२५ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 25 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ नोव्हेंबर चालू घडामोडी

ट्विटर युजर्ससाठी खुशखबर! एलॉन मस्क यांनी जाहीर केला मोठा निर्णय, पुढील आठवड्यापासून:

  • ट्विटरवरील निलंबित खाती पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं एलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे. ट्विटरवरील निलंबित खाती पुन्हा सुरू करावीत की नाही, यासाठी पोल घेण्यात आला होता. या पोलच्या सकारात्मक निकालानंतर निलंबित खात्यांना माफी देत ही खाती लवकरच सक्रीय करण्यात येणार आहे.
  • कायद्याचं उल्लंघन न करणाऱ्या आणि स्पॅमसारख्या गैरप्रकारामध्ये सहभागी नसलेल्या युजर्सची निलंबित ट्विटर खाती पुन्हा सुरू करावीत का? असा प्रश्न एलॉन मस्क यांनी युजर्संना विचारला होता. ३.१६ दशलक्षाहून अधिक युजर्संनी या पोलमध्ये भाग घेतला होता. त्यातील ७२.४ टक्के युजर्सने निलंबित खाती पुन्हा सुरू करण्याच्या बाजुने कौल दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निलंबित ट्विटर खातं पुन्हा सुरू करावं का? यासाठीही एलॉन मस्क यांनी पोल घेतला होता. या पोलच्या सकारात्मक प्रतिसादानंतर २२ महिन्यांपासून निलंबित असलेलं ट्रम्प यांचं ट्विटर खातं सुरू करण्यात आलं आहे. मात्र, आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतण्यास रस नसल्याचं ट्रम्प यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.
  • एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच या कंपनीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीची सूत्र हाती घेताच मस्क यांनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे.

लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ:

  • सिडान कार आरामदायक प्रवासाची खात्री देते. त्यात सामान ठेवण्यासाठीही भरपूर जागा असते. मात्र मोठी आणि आकाराने लांब असल्याने अनकेदा तिला पार्क करणे किंवा गर्दीतून काढणे कठीण होऊन बसते. त्यामुळे छोट्या कार्सना नागरिक पसंती देतात. छोटी कार पार्किंग स्पेस कमी घेते आणि गर्दीतून किंवा वाहतुकीतून सहज पुढे जाऊ शकते. तुम्ही जर छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील वर्षी, म्हणजे २०२३ साली काही छोट्या कार्स बाजारात उपलब्ध होणार आहेत. आज आपण या कार्सबाबत जाणून घेऊया.
  • १) एमजी एअर ईव्ही : MG AIR EV वाहन २०२३ मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारला जनेवरी महिन्यात आयोजित दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करू शकते. ही कार टाटा टियागो ईव्हीला टक्कर देणार असल्याचे सांगितल्या जाते. कारची किंमत १० लाखांपर्यंत असू शकते. कारमध्ये २० ते २५ किलोवॉट हवरचे बॅटरी पॅक मिळू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.
  • २) नवीन पिढीची मारुती स्विफ्ट : उत्तम मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीत मिळत असल्याने ग्राहक मारुती सुझुकीच्या कार्सना पसंती देतात. मारुती सुझुकीची स्विफ्ट छोट्या कार्समधून एक आहे. नवीन पिढीची मारुती सुझुकी स्विफ्ट २०२४ मध्ये बाजारात उपलब्ध होऊ शकते. माध्यमांतील अहवालानुसार, २०२४ मारुती स्विफ्ट टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध होऊ शकते. कारमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते.
  • ३) ह्युंडाई ग्रँड आय १० निओ फेसलिफ्ट : या कारला पुढील वर्षी मिड लाईफ अपडेट मिळेल. या मॉडेलची सध्या चाचणी सरू आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन ग्रिल, एलईडी डीआरएल्ससह सुधारित हेडलॅम्प्स, अद्ययावत रिअर बंपर आणि नवीन डिजाईन केलेले टेल लॅम्प्स मिळतील. ह्युंडाई ही कार नवीन रंग पर्यायांसह देखील उपलब्ध करू शकते. कारला आतून नवीन अपहोल्स्टेरी मिळू शकते.
  • ४) सिट्रिऑन सी ३ ईव्ही : नवीन Citroen C3 EV ही २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाँच होणार होती. मात्र, काही कारणास्तव हे लाँच रद्द करण्यात आले. आता ही कार २०२३ साली लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार ५० किलोवॉट हवर बॅटरी पॅकसह उपलब्ध होऊ शकते. फुल चार्जवर ही कार ३५० किमी रेंज देण्याची शक्यता आहे. कंपनी लहान बॅटरी पॅक असलेली कार देखील उपलब्ध करू शकते, जी ३०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.

‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर यवतमाळच्या तरुणीची छबी:

  • जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या ‘स्टार्टअप’ने ‘फोर्ब्स आशिया’च्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता ग्रामहितच्या संस्थापक संचालक श्वेता पंकज महल्ले (ठाकरे) यांनी अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले आहे.
  • श्वेता यांच्या या यशाने जिल्ह्याचा लौकिक जगभर झाला आहे. ‘फोर्ब्स’चा आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘फोर्ब्स’च्या या अंकाच्या मुखपृष्ठावर अन्य चार तरुण व्यावसायिकांसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे. ‘फोर्ब्स’ हे मासिक वित्त, उद्योग, गुंतवणूक आणि विपणन, तंत्रज्ञान, संप्रेशन, विज्ञान, राजकारण, कायदा आदी विषयांवर अंक प्रकाशित करते.
  • ‘फोर्ब्स’ने दखल घ्यावी यासाठी या क्षेत्रात कार्य करणारे तरुण कायम धडपडत असतात. सामाजिक स्तरावरील समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने व कल्पकतेने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची ‘फोर्ब्स’कडून दखल घेतली जाते.
  • कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना ‘फोर्ब्स’कडून प्रोत्साहन मिळते. यावर्षी ‘फोर्ब्स’च्या यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत ग्रामहितने स्थान मिळवले. या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणे ही गौरवास्पद कामगिरी समजली जाते. श्वेता यांनी पती पंकज यांच्यासमवेत ग्रामहित ही शेतकऱ्यांसाठी शेतमाल विपणन क्षेत्रात काम करणारी कंपनी स्थापन करून अवघ्या दोन वर्षांत जागतिक स्तरावर मानांकन मिळवल्याने जिल्ह्याचाही लौकिक वाढला आहे.

यूपीआय अ‍ॅप्सवरून आर्थिक व्यवहारांना लागू शकते मर्यादा, काय आहे कारण? जाणून घ्या:

  • यूपीआय अ‍ॅप्समुळे रोखरहित व्यवहार वाढला आहे. खरेदी करताना अनेक लोक आता कॅशऐवजी गुगल पे, फोन पे या सारख्या यूपीआय अ‍ॅपद्वारे व्यवहार करत आहेत. याचा फायदा म्हणजे, खिशात मोठी कॅश बाळगण्याची आता आवश्यकता नाही. तसेच, या अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करता येतात. मात्र, याला आता मर्यादा लागण्याची शक्यता आहे.
  • नॅशनेल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप पुरवठादारांसाठी (टीपीएपी) असलेल्या व्हॉल्यूम कॅपवर मर्यादा घालण्याची प्रसत्वावित ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत अंमलात आणण्याची शक्यता असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. असे झाल्यास देशातील नागरिकांना पोन पे, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करणे अशक्य होणार आहे.
  • सध्या गुगले पे आणि फोन पे हे दोन यूपीआय पेमेंट अ‍ॅप्स बाजारातील ८० टक्के वाट्यासह आघाडीवर आहेत. कोणत्याही यूपीआय अ‍ॅपची मक्तेदारी टाळण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये ३० टक्के व्हॉल्यूम कॅपचा प्रस्ताव एनपीसीआयने पाठवला आहे. आरबीयाने तो मान्य करावा अशी एनपीसीआयची मागणी आहे. सध्या फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून व्यवहारावर कुठलीही मर्यादा नाही. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्यास व्यवहारावर मर्यादा लागण्याची शक्यता आहे.
  • अहवालानुसार, प्रस्तावानंतरची सद्यस्थिती सर्वसमावेशकपणे समजून घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एनपीसीआय, वित्त मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

