२३ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२३ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 23 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ डिसेंबर चालू घडामोडी

मेस्सीला मिळणार मोठा सन्मान! नोटेवर छापणार फोटो, अर्जेंटिना सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत: 

  • फिफा विश्वचषक २०२२ संपला आहे. तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाने अखेर फुटबॉलचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले. यासह संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे स्वप्नही पूर्ण झाले. अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला तेव्हापासून लिओनेल मेस्सीची लोकप्रियता वाढली आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये क्रेझचे वातावरण आहे. त्यातच सूत्रांच्या माहितीनुसार अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर मेस्सीचे चित्र लावण्याच्या विचारात आहे. विश्वचषकात मिळालेले यश लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.
  • फिफा विश्वचषक ट्रॉफीसह अर्जेंटिना येथे पोहोचल्यानंतर संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर मेस्सी त्याच्या गावी पोहोचला तेव्हा तेथेही त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता ही बातमी ऐकून मेस्सीच्या चाहत्यांना आनंद होईल. विश्वचषक ट्रॉफीसह अर्जेंटिना पोहोचल्यावर त्याचे ज्या प्रकारे स्वागत झाले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर लाखो लोक कसे उतरले होते. इतकेच नाही तर मेस्सी त्याच्या गावी पोहोचल्यानंतरही त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण, सध्या येत असलेल्या बातम्यांनुसार या सगळ्यांच्या वर आहेत. अर्जेंटिना सरकार तेथील नोटेवर मेस्सीचे चित्र लावण्याच्या मनस्थितीत असल्याचे वृत्त आहे.
  • काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, अर्जेंटिना सरकार मेस्सीचे चित्र चलनी नोटांवर लावू शकते. सेंट्रल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ अर्जेंटिना हजार पेसोच्या चलनी नोटेवर मेस्सीची प्रतिमा छापू शकते असे वृत्त आहे. आर्थिक वृत्तपत्र एल फायनान्सिएरोच्या मते, अर्जेंटिनाच्या नियामक बँकेने ला अल्बिसेलेस्टेच्या ऐतिहासिक विश्वचषकाच्या विजयासाठी एक बैठक आयोजित केली आहे. उल्लेखनीय आहे की अर्जेंटिनाने १९७८ मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मारक नाणीही जारी करण्यात आली होती.

मेस्सीच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे 

  • अहवालात असे म्हटले आहे की अर्जेंटिना सेंट्रल बँकेच्या सदस्यांनी हा पर्याय ‘मस्करीने’ प्रस्तावित केला होता, जरी बहुतेक बोका ज्युनियर्स, लिसांड्रो क्लेरी आणि एडुआर्डो हेकर यांनी त्यास सहमती दर्शविली. यानंतर १००० पेसोच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय, नोटेच्या एका बाजूला मेस्सीचा फोटो दिसेल, तर दुसऱ्या बाजूला ग्रुपचे नाव ‘La Scaloneta’ दिसेल.

आपल्या ‘चक दे’ गर्ल्स! भारतीय महिला हॉकी संघाची जागतिक यशाला गवसणी: 

  • सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे आपल्याच मुलींचा. भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी FIH नेशन्स कप (FIH Nations Cup) जिंकला आणि त्यानंतर भारतात परतल्यानंतर आपला आनंद हा असा व्यक्त केला… जगभरात FIFA च्या फायनलची धूम सुरु असताना आपल्या या खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंचा अंतिम फेरीत पराभव केला आणि हॉकी जगतातील एक मानाचा चषक आपल्या देशासाठी जिंकला. इतकंच नाही तर या विजयामुळे भारतीय महिला हॉकी टीमनं २०२३-२४ च्या प्रो- लीगमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे. अर्थातच हा विजय फक्त खेळाडूंसाठीच नाही तर आपल्यासाठीही खूप मोठा आहे.
  • क्रिकेट म्हणजे धर्म मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात हॉकीचे चाहतेही आहेत. पण त्यांची संख्या कमीच आहे. क्रिकेटपेक्षा हॉकीला अर्थातच ग्लॅमर कमी आहे. पण तरीही मुली आवर्जून या खेळाकडे वळत आहेत. त्यात चांगली कामगिरी करत आहेत ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि आशेची गोष्ट आहे.
  • कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी करत ब्राँझ मेडल मिळवलं होतं. आता या FIH नेशन्स कप स्पर्धेत सलग पाच विजय मिळवून या टीमनं अपेक्षा उंचावल्या आहेत. एकूण आठ देशांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. या विजयाचं बक्षिस म्हणून हॉकी इंडियानं प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि त्यांच्या कोचिंग स्टाफसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं कदाचित ही गोष्ट त्यांचा हुरुप वाढवायला मदत करेल. चषक हाती आल्यानंतरचा या टीमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून आपला ऊरही अभिमानानं भरून येतो.
  • मायदेशी परतल्यानंतर या खेळाडूंनी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्राव्हो याच्या ‘चॅम्पियन चम्पियन’ या गाण्यावर मस्त डान्स केला. एकामागोमाग एक बाहेर पडताना या मुलींनी आपलं गोल्ड मेडल हातात घेऊन केलेला हा डान्सचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ‘कॅप्टन म्हणून मला माझ्या टीममधल्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. प्रत्येकीनं 100 टक्के प्रयत्न केले आणि आम्ही सुरुवातीपासूनच आमचं ध्येय समोर ठेवूनच खेळ केला होता,’ अशी प्रतिक्रिया कॅप्टन सविता पुनियानं दिली होती. आता या संघाचं सगळं लक्ष 2023 मधल्या आशियाई गेम्सकडे लागलं आहे. फक्त हॉकीचा ध्यास घेतलेल्या या ‘चक दे’ गर्ल्सनं देशभराचं लक्ष वेधून घेतलं आहे

टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच हटणार BYJU’S आणि MPL चे नाव, समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण: 

  • भारतीय क्रिकेट संघाचे दोन प्रमुख प्रायोजक, एडटेक प्रमुख बायजू आणि एमपीएल स्पोर्ट्स, बीसीसीआयसोबतचा त्यांचा प्रायोजकत्व करार संपवू इच्छित आहेत. जूनमध्ये, Byju ने अंदाजे $३५ दशलक्षसाठी बोर्ड सोबतचा जर्सी प्रायोजकत्व करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढवला. आता बायजूला बीसीसीआयसोबतचा करार संपुष्टात आणायचा आहे, परंतु बोर्डाने कंपनीला किमान मार्च २०२३ पर्यंत करार सुरू ठेवण्यास सांगितले आहे. बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली.
  • भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न नोटनुसार, बीसीसीआयला ४ नोव्हेंबर २०२२ रोजी बायजूसकडून एक ईमेल मिळाला, ज्यामध्ये नुकत्याच संपलेल्या टी२० विश्वचषकानंतर त्यांची भागीदारी संपवण्याची विनंती केली होती. BYJU’S सोबतच्या आमच्या चर्चेत, आम्ही त्यांना सध्याची व्यवस्था चालू ठेवण्यास आणि किमान ३१ मार्च २०२३ पर्यंत ही भागीदारी सुरू ठेवण्यास सांगितले आहे. बायजूसने २०१९ मध्ये ओप्पो ची जागा घेतली. कतारमध्ये २०२२ च्या फिफा विश्वचषकाच्या प्रायोजकांमध्ये बायजूचा समावेश होता.

हे धक्कादायक कारण समोर आले

  • बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेत या विषयावर चर्चा झाली. Byju ने २०१९ मध्ये ‘Oppo’ ची जागा घेतली. कतारमध्ये २०२२ च्या फिफा विश्वचषकाच्या प्रायोजकांमध्ये बायजूचा समावेश होता. टीम किट आणि ‘व्यापारी’ प्रायोजक एमपीएलने बीसीसीआयला सांगितले की ते फक्त किरण क्लोदिंग लिमिटेड (केकेसीएल) ला त्याचे हक्क देऊ इच्छित आहेत. त्याचा सध्याचा करार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे. MPL ने नोव्हेंबर २०२० मध्ये ‘Nike’ ची जागा घेतली.

ई-मेल द्वारे खुलासा

  • या नोंदीनुसार, बीसीसीआयला २ डिसेंबर २०२२ रोजी एमपीएल स्पोर्ट्सकडून एक ईमेल प्राप्त झाला होता, ज्यामध्ये त्यांनी १ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतचा करार (संघ आणि माल) ‘फक्त किरण क्लोदिंग लिमिटेड’ला दिला होता. (एक फॅशन ब्रँड)’ ने मागणी केली आहे. ईमेलनुसार, “आम्ही MPL स्पोर्ट्सला ३१ मार्च २०२३ पर्यंत असोसिएशन सुरू ठेवण्यास सांगितले आहे किंवा अर्धवट करार केला आहे ज्यामध्ये फक्त उजव्या छातीवर लोगो असेल, परंतु किट निर्मिती कराराचा समावेश नाही.”

