे.
  • ४० वर्षांखालील जगातील सर्वात आश्वासक युवा नेतृत्वाची यादी दरवर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने प्रसिद्ध केली जाते.
  • ‘‘विविध क्षेत्रातील  युवा आणि उदयोन्मुख तरुणांची एकूणच कार्यक्षमता आणि त्यांचे कौशल्य, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आदी गुणांच्या आधारे ही यादी तयार केली जाते,’’ असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यंदाच्या यादीत राजकीय नेते,  उद्योजक, खेळाडू, संशोधक यांच्यासह १०० जणांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी दणदणीत विजय ; T20 नंतर कसोटीतही ‘क्लीन स्वीप’ :

  • भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत २३८ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. याचबरोबर दोन सामन्यांची ही कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. भारताने T20 नंतर कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप दिला आहे.
  • श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झालेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ २०८ धावाच करू शकला. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १५ वा मालिका विजय आहे. या अगोदर भारताने घरच्या मैदानावर डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती. तेव्हा टीम इंडियाचं नेतृत्व एमएस धोनीकडे होतं.
  • भारताकडून रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने डेल स्टेनला मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.
  • दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने एक गडी गमावून २८ धावा केल्या होत्या. पहिल्याच षटकात लाहिरू थिरिमाने खाते न उघडता बाद झाला., जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. तर कर्णधार दिमुथ करुणारत्ने १० आणि कुसल मेंडिस १६ धावांवर खेळत होते.

टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :

  • टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनाक्रमाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज(सोमवार) यासाठी मंजुरी देण्यात आली.
  • टाटा सन्सने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते, त्यानंतर यासाठी अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र, आता या सर्वोच्च पदावरील नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
  • सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली आहे. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरेदी करण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या. खरंतर ‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. त्यांनी ती सरकारला विकली होती, पण आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे. 
  • मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण १६ मार्चपासून सुरू होणार :

  • देशभरात करोना महमारीची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर करोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता देशभरात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाणार आहे.
  • या मुलांना करोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारापसून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही करोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या वर्षीच्या सुरूवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • “मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.

उन्हाळ्याची सुट्टी पडणार महागात? देशांतर्गत विमानप्रवास महागला; तिकीटात १५ ते ३० टक्क्यांची वाढ :

  • उन्हाळ्याच्या सुट्ट्या लवकरच सुरू होतील. मात्र या सुट्ट्यांच्या तोंडावरच आता विमान प्रवास महागल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने विमानप्रवासाच्या खर्चात १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • कच्च्या तेलाच्या भावात तेजी असल्याने विमान कंपन्यांनी देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यात देशार्गंत विमानांच्या तिकीटामध्ये १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे करोनाचा प्रभाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परदेशगमन स्वस्त होऊ शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे. करोना काळात देशाबाहेरील विमान उड्डाणांवर निर्बंध असल्याने विमान प्रवास महाग झाला होता.
  • इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म इक्सिगोने सांगितले की, २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान दिल्ली ते मुंबई एकावेळच्या प्रवासाचे तिकीट प्रति प्रवासी ५,११९ रुपये एवढे होते. मात्र त्यानंतर आता हे तिकीट २६ टक्क्यांनी महागले आहे. याचप्रमाणे कोलकाता ते दिल्ली दरम्यानच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. हा प्रवास तब्बल २९ टक्क्यांनी महागला आहे.

लोकसभेत मोदींचा जयघोष :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जयघोषा’मुळे लोकसभेचे सभागृह सोमवारी सकाळी दणाणून गेले! मोदी सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी ‘मोदी-मोदी’चा उद्घोष केला आणि बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.
  • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू होताच मोदी लोकसभेत आले. त्या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सदस्यांना सभागृहाच्या विशेष कक्षात बसलेल्या परदेशी पाहुण्यांची माहिती देत होते.
  • ऑस्ट्रियाच्या संसदेतील सदस्यांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून ते सोमवारी लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी सभागृहात उपस्थित होते. त्याच वेळी मोदी सभागृहात आल्यामुळे बिर्लाना बोलणे थांबवावे लागले. भाजपच्या सदस्यांनी मोदींचे स्वागत इतक्या उत्साहात केले की, अखेर बिर्लाना सदस्यांना मोदींच्या नावाने होणाऱ्या घोषणा थांबवण्याची विनंती करावी लागली.
  • पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये बहुमताने विजय मिळवला. भाजपच्या या यशाचे श्रेय फक्त मोदींना असल्याचे लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी दाखवून दिले. मोदींचे स्वागत होत असताना सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी भाजपचे ज्येष्ठ नेते, तर विरोधी बाकांवर सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी आदी नेते उपस्थित होते.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.