२२ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२२ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |22 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२२ सप्टेंबर चालू घडामोडी

उद्या २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान; पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर

 • दरवर्षी २३ सप्टेंबर आणि २१ मार्च हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. उद्या शनिवारी ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे.
 • या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर राहतात. या शिवाय अन्य दिवशी नेहमीपेक्षा लहान-मोठे राहत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक प्रवीण गुल्‍हाने आणि विजय गिरूळकर यांनी दिली.
 •  
 • दिवस व रात्रीची असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासांपेक्षा मोठा व रात्र १२ तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असते, पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसाला दरवर्षात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
 • २१ मार्च, २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व दक्षिण धृवातून जाते म्हणून या दिवशी दिवस व रात्र समान वेळेची असते. आकाशात वैषुवीक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ किंवा २३ सप्टेबरला सूर्य प्रवेश करतो. त्याला शरद संपात बिंदू म्हणतात.
 • खगोलप्रेमींनी व भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २३ सप्टेंबरला प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

कौतुकास्पद: महाराष्ट्रात क्रिकेट पंच म्हणून प्रथमच एका मुलीची निवड!

 • एकीकडे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून महिला आरक्षणावर चर्चा चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये एका महिलेनं इतिहास घडवला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठीच्या परीक्षेचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाग्यश्री डांगे ही मुलगी उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मुलीची क्रिकेट पंच म्हणून निवड झाली आहे!
 • महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै व ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन प्रकारे घेण्यात आली. यात लेखी परीक्षा १०० गुणांची तर प्रात्याक्षिक परीक्षेसाठी १०० गुण होते. एकूण अर्जदारांपैकी लेखी परीक्षेला १९७ उमेदवार बसले होते. त्यापैकी ८० जणांची निवड प्रात्याक्षिक परीक्षेसाठी करण्यात आली. यामध्ये भाग्यश्री डांगेचा समावेश होता. भाग्यश्रीला लेखी परीक्षेत १०० पैकी ८४ गुण मिळाले.

प्रात्याक्षिक परीक्षेचं स्वरूप

 • प्रात्याक्षिक परीक्षेमध्ये तीन गोष्टींचा समावेश होता. यात मुलाखतीसाठी ५० गुण, व्हिडीओ अनॅलिसिससाठी ३० गुण, तर पीपीटी प्रेझेंटेशनसाठी २० गुण असे १०० गुण देण्यात आले. या फेरीत भाग्यश्री डांगेला १०० पैकी ८७ गुण मिळाले. त्यामुळे लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन्ही परीक्षांचे मिळून भाग्यश्री डांगेला २०० पैकी १७१ गुण मिळाले.

४८ उमेदवार झाले उत्तीर्ण!

 • दरम्यान, या परीक्षेत एकूण ४८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात भाग्यश्री डांगेचाही समावेश आहे. या ४८ जणांपैकीच नव्हे, तर आत्तापर्यंत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांमध्ये भाग्यश्री डांगे ही पहिलीच महिला उमेदवार आहे! त्यामुळे भाग्यश्रीच्या रुपाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पहिली महिला पंच लाभणार आहे.

“महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, विजय वडेट्टीवारांची माहिती

 • राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे.
 • पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
 • काँग्रेससह राज्यातले विरोधी पक्ष सातत्याने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते विजय विडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावतील विभागात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय!

 • गेल्या दोन दिवसांपासून कॅनडातील हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणाची चर्चा जगभरात चालू झाली आहे. कारण या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप कॅनडानं केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबध ताणले गेले आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतलेली असताना भारतानं कॅनडाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली असताना आता भारतानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

कॅनडातील व्हिसा सेवा बंद

 • खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. आता भारत सरकारने कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, असं कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या व कॅनडातून भारतात येणाऱ्या असंख्य भारतीय व कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय

 • जून महिन्यात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आल्यानंतर त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. भारताच्या कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. यावर भारतानंही हे आरोप फेटाळताना कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.
 • दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विशेष सूचना जारी केल्या. या पार्श्वभूमीवर भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

भारताच्या कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना

दरम्यान, कॅनडाच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. “कॅनडामधील भारतविरोधोी कारवाया, राजकीय पुरस्कृत द्वेष-गुन्हे आणि हिंसाचार पाहाता तिथे राहणारे भारतीय नागरिक व तिथे जाऊ इच्छिणारे भारतीय यांनी अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे”, असं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे”.

इराणमध्ये हिजाबसक्ती अधिक कठोर; विरोधी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनंतर निर्णय 

 • सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यास नकार देणाऱ्या महिलांना आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूद असलेले विधेयक इराणच्या प्रतिनिधीगृहाने मंजूर केले आहे. यासंदर्भातील गुन्ह्यांसाठी दोषींना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 • २२ वर्षीय महसा अमिनी हिने हिजाब न घातल्यामुळे इराणच्या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने तिला केलेल्या कथित बेदम मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या इराणमध्ये काही महिने हिजाबविरोधी आंदोलन चिघळले होते. महिलांनी आणि महिला हक्कांच्या समर्थकांनी सरकारविरोधात व्यापक आंदोलने केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. या घटनेला एक वर्ष लोटल्यानंतर काही दिवसांनी इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तरतूद काय?

 • * हिजाब परिधान न केल्यास मोठा दंड.
 • * हिजाब परिधान न केलेल्या महिलेस वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही शिक्षा. * या विधेयकाविरोधात आंदोलन केल्यास त्यांनाही कठोर शिक्षा.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.