इंग्लंडमध्ये आता रजोनिवृत्तीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे; महिलांना दिलासा: 

  • रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील काम करणाऱ्या इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महिला कर्मचारी यापुढे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार घरून काम करू शकणार आहेत. तेथील आरोग्य सेवेच्या प्रमुख अमॅण्डा प्रिचर्ड यांनी प्रथमच रजोनिवृत्तीसंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • ती जारी करताना अन्य कर्मचाऱ्यांनी रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांची अशाही परिस्थितीत प्रगती होण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे, असे म्हटले आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुष्यातल्या या टप्प्यातून जाणाऱ्या महिलांना तुलनेने सहजसोपी, ताण न येणारी कामे दिली जातील आणि त्यांना लवचिक कार्यपद्धतीचाही लाभ मिळेल. अशा महिलांच्या कामकाजामध्ये योग्य त्या तडजोडी, बदल करण्याबाबत एनएचएस मार्गदर्शक तत्त्वांमधे नमूद करण्यात आले आहे. या तडजोडींमध्ये विश्रांतीबाबत लवचिकता, मर्यादित काम किंवा कामाच्या तासांत घट यांचा समावेश असू शकतो.
  • कोविड महासाथीमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांतून, समस्यांतून बहुतांश रूग्णालये अद्यापही रुग्णभेटी, शस्त्रक्रिया यांच्या ताणातील आणि संख्येतील तफावत भरून काढू शकलेल्या नाहीत. याचा परिणाम दहापैकी एकाला नोकरी न मिळण्यावर झालेला आहे. परंतु प्रिट्चर्ड म्हणाल्या की, म्हणूनच रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांना त्यांच्या गरजेच्या नाजूक काळात अशी लवचिकता मिळाली तर एनएचएसच्या कार्यप्रणालीला भविष्यात पुढे नेण्यास ते साह्यकारी ठरेल.
  • रजोनिवृत्ती ही आरोग्याची समस्या नाही तर तो आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि एनएचएसमध्ये कार्यरत महिलांना या संक्रमणाचा सामना करताना प्रत्यक्ष काम करत राहण्यासाठी तसंच त्यांच्या प्रगतीसाठी भक्कम आधार मिळावा, असं वाटतं. या संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी कधीही अवघडल्यासारखे वाटू नये किंवा आयुष्यातील या स्वाभाविक रजोनिवृत्तीच्या टप्प्यासंदर्भात बोलताना त्याची लाजही वाटू नये, असंही त्या म्हणाल्या.

प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीला साहित्य अकादमी: 

  • साहित्य अकादमीच्या यंदाच्या साहित्य पुरस्कारासाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीची निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या सोहळय़ात पुरस्कार प्रदान केले जातील.
  • बांदेकर यांच्यासह प्रमोद मुजुमदार यांना काश्मीरबाबतच्या ‘सलोख्याचे प्रदेश-शोध सहिष्णू भारताचा’, या ज्येष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या ‘इन गुड फेथ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाला. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन नाटके, दोन टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी एक आत्मकथन, लेखसंग्रह आणि ऐतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आली.  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि प्राध्यापक नितीन रिंढे यांच्या समितीने मराठी पुस्तकांची निवड केली.

काय आहे कादंबरीत?

  • शब्द प्रकाशनतर्फे २०१६ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा परशा ठाकर याच्या घराण्यात बाहुल्यांच्या खेळाची कला आहे.  तो प्राध्यापक असला तरी आपला हा वारसा धरून आहे. प्रबोधनासाठी तो बाहुल्यांचे खेळ स्वत: लिहून करतो. एके दिवशी तो अचानक गायब होतो आणि त्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने अनेक घटनांचा, दृश्यांचा, आठवणींचा विशाल पट उलगडत जातो. माळय़ावरच्या बाहुल्या मोकळय़ा केल्या जातात. त्याबद्दलच्या संगणकावरच्या नोंदी तपासल्या जातात. आणि बाहुल्यांतल्या माणसांचा एक चित्तचक्षुचमत्कारिक खेळ वेगाने घडत जातो.

