२१ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 July 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ जुलै चालू घडामोडी

लोकसेवा आयोगाने पात्र ठरविलेल्या अभियंत्याच्या नियुक्त्या अद्याप रखडलेल्याच

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकीपदाची परीक्षा २०२० साली घेतली होती. त्याचा निकाल लावत पाचशे पात्र विद्यार्थ्यांची शिफारस शासनाकडे केली. बांधकाम व जलसंपदा खात्यात या नियुक्त्या अपेक्षित होत्या. आता प्रक्रिया होऊन दीड वर्ष लोटले. मात्र या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली नाही.
  • मंत्रालयात पाठपुरावा घेवून ते थकले. पण दाद लागली नाही. उच्च न्यायालयाने आयोगाच्या परीक्षेत आर्थिक दुर्बल घटकाचे दहा टक्के विद्यार्थी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बाजूला ठेवावे व इतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करीत नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्याचे या बाबत पाठपुरावा करणारे प्रा. दिवाकर गमे निदर्शनास आणतात. याच आधारे पोलीस उपनिरीक्षक पदाचा मार्ग मोकळा झाला, असे स्पष्ट करण्यात आले.
  • या वंचित विद्यार्थ्यांची बाजू मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडण्यात आल्यावर त्यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देण्याची हमी दिली आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत या नियुक्त्या व्हाव्यात, असे पत्र सचिवांना देण्यात आल्याची माहिती प्रा. गमे यांनी दिली.

विराट कोहलीने ५००व्या सामन्यात केला मोठा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

  • त्रिनिदाद येथे गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा दोन्ही संघांतील १००वा कसोटी आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ५००वा सामना आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. तसेच विराटच्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही विक्रमांची ही मालिका थांबली नाही. विराटने या खास सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो जगातील कोणताही फलंदाज करू शकला नाही.

विराटने जगात कोणालाही न जमलेला केला कारनामा –

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. विराटने १६१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट आपल्या ५०० व्या सामन्यात अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या जगातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकवता आले नाही. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे अर्धशतक आहे.

२०११ मध्ये विराटने कसोटी पदार्पण केले होते –

  • विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याने टी-२० आणि २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर पुढचे दशकभर क्रिकेट जगतात त्याने राज्य केले. महत्त्वाच्या प्रसंगी त्याने मोठ्या खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आशिया कप २०१२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती.

सचिननंतर विराट कोहलीच्या नावावर आहे हा विक्रम –

  • भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरनंतर क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. त्याने ७५ शतके ठोकली आहेत. कोहलीने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ७ द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामना जिंकणारा खेळाडू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

तलाठी नक्की काय करतात? त्यांच्या पदाला इतकी मागणी असते?

  • राज्यात ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी ११ लाखांहून अधिक अर्ज आले. महसूल यंत्रणेतील तलाठी पदाची प्रतिमा तशी नकारार्थीपणे रुजलेली. ‘जे लिहिले लल्लाटी तेही बदले तलाठी’ अशी ओळख असली तरी तलाठी नक्की काय काम करतात, डिजिटल युगात या पदाची गरज, कार्यशैली बदलली आहे काय, या पदांना इतकी मागणी आजही का असते याविषयी…

तलाठी पदाची निर्मिती कधीची आणि ते पद का महत्त्वाचे?

  • ऐतिहासिक पुस्तकांमध्ये ‘पट्टकिन’ असा शब्द वापरला जात असे. पुढे त्याचे नामकरण ‘पटवारी’ झाले. सध्याची अनेक आडनावे इतिहासातील महसूल यंत्रणेशी संबंधित आहेत. आजही भारतीय प्रशासन सेवेत इतिहासातील मौर्य आणि चोल साम्राज्यातील महसूल यंत्रणेचा अभ्यास केला जातो. गावातील जमिनींचा, पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६ च्या कायद्यान्वये सध्याची तलाठी ही व्यवस्था काम करते. तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील इंचन् इंच जमिनीच्या तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम. त्यामुळे हे पद महत्त्वाचे.
  • महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.

