२७ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२७ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |27 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२७ जानेवारी चालू घडामोडी

महिला आयपीएलसाठी पाच संघ! पहिल्याच लिलावात BCCI ला मिळाले तब्बल ४६६९ कोटी रुपये; पुरुषांच्या आयपीएलचे सर्व रेकॉर्ड मोडले

  • बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएलसाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
  • नेमकं काय म्हणाले जय शाह – ”आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनसाठी लिलाव पार पडला. या लिलावाने पहिल्या पुरुष आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. तसेच या लिलावाद्वारे बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले असल्याचेही ते म्हणाले.
  • बीसीसीआयकडून नवीन पाच फ्रँचायझींची घोषणा – दरम्यान, पहिल्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआयकडून पाच संघांसाठी फ्रेंचायझींची घोषणा करण्यात आली. यावेळी अहमदाबाद संघासाठी अदानी स्पोर्ट्सलाइनने यशस्वी बोली लावली. त्यांनी अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी तब्बल १२८९ कोटी रुपये मोजले. तर मुंबई संघासाठी इंडियाविन स्पोर्टस् ने ९१२.९९ कोटी रुपये, बंगळुरू संघासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटी रुपये, दिल्ली संघासाठी जेएस डब्लू जीएमआर क्रिकेट लि.ने ८१० कोटी रुपये, तर लखनऊ संघासाठी कॅपरी ग्लोबल होल्डिंगने ७५७ कोटी रुपये मोजले.

SAP तीन हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ, कंपनीने दिलं ‘हे’ कारण

  • जर्मनीची सॉफ्टवेअर कंपनी SAP वरही मंदीचा परिणाम झाला आहे. कंपनीने गुरूवारी ही घोषणा केली गेली आहे की कंपनीतून तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. SAP ही कंपनी वाल्डोर्फ आधारित समूह आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर आणि क्लाऊड आधारित कॉम्प्युटर सेवा पुरवणारी कंपनी आहे.या कंपनीने आता असं म्हटलं आहे की आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही टारगेटेड रिस्ट्रक्चरींगची योजना तयार केली आहे.
  • AFP ने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने २०२२ या वर्षाचा एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की SAP च्या अडीच टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. जगभरात SAP सोबत १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत.या सगळ्या संख्येची अडीच टक्के गृहीत धरली तर कंपनी साधारण ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे.
  • जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अशात ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही मोठ्या कपातीची घोषणा केली. अॅमेझॉन जवळपास १८ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. कंपनीत या निर्णयाचा मोठा फटका ई कॉमर्स आणि एचआर या विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना बसणार आहे असंही अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं.
  • अमेझॉनच्या सीईओने सांगितलं होतं की २०२३ च्या सुरूवातीपासून कपात होईल. याविषयी आम्ही चर्चा केली होती. अर्थात आम्ही जे कर्मचारी काढले जाणार असतात त्यांच्याशी चर्चा करत नाही. आमच्या एका सहकाऱ्याने ही माहिती बाहेर लिक केली होती असंही त्यांनी सांगितलं.

नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध; किती आहे किंमत

  • करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते आज वितरण करण्यात आलं.
  • इन्कोव्हॅकला २०२२ मध्ये मिळाली मान्यता : इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती. ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे. यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात. तसेच १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना ही लस घेता येणार आहे.
  • किती असेल किंमत – भारत बायोटेकने विकसित केलेल्या या लसीची किंमत सरकारी रुग्णालयात प्रति मात्रा ३२५ रुपये, तर खाजगी रुग्णालयांत प्रति मात्रा ८०० रुपये असणार आहे. तसेच या लसीच्या नोंदणीसाठी कोविन ॲपवर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं

  • भारत देश आज आपला ७४ वा गणतंत्र दिवस साजरा करतो आहे. हेच औचित्य साधत दिल्लीतल्या कर्तव्य पथावर गणतंत्र दिवसाची कवायत पार पडली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतल अल सिसी हे या वर्षी गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे होते. या वर्षीचा गणतंत्र दिवस खास होता. राफेल या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं आजच्या सोहळ्यात पाहण्यास मिळाली.
  • काय काय घडलं आज दिवसभरात?
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्यासह कार्यक्रमच्या ठिकाणी पोहचल्या. गणतंत्र दिवसाची कवायत सुरू करण्यासाठी त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आपल्या देशाची शक्ती सगळ्या देशाने पाहिले. कर्तव्य पथ या पथाचं नाव आधी राजपथ असं होतं. आज याच ठिकाणी सैन्याच्या तिन्ही दलांचं संचलन पार पडलं.
  • या कवायतीची सुरूवात इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या एका कवायतीने झाली. यामध्ये इजिप्तच्या सशस्त्र दलांचं प्रतिनिधीत्व करणारे १४४ सैनिक सहभागी झाले होते. केंद्रीय राखी पोलीस दलाच्या महिलांच्या तुकडीनेही कवायत केली. एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात नौदलाच्या तीन महिला आणि सहा अग्नीवीर सहभागी झाले होते. न्यूज १८ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
  • परेडमध्ये रशियन बनावटीचा एकही टँक नव्हता
    आत्मनिर्भरता हाच आदर्श आहे हे वाक्य सार्थ ठरवण्यात आल्याचं कवायतीत दिसलं. आज कवायतीत रशियाचा एकही टँक नव्हता. भारतात निर्मिती करण्यात आलेले अर्जुन आणि आकाश या क्षेपणास्त्र या कवायतीत सहभागी झाली होती. तसंच भारतीय निर्मितीची अनेक शस्त्रही या परेडमध्ये दाखवली गेली
  • आजच्या दिवसाच्या औचित्याने संपूर्ण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा गणतंत्र दिवस विशेष आहे कारण आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि त्याच दरम्यान हा दिवस आपण साजरा करतो आहोत. माझी इच्छा आहे की आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट केली पाहिजे.

झाकीर हुसेन, सुधा मूर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा; पाहा यादी

  • भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

७ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार

  • केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कारांपैकी ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये १९ मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये २ एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

९ जणांना पद्मभूषण, ९१ जणांना पद्मश्री

  • एकूण ९ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. यामध्ये सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला या मान्यवरांचा समावेश आहे. तर ९१ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये आरआरआर चित्रपटाचे संगीतकार कीरावानी, अभिनेत्री रविना टंडन आदींचा समावेश आहे.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर

मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
दिलीप महालनाबीस (मरणोत्तर)
झाकीर हुसेन
एसएम कृष्णा
श्रीनिवास वर्धन
बालकृष्ण दोशी

icc क्रमवारीत शुबमन गिलची उडी:

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपुष्टात आली आहे.
  • या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि सलामीवीर शुबमन गिलने वेगवान फलंदाजी केली.
  • गिलने या मालिकेत 360 धावा करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली.
  • या कामगिरीचा फायदा गिलला आयसीसी क्रमवारीत मिळाला आहे.
  • यात गिल आता सहाव्या स्थानावर आला आहे.

सूर्यकुमार ठरला क्रिकेटर ऑफ द इयर 2022:

  • भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव फॉर्मात आहे.
  • त्याने गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या होत्या.
  • सूर्यकुमार यादवची ICC ने 2022 सालच्या ‘पुरुष टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’पुरस्कारासाठी निवड केली आहे.
  • सूर्या ‘द-स्काय’ टी20 मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
  • सूर्याला ICC पुरूष क्रिकेटपटू ऑफ द इयर 2022चा पुरस्कार मिळाला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.