BF-7 व्हेरिएंटची दहशत – भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी करोना नियमावली जाहीर, जाणून घ्या नवे नियम: 

  • चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने थैमान घातलं आहे. चीनमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतातही तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
  • नव्या नियमावलीनुसार, भारतात येणाऱ्या प्रवाशांला लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला करोनाची लक्षणं दिसल्यास त्याला विमानतळावरच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात येणार आहे. या आरटी-पीसीआर चाचणीतून १२ वर्षांखालील मुलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लक्षणं आढळल्यास त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.
  • भारतात येणाऱ्या कोणताही प्रवाशाला करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी जवळच्या आरोग्यात जाऊन तपासणी करावी किंवा करोना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असेही केंद्र सरकारकडून जारी नव्या नियमावलीतून सांगण्यात आले आहे.

‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:

  • कमी पल्ल्याच्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या दिग्दर्शित आंतरखंडीय क्षेपणास्त्राची (गायडेड बॅलिस्टिक मिसाईल) भारताने बुधवारी ओडिशातील बालासोर किनाऱ्यावरून यशस्वी चाचणी केल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले.
  • ‘प्रलय’ हे ३५० ते ५०० किलोमीटर इतका कमी पल्ला असलेले जमिनीवरून जमिनीवर डागले जाणारे क्षेपणास्त्र असून, ५०० ते १ हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. डीआरडीओने विकसित केलेले घन इंधनावर चालणारे हे क्षेपणास्त्र भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमातील पृथ्वी संरक्षण वाहनावर स्थित आहे.
  • बेटावरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मिशनची सर्व उद्दिष्टेपूर्ण केली. त्याचा वेध घेणाऱ्या अनेक उपकरणांनी सागरी किनाऱ्यावर त्याच्या विक्षेपमार्गाचा (ट्रॅजेक्ट्री) माग घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘प्रलय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ व त्यांच्या सहयोगी चमूंचे अभिनंदन’, असे ट्वीट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

देशभरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २१३:

  • भारतातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या २१३ झाली आहे. बुधवारी दिवसभरात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली. १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रुग्ण दिल्लीमध्ये आढळले आहे.
  • या राज्यात ५७ रुग्णांची नोंद झाली असून त्याखालोखाल महाराष्ट्रात ५४, तेलंगणा २४, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५ आणि गुजरातमध्ये १४ रुग्णांची नोंद झाली आहे. २१३ रुग्णांपैकी ९० जण या आजारातून बरे झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
  • गेल्या २४ तासांत देशभरात ६,३१७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ४७ लाख ५८,४८१ झाली आहे.
  • सध्या ७८,१९० उपचाराधीन रुग्ण असून गेल्या ५७५ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. गेल्या २४ तासांत ३१८ जणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या चार लाख ७८,३२५ झाली आहे.

मराठा आरक्षण ते पेगॅसस प्रकरणी चौकशी; वाचा देशातील न्यायालयांनी दिलेले सर्वोच्च निर्णय:

  • २०२१ हे वर्ष कोविड-१९ साथीच्या कठोर निर्बंधात सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे जात राहिले आहे. मात्र करोनाच्या आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. लोक फक्त नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहे. मात्र २०२१ हे वर्ष एका गोष्टी थांबवू शकलेले नाही ते म्हणजे भारताची न्यायव्यवस्था.
  • देशाच्या विविध न्यायालयांमध्ये व्हर्च्युअन सुनावण्या पार पडल्याचे पाहायला मिळाले आहे. न्यायालयांनी या वर्षी भारताच्या कायदेशीर परिदृश्याला आकार देणारे काही महत्त्वपूर्ण बदल देखील चिन्हांकित केले आहेत. त्यामुळे २०२१ वर्ष संपत असताना, काही सर्वात महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूया.
  • मुंबई उच्च न्यायालयाने (नागपूर खंडपीठ) १८ नोव्हेंबर रोजी दिलेला ‘स्किन टू स्किन’ हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला असेल तरच तो लैंगिक अत्याचार ठरतो. कपडय़ांवरून शरीराची चाचपणी करणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
  • त्यानंतर केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर स्थगिती दिली. त्यानंतर केंद्र सरकारला सविस्तर याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात आली आणि १८ नोव्हेंबर २०२१ रोजी हा निकाल रद्द करण्यात आला.