गावस्तरावरचा कोणता तपशील महसूल यंत्रणेत कसा ठेवला जातो?

  • तलाठ्यांनी जमिनीच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी २१ प्रकारचे नमुने होते. त्यातील पहिला नमुना हा गावाच्या क्षेत्राचा तपशील असणारा. त्यात अनेक उपनमुने आहेत. म्हणजे गावातील सरकारी जमीन किती, खासगी आणि अतिक्रमित जमिनीच्या नोंदी तलाठ्यास स्वतंत्रपणे घ्याव्या लागतात. यात देवस्थानाच्या जमिनी, इनामी जमिनी, त्यातून मिळणारा महसूल, त्याच्या पावत्या यासह लागवडीखालील जमीन आणि अकृषी म्हणजे नॉन ॲग्रीकल्चर जमीन याचे नमुने येतात. गावातील कोणत्या जमिनीतून उपकर किंवा सेस मिळतो याचा नमुना ठराव बंद या नावाने असतो. यामध्ये गौण खनिजांची नोंद असते. म्हणजे मुरूम किती होता, किती काढला गेला, डोंगर कोणी खणले का, किती खडक उचलण्यास परवानगी देण्यात आली होती, प्रत्यक्षात किती उचलली अशा नोंदीही तलाठ्यांनाच घ्याव्या लागतात. त्याचे २१ नमुने भरणे हे तलाठ्याचे काम. यातील १२ क्रमांकाचा नमुना हा पिकांच्या नोंदीचा असतो.

त्या इमर्जन्सी अलर्ट मेसेजला घाबरू नका, बघा आणि दुर्लक्ष करा, जिओकडून ग्राहकांना सूचना

  • अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही.
  • केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने या अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेतली. त्याचा हा मेसेज होता, असे जिओकडून कळवण्यात आले आहे.
  • तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करू नका. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कोणताही धोका नाही. भारत सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेली ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.
  • टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेल्या या चाचणी संदेशात मराठी भाषेतही अलर्ट आला होता. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळात म्हणजे १०.३१ वाजता मराठीमध्ये एक अलर्ट आला. पण घाबरून जाऊ नका, मसेज बघा आणि दुर्लक्ष करा, असे जिओने कळवले आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पाचवा गोलंदाज

  • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ॲशेस मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ बुधवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठा विक्रम केला आहे. ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधील ६०० विकेट्स पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा ब्रॉड हा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी हा पराक्रम केला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड जगातील पाचवा गोलंदाज ठरला –

  • स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी जेम्स अँडरसनने हा विक्रम आपल्या नावावर केला असून सध्या त्याच्या नावावर ६८८ कसोटी विकेट्स आहेत. याशिवाय हा टप्पा गाठणारा ब्रॉड हा जागतिक क्रिकेटमधील पाचवा गोलंदाज ठरला. यासह ब्रॉड हा पराक्रम करणाऱ्या जगातील निवडक गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे.

ख्वाजाची विकेट घेत खाते उघडले –

  • ब्रॉडने चौथ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाची तीन धावांवर विकेट घेत आपले खाते उघडले. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने दिवसाच्या खेळाच्या पहिल्या तासातच फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर ब्रॉडने हेडला बाद करून हा विशेष विक्रम गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज –

  • मुथय्या मुरलीधरन – १३३ कसोटीत ८०० विकेट्स
  • शेन वॉर्न – १४५ कसोटीत ७०८ विकेट्स
  • जेम्स अँडरसन – १८२ कसोटीत ६८८* विकेट्स
  • अनिल कुंबळे – १३२ कसोटीत ६१९ विकेट्स
  • स्टुअर्ट ब्रॉड – १६६ कसोटीत ६००* विकेट्स

Emergency Alert Serve : … आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट

  • देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.
  • विशेष म्हणजे अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

  • सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.
  • आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.
  • विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.