‘ही’ जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर:

  • एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडशी सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्ल्यूने टी २० सामन्यांमध्ये १-० असा विजय मिळवला होता तर आता शिखर धवनच्या नेतृत्वात आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर राहून विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे. टी २० विश्वचषकात विराटच्या तुफानी खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले होते मात्र अखेरीस सेमी फायनलमध्ये इंग्लंडसमोर भारताची जादू चालली नाही व टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडली यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल व विराट कोहली या मुख्य खेळाडूंना विश्रांतीसाठी ब्रेक देण्यात आला होता. या विश्रांतीचा पुरेपूर वापर करून विराटने पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
  • ३४ वर्षीय विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. गुरुवारी जिममध्ये घाम गालात असताना त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘Back At It’ अशा कॅप्शनसह या व्हिडिओमध्ये कोहली ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. जर तुम्ही कोहलीला फॉलो करत असाल तर त्याने अनेक व्हिडीओजमधून हे सांगितले आहे की, कोहली व अनुष्का हे दोघेही पूर्णतः शाकाहारी आहेत, यावरूनच सध्या व्हायरल होणाऱ्या कोहलीच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली होती.
  • कोहलीच्या पोस्टवर फॅन म्हणाला की, “आणि लोकं असं सांगतात की तुम्ही मांस खाल्ले नाही तर तुम्ही मस्क्युलर होऊ शकत नाही,” याच कमेंटवर स्वतः कोहलीने उत्तर देत म्हंटले की, हा जगातील सर्वात मोठा गैरसमज आहे. विशेष म्हणजे कोहली हा स्वतः आधी मांसाहारी होता मात्र काही वर्षांपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासह त्याने आरोग्याच्या कारणासाठी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.
  • राष्ट्रीय चालू घडामोडी
    UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) राज्य सरकारांना, संस्थांना आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्याचे निर्देश देते
    भारत आणि ओमानच्या नौदलांनी ओमानच्या किनाऱ्यावर ‘नसीम अल बहर’ सराव केला
    यवतमाळ जिल्ह्यातील पंकज व श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या ‘स्टार्टअप’ने ‘फोर्ब्स आशिया’च्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता ग्रामहितच्या संस्थापक संचालक श्वेता पंकज महल्ले (ठाकरे) यांनी अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले आहे.
  • आर्थिक चालू घडामोडी
  • जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये भारतातील शहरी बेरोजगारीचा दर 7.2% पर्यंत घसरेल: NSO (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय)
  • टाटा ग्राहक रमेश चौहान यांच्याकडून ₹7,000 कोटींना पॅकेज्ड वॉटर जायंट बिस्लेरी घेणार आहे.
  • CPCL (चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड), IOCL (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) यांनी तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे 31,580 कोटी रुपयांच्या रिफायनरीसाठी JV करारावर स्वाक्षरी केली
  • आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
    पक्षांची परिषद (COP 19) ते CITES (कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पीसीज ऑफ वाइल्ड फौना अँड फ्लोरा) ची 19 वी बैठक पनामा सिटी येथे 14 ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
    IORA (इंडियन ओशन रिम असोसिएशन) च्या मंत्री परिषदेची 22 वी बैठक ढाका, बांगलादेश येथे झाली.
    आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार मस्कत, ओमान येथे अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्सवरील तिसऱ्या जागतिक उच्चस्तरीय परिषदेत सहभागी मालीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासाठी भारत हेलिकॉप्टर युनिट पाठवणार आहे
    मलेशिया: अन्वर इब्राहिम यांनी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली
    पाकिस्तान: एलजी असीम मुनीर यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती
  • क्रीडा
    भारताने अल ऐन, संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे जागतिक पॅरा नेमबाजी स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह पाच पदके जिंकली

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.