Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ जानेवारी चालू घडामोडी

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी

 • राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पाचवी आणि आठवीचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले असून, १२ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे.
 • शिष्यवृत्ती परीक्षा ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा असते. पूर्वी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात होती. मात्र त्यात बदल करून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यभरात प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा विद्यार्थिसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
 • यंदा पाचवी आणि आठवीच्या मिळून ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२१ मध्ये पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी, आठवीच्या २ लाख ४४ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी २०२२ मध्ये पाचवीच्या ४ लाख १८ हजार ५३, आठवीच्या ३ लाख ३ हजार ८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ४९३ आणि आठवीच्या ३ लाख ६७ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
 • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह बैठका घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा पाया घातला जात असल्याने ही परीक्षा महत्त्वाची आहे. याबाबतची जागृती पालक आणि शिक्षकांमध्ये झाल्याने विद्यार्थिसंख्या वाढलेली आहे.

‘एमपीएससी’च्या सदस्य नियुक्तीमध्ये विदर्भावर अन्याय?

 • शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील (एमपीएससी) दोन सदस्यांच्या नियुक्तीची सोमवारी घोषणा केली. परंतु, यात विदर्भाला प्रतिनिधित्व नाकारण्यात आले आहे. सरकारने पुन्हा एकदा विदर्भाच्या पदरी भोपळा टाकल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात काम करू शकतील, असे तज्ज्ञ विदर्भात नाहीत काय, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था असून येथील सदस्यांची नियुक्ती ही राज्य सरकारकडून अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना आहे. मागील दोन वर्षांपासून आयोगावर सदस्य नेमताना विदर्भावर कायम अन्याय केल्याचे दिसून येते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व नाकारल्यानंतर आता ‘एमपीएससी’ सदस्य नियुक्तीमध्येही अन्याय केल्याचा आरोप होत आहे. सोमवारी डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची ‘एमपीएससी’च्या सदस्यपदी निवड करण्यात आली. यापूर्वी अध्यक्ष व दोन सदस्यांची निवड झाली होती. अध्यक्ष किंवा एकही सदस्य  विदर्भातील नाहीत.   लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या विदर्भाच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत, अशी ओरड अनेकदा केली जाते. त्यात आता सदस्य नियुक्तीमध्येही अन्याय झाल्याचे दिसून येते.
 • आक्षेप काय?
  आयोगावर डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव या तीन सदस्यांची पहिल्यांदा निवड करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष म्हणून किशोर दत्तात्रय राजे-िनबाळकर यांची नियुक्ती झाली. आता पाचही सदस्य व अध्यक्ष हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ‘नागपूर करारा’प्रमाणे महाराष्ट्रातील तीन विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळतील, असे ठरले होते. परंतु, आता अध्यक्ष किंवा एकही सदस्य हा विदर्भातला नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या विदर्भाला कितपत मिळणार, अशी शंका विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी उपस्थित केली आहे.
 • लोकशाही म्हटले की सगळय़ा लोकांचे प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेत असणे आणि दिसणे आवश्यक आहे. ते नसेल व लोकांना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर तो अन्याय आहे. विदर्भाला आयोगामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही हा नागपूर कराराचा भंग आहे. रोजगाराशी ही बाब जुळलेली असतानाही विदर्भावर अन्याय केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वर होणार संरक्षण दलातील स्त्री सामर्थ्याचं दर्शन

