२३ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२३ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 23 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ ऑगस्ट चालू घडामोडी

जागतिक वडा पाव दिन.

जागतिक वडा पाव दिन.
  1. आज जागतिक वडापाव दिवस (World Vadapav Day). आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती आणि मुंबईत (Mumbai) सुरु झालेलं हे स्ट्रीट फूड पाहता पाहता संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं.
  2. मबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्य गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या.
  3. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली.

सुपर वासुकी: भारतीय रेल्वेची सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन

सुपर वासुकी: भारतीय रेल्वेची सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन
  1. भारतीय रेल्वेने सुपर वासुकी या नवीनतम ट्रेनची चाचणी घेतली.
  2. सुपर वासुकी भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) झोनद्वारे चालविली जाते.
  3. सुपर वासुकी बद्दल:
  4. मालवाहतूक ट्रेन 3.5 किमी लांब आहे.
  5. चाचणी रन दरम्यान, ट्रेनमध्ये सहा लोको, 295 वॅगन आणि 25,962 टन एकूण वजन होते, ज्यामुळे ती रेल्वेने चालवलेली सर्वात लांब आणि सर्वात वजनदार मालवाहू ट्रेन बनली.
  6. मालगाड्यांचे पाच रेक एक युनिट म्हणून एकत्र करून ही ट्रेन तयार करण्यात आली.
  7. ट्रेनला 267 किमी अंतर कापण्यासाठी 11.20 तास लागले.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.