२८ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२८ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |28 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२८ जानेवारी चालू घडामोडी

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४ तरुणांचा लंडनमध्ये सत्कार

 • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील प्रतिभावान ७५ युवकांचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियनच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रविण निकम यांच्यासह महाराष्ट्रातील चार तरुणांचा समावेश आहे. काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त लंडन येथे हा सन्मान करण्यात आला. प्रवीण निकम, चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव अशी या चार तरुणांची नावे आहेत.

पुरस्कारासाठी ७५ युवकांची निवड

 • शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी संधीचे मार्गदर्शन, ५३ देशांच्या समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम आदींची दखल ब्रिटिश काऊंसील व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस.वाय. कुरेशी, ब्रिटिश काऊंसील शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या भारतातील ७५ युवकांची निवड पुरस्कारासाठी केली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला यांचाही समावेश

 • या सर्व ७५ युवकांना लंडन येथे सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ७५ वर्षांत ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचा वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

टीकेमुळे विचलित न होता लक्ष्य गाठा! ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला

 • समृद्ध लोकशाहीसाठी टीका ही पूर्वअट असते. पण, टीका कोण करतो, यावर ती स्वीकारायची की नाही, हे ठरवावे लागते. आपल्या व्यक्तीने टीका केली तर तिला पौष्टिक खाद्य माना. सातत्याने टीका करणाऱ्यांचा उद्देश भलताच असू शकतो. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार करण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.
 • ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी मोदींनी दोन तास संवाद साधला. लोकांच्या नकारात्मक टिप्पणींना कसे प्रत्युत्तर द्यायचे, या प्रश्नावर, मोदी म्हणाले की, संसदेमध्ये सत्ताधारी खासदार अभ्यासपूर्वक बोलत असतो. पण, विरोधक खोचक मुद्दे काढतात. मग, खासदार त्या मुद्दय़ांमध्ये अडकून पडतो आणि भरकटत जातो. टीका मौल्यवान असते, ती उपयुक्तही ठरते. पण, विरोधकांच्या आरोपांची पर्वा करू नका. विरोधकांमुळे विचलित न होता लक्ष्य गाठा, असा सल्ला मोदींनी दिला.
 • अपेक्षांचे ओझे बाळगू नका – आई-वडील, मित्र आणि लोकांच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नका, त्यांच्या दबावामुळे दबून जाऊ नका, एकाग्र होऊन अभ्यास करा. मग, परीक्षाच नव्हे तर, आयुष्यातील कुठल्याही संकटावर मात करू शकाल. तुमच्याबद्दल बाळगलेली अपेक्षा ही ताकद समजा, असे मोदी म्हणाले. हाच मुद्दा मोदींनी उदाहरणासह स्पष्ट केला. ते म्हणाले, आम्ही राजकारणी सातत्याने निवडणूक लढवत असतो. २०० जागा जिंकल्या तर, ३०० जागा जिंकण्याचा दबाव असतो. आम्ही पराभूत होऊच नये, अशी मतदारांची अपेक्षा असते. त्यांच्या अपेक्षांना आम्हाला सामोरे जावे लागते.. क्रिकेटच्या मैदानात प्रचंड गर्दीकडून चौकार-षटकाराची मागणी होत असताना कसलेला फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार खेळत नाही, लक्ष केंद्रित करून खेळतो!
 • काबाडकष्ट की, चातुर्याने मेहनत – बाटलीत दगड टाकून पाणी पिणाऱ्या कावळय़ाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. पाण्यासाठी कावळय़ाने कष्ट केलेच पण, चातुर्यही दाखवले. चातुर्याने मेहनत घेतली तर यश मिळते. केवळ काबाडकष्ट करून काहीही साध्य होत नाही, असे सांगत मोदींनी ‘स्मार्टली हार्डवर्क’चे महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले.
 • सामान्यांमध्येही असामान्यत्व – बहुतांश लोक सामान्य असतात, पण, अशा लोकांनी असामान्य गोष्टी केल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे सांगत मोदी म्हणाले, जगभरातील अर्थतज्ज्ञांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मक चित्र उभे केले होते. भारत हा सामान्य देश आहे. मोदींना काही कळत नाही, असे आरोप होत होते. पण, आता हेच तज्ज्ञ भारताच्या अर्थव्यवस्थेला आशेचा किरण मानत आहेत.

