२६ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२६ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |26 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२६ जानेवारी चालू घडामोडी

महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’जाहीर:

  • प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त 901 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
  • यापैकी 140 पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
  • तर 93 पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे.
  • याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 668 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झालं आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे.
  • तसेच,चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 39 पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.
  • याशिवाय, 55 जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
  • हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते.
  • उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागीर संरक्षण पदक प्रदान केले जाते.
  • हे पदक 9 जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि 45 जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.

महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर:

  • भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
  • यावर्षीच्या पथसंचलनात 17 राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून 27 चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.
  • महाराष्ट्राने यापूर्वी 40 वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे.
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे.
  • या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणता येतील.
महाराष्ट्राच्या चित्ररथ

नौदलाच्या ‘या’ टेहळणी विमानाचे कर्तव्यपथावर ठरले पहिले आणि शेवटचे उड्डाण:

  • 26 जानेवारीला कर्तव्यपथावरुन संरक्षण दल, निमलष्करी दल, तसंच केंद्र सरकारच्या विविध तुकड्या संचलन करतात.
  • तसंच या संचलनाच्या शेवटी संरक्षण दलातील लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर हे कर्तव्यपथावरुन उड्डाण करत सलामी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
  • यावेळी झालेल्या संचलनात नौदलाच्या एका टेहळणी विमानाने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.
  • यावेळी त्या टेहळणी विमानाने कर्तव्यपथावरुन केलेले पहिले आणि शेवटचे उड्डाण ठरले.
  • या टेहळणी विमानाचे नाव आहे IL-38, हे नौदलाच्या सेवेतून गेल्या वर्षी, 17 जानेवारी 2022 ला निवृत्त झाले होते.
  • यानिमित्ताने एका vintage aircraft ने कर्तव्यपथावरुन उड्डाण केलं असंच म्हणावे लागेल.
  • रशियन बनावटीचे IL-38 हे टेहळणी विमान हे 1977 ला नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते.
  • अशी एकूण पाच विमाने दाखल झाली होती, 2002 ला झालेल्या एका अपघातात दोन विमाने नौदलाने गमावली होती.
  • असं असलं तरी भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या अथांग समुद्रावर नजर ठेवण्याचे काम हे या IL-38 टेहळणी विमानाच्या माध्यमातून केले जात होते.
  • एका दमात 13 हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची किंवा सलग 13 तास उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता होती.

26 जानेवारी रोजी हलवा या सोहळ्याचे आयोजन होणार आहे.

26 जानेवारी रोजी, बजेट नियोजन प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पारंपारिक “हलवा” या सोहळ्याचे आयोजित केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या पाच दिवस आधी हलवा समारंभ होतो. अर्थसंकल्पाची गोपनीयता जपण्यासाठी वित्त मंत्रालयाचे प्रशासकीय केंद्र एक प्रकारचे “फोर्ट नॉक्स” मध्ये बदलते. माहिती लीक होण्यापासून रोखण्यासाठी, जे अधिकारी बजेटवर काम करत आहेत ते त्यांच्या कार्यालयात “लॉक इन” करतात आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःला वेगळे करतात.
या काळात, फोन कॉल्सचे निरीक्षण केले जाते, कर्मचार्‍यांना इमारत सोडण्याची परवानगी नाही आणि त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटेलिजेंस ब्युरोच्या नजरेखाली राहणे आवश्यक आहे. नॉर्थ ब्लॉकचे तळघर, ज्यामध्ये 1980 ते 2020 पर्यंतचे बजेट दस्तऐवज तयार करणारे विशेष प्रिंटिंग प्रेस देखील आहे, हे अनेक दशकांपासून हलवा समारंभाचे ठिकाण आहे.

26 जानेवारी रोजी हलवा या सोहळ्याचे होणार आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२६ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.