८३’ चित्रपटातील अभिनेत्यानं भारतीय संघातून खेळलंय क्रिकेट; नाव वाचून बसेल धक्का:

  • १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित ’83’ चित्रपट उद्या म्हणजेच २४ डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे.
  • रणवीर व्यतिरिक्त, चित्रपटात अनेक कलाकार आहेत, जे भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची भूमिका साकारत आहेत. त्यापैकी एक गायक-अभिनेता हार्डी संधूचा समावेश आहे. हार्डी संधू हा मुळात प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होता. दुखापतीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
  • या चित्रपटातून हार्डी संधू अभिनयात पदार्पण करत आहे. तो भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ३५ वर्षीय संधूने संगीत विश्वात स्वतःचे नाव कमावले आहे. या बॉलिवूड गायकाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. संधूसाठी या स्तरावर पोहोचणे अजिबात सोपे नव्हते, कारण त्याला आजची प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
  • हार्डी संधूच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण तो भारताच्या अंडर-१९ आणि अंडर-१७ क्रिकेट संघाकडून खेळला होता. पंजाबसाठी तो ३ रणजी सामने खेळला. यात त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या. तो व्यावसायिक क्रिकेटही खेळण्यास तयार झाला. मात्र दुखापतीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द अकालीच थांबली आणि संधू नंतर संगीताकडे वळला. संधूने पंजाबी संगीत क्षेत्रात एक वेगळे आणि विशेष स्थान निर्माण केले आहे.

अ‍ॅडल्ट वेबसाईट ओन्लीफॅन्सच्या सीईओपदी भारतीय वंशाची आम्रपाली गान; संस्थापकांच्या राजीनाम्यानंतर मोठी जबाबदारी:

  • जगभरात भारतीय महिला वेगाने प्रगतीची शिडी चढत आहेत. त्याचबरोबर यावर्षी अनेक भारतीय महिलांनी आपल्या कौशल्याने देशाचे नाव जगभरात पुढे नेले आहे. हरनाज कौर संधूने अलीकडेच मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकून देशासाठी मोठी कामगिरी केली. तर लीना नायरने फॅशन ब्रँड चॅनलची सीईओ बनून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. त्याचवेळी वर्षअखेरीस मुंबईत राहणाऱ्या आम्रपाली (एमी) ​​गाननेही देशाला एक भेट दिली आहे.
  • अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म ओन्ली फॅन्सने (OnlyFans) भारतीय वंशाच्या आम्रपाली ‘एमी’ गानची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ओन्लीफॅन्सचे संस्थापक ३८ वर्षीय टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. २०१६ मध्ये टिमने ओन्लीफॅन्सची स्थापना केली. तेव्हापासून ते पाच वर्षे या पदावर कार्यरत होते. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याआधी सुट्टीचा आनंद घ्यायचा असल्याने ते पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • आम्रपाली यांच्याकडे सीईओ पद सोपवत टिम स्टोकलीने सांगितले की, “ती खूप चांगली सहकारी तसेच माझी एक चांगली मैत्रिण आहे. मी एका मैत्रिणीला जबाबदारी सोपवत आहे जिच्याकडे दूरदृष्टी आहे आणि संस्थेला तिच्या प्रचंड उंचीपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी क्षमता आहे.”

ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधानांची आज बैठक; नियमांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधांच्या सुसज्जतेचा आढावा घेण्याची शक्यता:

  • डेल्टापेक्षा ओमायक्रॉन हा करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू तिपटीने अधिक संसर्गजन्य असल्याने केंद्र सरकार दक्ष झाले असून करोनासंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी तसेच आरोग्य सुविधांच्या सुसज्जतेच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठकही बोलावली आहे.
  • देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दोनशेहून जास्त झाली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आढळले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ५४ तर दिल्लीमध्ये ५७ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये करोनाच्या प्रत्येक नमुना चाचणीचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी आणि अन्य सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये करोनासंदर्भातील आढावा बैठक घेतली होती. मात्र गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीने प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार आदी सुविधांची  किती तयारी करावी लागेल, या दोन्ही कळीच्या मुद्दय़ावर चर्चा  केली जाणार आहे. करोनाच्या

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.