अदाणींच्या शेअर्सची घसरण सुरूच, शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचं नुकसान

 • हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या संशोधन अहवालामुळे अदाणी उद्योग समुहाची बाजारात घसरण सुरूच आहे. या अहवालात गौतम अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. कंपनीने शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. आज दुपारपर्यंत अदाणी समुहाच्या बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. मंगळवारपासून आतापर्यंत अदाणी समुहाने ४.२ लाख कोटी रुपयांची घट नोंदवली आहे.
 • अदाणी समुहामधील ९ पैकी ४ कंपन्यांचे स्टॉक शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर सर्किटपर्यंत घसरले. दुपारी 3 वाजता अदाणी ट्रान्समिशन, अदाणी आणि अदाणी टोटल गॅसचे शेअर्स प्रत्येकी २० टक्क्यांनी घसरले, तर अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स अनुक्रमे १९.९ टक्के आणि १९.३ टक्क्यांनी घसरले. यासह अदाणी पोर्ट्स (-१७.७ टक्के), अंबुजा सिमेंट्स (-१७.३ टक्के) आणि एसीसी (-१४.३ टक्के) देखील दिवसभरात वेगाने घसरले. अदाणी पॉवर आणि अदाणी विल्मारचे शेअर्सही लोअर सर्किटमध्ये पोहोचले होते. हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले होते.
 • अदाणी समूह हिंडेनबर्गविरोधात कायदेशी कारवाईसाठी प्रयत्नशील – “आम्ही हिंडेनबर्ग संशोधनाविरूद्ध दंडात्मक कारवाईसाठी यूएस आणि भारतीय कायद्यांनुसार संबंधित तरतुदींची माहिती घेत आहोत, अशी माहिती जतिन जलुंधवाला यांनी दिले. जलुंधवाला अदाणी समूह प्रमुख (लीगल) आहेत.
 • हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर – अदाणी समुहाकडून उत्तर मिळाल्यानंतर यावर हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने याबाबत म्हटलं आहे की, ते त्यांच्या अहवालावर ठाम आहेत. हिंडेनबर्गने म्हटलंय की, या अहवालाविरोधात जर कुठल्याही प्रकारची कायदेशी कारवाई झाली तर ती चुकीची ठरेल. हिंडेनबर्गने आक्रमक पवित्रा घेत म्हटलंय की, अदाणी समूह या अहवालाबाबत जर खरंच गंभीर असेल तर त्यांनी अमेरिकेतही खटला दाखल केला पाहिजे, कारण आम्ही इथेच काम करतो. आमच्याकडे त्यांच्याविरोधात कागदपत्रांची मोठी यादी आहे.

आजच अपडेट करा नाहीतर…; सरकारने दिला अलर्ट

 • मायक्रोसॉफ्ट ही एक मोठी टेक कंपनी आहे. सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्या नोकरकपात करत आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचा देखील समावेश आहे. या मायक्रोसॉफ्ट कंपनीला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने मायक्रोसॉफ्ट ब्राऊझरबाबत एक अलर्ट जरी केला आहे. CERT-IN ही नागरिकांना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल किंवा देशातील संभाव्य सायबर हल्ला किंवा सायबर बग बद्दल अलर्ट देत असते. CERT-IN ने Microsoft Edge वेब ब्राउझरमधील एक प्रमुख बग काढून टाकला आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरबाबत CERT-IN द्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 • मायकोरसॉफ्टला देण्यात आलेला इशारा सीईआरटी-इनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट इज मध्ये एक बग असल्याचे या आर्टमध्ये सांगण्यात आले आहे. ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात व सर्व सिस्टीमची सिक्युरिटी तोडून सिस्टीम हॅक करू शकतात. सीईआरटी-इनने असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरचे व्हर्जन 109.0.1518.61 या बगने प्रभावित झाले आहे.
 • बग पासून सिस्टीम कशी वाचवावी ?
  CERT-IN ने आपल्या अहवालात असे म्हंटले आहे की, अशा त्रुटी टाळण्यासाठी तुम्ही तुमचे मायक्रोसॉफ्ट इज त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे. कंपनीने या ब्राऊझरची नवीन सिरीज लाँच केली आहे. ब्राउझर अपडेट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ब्राउझर ओपन करा आणि उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन एजवर क्लिक करा. हे केले की तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसले. अपडेट केल्यावर ब्राउझर पुन्हा सुरु करण्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

 • बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोटय़वधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचे प्रकार उजेडात आल्यानंतर आता यापुढे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आधारसक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला.
 • दरम्यान, कोणत्याही शासकीय योजना-उपक्रमासाठी आधारसक्ती करता येत नसतानाही शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी केलेली आधारसक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बनावट विद्यार्थी पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान पदरात पाडून घेणाऱ्या शाळांवर अकुंश आणण्यासाठी तसेच शाळा प्रवेशामध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांवरच आता प्रवेश देखरेख समितीची जबादारी सोपविण्यात आली आहे. तसेच ही समिती यापुढे शाळेतील प्रवेश प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवील.
 • बोगस पटसंख्या शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी,  केंद्र प्रमुख यांनी वर्षांतून दोन वेळा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी करावी. या पडताळणीत काही विसंगती आढळल्यास त्यांनी एक महिन्यात सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी करताना सबंधित शैक्षणिक संस्थेची आवश्यक नोंदवही आणि कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह थोडक्यात वाचले:

 • सध्याचे आपले गतीमान आयुष्य हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर अवलंबून आहे.
 • जर हे उपग्रह नसतील तर आपण थेट 1950च्या काळात मागे पोहचू, आपले दैनंदिन व्यवहार ठप्प होतील, विमानसेवा-दूरसंचार सेवा-टीव्हीचे विश्व अगदी ATM सेवाव अशा विविध गोष्टींवर त्याचा परिणाम थेट परिणाम होईल.
 • त्यामुळे या उपग्रहांचा अस्तित्वाशी आपला प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांच्या सेवेवर आपले आयुष्य अवलंबून आहे.
 • 2023 BU नावाचा एक लघुग्रह (Asteroid) हा पृथ्वीपासून अवघ्या तीन हजार 600 किलोमीटर अंतरावरुन भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास दक्षिण अमेरिकेच्या आकाशातून पृथ्वीला वळसा घालत पुढे निघून गेला.
 • या लघुग्रहाचा शोध हौशी खगोल अभ्यासक Gennadiy Borisov यांनी लावला होता.
 • अवकाशाचे निरिक्षण करत असतांना साधारण सहा दिवसांपूर्वीच हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतांना त्यांना आढळून आले.
 • एका लहान स्कुलबसच्या आकाराचा, साधारण चार ते आठ मीटर अशा ओबडधोबड आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी समांतर साधारण 400 दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 • आता या लघुग्रहाने पृथ्वीला वळसा जरी घातला असता तरी यापुढच्या काळातही हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम,जनकपूरवरून येणार धनुष्य:

 • अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत भगवान श्रीरामांची सासरवाडी म्हणजेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिर मोठं योगदान देणार आहे.
 • श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत.
 • नेपाळमधील कालिगंडकी नदीतून 350 ते 400 टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा 31 जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत.
 • जनकपूर येथे 30 जानेवारी रोजी या शिळांची चाचणी होणार आहे. त्यानंतर रस्त्याने हे दगड अयोध्येला रवाना होतील.

नमिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार 100 चित्ते:

 • नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून 100 चित्ते भारतात आणण्यात येणार आहे.
 • यासंदर्भात भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 • गेल्या वर्षी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते.
 • दक्षिण आफ्रिका आणि भारत सरकार यांच्यात 100 चित्ते भारतात आणण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 • या करारानुसार दरवर्षी 10 ते 12 चित्ते भारतात पाठवले जाणार आहेत.
 • यापैकी पहिल्या 12 चित्यांची एक तुकडी 15 फ्रेब्रुवारी रोजी भारतात पोहोचेल.

टी20 तसेच वन डे क्रमवारीत टीम इंडिया नंबर-1:

 • मंगळवारी इंदोर मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने एक नवा विक्रमही केला.
 • भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत नंबर-1 बनला आहे, तो टी20 क्रमवारीत आधीच नंबर-1 होता.
 • या तीन सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला न्यूझीलंड क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.
 • न्यूझीलंड 111 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

2023च्या महिला टी20 विश्वचषकात पंच आणि सामनाधिकारी म्हणून महिलांना स्थान:

 • आयसीसी जागतिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत आगामी आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 साठी सर्व महिला सामनाधिकार्‍यांच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे.
 • क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा एक भाग म्हणून पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या प्रमुख स्पर्धेसाठी महिला 3
 • सामनाधिकारी आणि 10 पंच काम पाहतील.
 • आगामी वरिष्ठ महिला टी20 विश्वचषकात 13 महिला सामना अधिकारी असतील.
 • ही आकडेवारी सध्या चालू असलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषकातील नऊ महिला अधिकार्‍यांचा विक्रम मोडेल.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.