 • Republic Day 2023 प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणारी परेड म्हणजे आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन असतं. यामध्ये आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचंही दर्शन घडतं. गेली काही वर्षे या परेडमध्ये महिला लष्करी अधिकारीही सन्मानाने सहभागी होत आहेत एवढेच नव्हे तर नेतृत्वही करत आहेत. आपल्या देशाची ही गौरवशाली परंपरा याही वर्षी सुरुच राहणार आहे.
 • यावर्षीही महिला अधिकारी महत्त्वाच्या तुकड्यांचं नेतृत्व करणार आहेत. आकाश या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचं यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सादरीकरण होणार आहे आणि याचं नेतृत्व करणार आहेत लेफ्टनंट चेतना शर्मा . क्षेपणास्त्र तुकडीचं नेतृत्व पहिल्यांदाच महिला अधिकारी करणार आहेत. तर लेफ्टनंट डिंपल भाटी या भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हील्स मोटरसायकल टीममध्ये बाईक राईडर म्हणून सहभागी असतील. डिंपल या कोअर ऑफ सिग्नल्स या रेजिमेंटमध्ये आहेत. तर भारतीय नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत या परेडमध्ये १४४ नौसैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करतील.
 • आकाश हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचं म्हणजे ‘मेड इन इंडिया’ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम आहे. अर्थातच ‘आकाश’ भारतीय संरक्षण दलासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संचलनाची ही जबाबदारी मिळाल्यानंतर लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी साहजिकच आनंद व्यक्त केला आहे. चेतना शर्मा या सध्या भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये तैनात आहेत. शत्रूच्या विमाने आणि ड्रोनपासून भारतीय हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी या रेजिमेंटकडे आहे.
 • प्रजासत्ताक दिनी राजधानीतील संचलनात सहभागी होता यावे हे अनेकांचं स्वप्नं असतं. पण अत्यंत कठोर मेहनत केल्यानंतरच काहीजणांचं हे स्वप्नं पूर्ण होतं. दरवर्षी आपण टीव्हीवर हे संचलन पाहायचो, मात्र आपल्याला ही संधी नक्कीच कधीतरी मिळेल असं वाटत होतं. यावर्षी ही संधी मिळाल्यानं या स्वप्नाची पूर्तता झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया चेतना शर्मा यांनी व्यक्त केली आहे. या संचलनामध्ये आपल्या युनिटीचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एकाच वेळी एक कोटी ‘५ जी’ मोबाइल संचांची यशस्वी चाचणी; स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाची पुढील वर्षी निर्यातही

 • एकाच वेळी एक कोटी ‘४ जी’ व ‘५ जी’ मोबाइल संच हाताळण्याची क्षमता स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचनेमध्ये असून त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा सहावा देश बनला असून पुढील वर्षांपासून ‘५ जी’चे तंत्रज्ञान प्रणाली निर्यात केली जाणार आहे.
 • अमेरिका, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया आणि चीन या पाच देशांनी स्वत:ची दूरसंचार तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. त्यातही जागतिक बाजारपेठेत स्वीडनची एरिक्सन, फिनलंडची नोकिया, चीनची हुआवै आणि दक्षिण कोरियाची सॅमसंग या चार कंपन्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. या देशांच्या दूरसंचार तंत्रज्ञानाशी स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली स्पर्धा करू शकेल, अशी ग्वाही केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली.
 • केंद्र सरकारच्या आर्थिक साह्यातून ‘सी डॉट’ आणि टाटा समूहातील ‘टीसीएस’ यांच्या संयुक्त प्रकल्पातून देशातील दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘बीएसएनएल’ कंपनीद्वारे २०२३ मध्ये देशभर ‘४ जी’ व ‘५ जी’ दूरसंचार सेवा पुरवली जाणार आहे. ही सेवा कार्यान्वित करण्यापूर्वी तंत्रज्ञान प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञान संरचना एकाच वेळी एक कोटी दूरध्वनी हाताळू शकते. ही चाचणी यशस्वी झाली असून आता वर्षभरात ५० हजार ते ७० हजार मोबाइल टॉवर उभारले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गांधीनगरमध्ये सोमवारी ‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या ‘बी-२०’ कार्यक्रमात दिली. 

हिमाचल प्रदेशने 53 वा राज्यत्व दिन साजरा केला.

हिमाचल प्रदेशने 53 वा राज्यत्व दिन साजरा केला.

हिमाचल प्रदेश 25 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण राज्यात आपला 53 वा राज्यत्व दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहे. 1971 मध्ये, या दिवशी हिमाचल प्रदेश भारताचे 18 वे राज्य बनले. पूर्ण राज्यत्व दिनाचा राज्यस्तरीय सोहळा हमीरपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता, जिथे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि विविध तुकड्यांनी सादर केलेल्या मार्चपास्टमधून सलामी घेतली.

केंद्र सरकारने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम डिजिटाइज करण्यासाठी U-WIN लाँच केले.

सरकारने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम डिजिटाइज करण्यासाठी U-WIN लाँच केले.

Co-WIN प्लॅटफॉर्मच्या यशानंतर, सरकारने आता नियमित लसीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक नोंदणी सेट करण्यासाठी त्याची प्रतिकृती तयार केली आहे. U-WIN नावाने, भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचे (UIP) डिजिटायझेशन करण्याचा कार्यक्रम प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी महाबाहू ब्रह्मपुत्रेवर लो कार्बन क्रूझला हिरवा झेंडा दाखवला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी महाबाहू ब्रह्मपुत्रेवर लो कार्बन क्रूझला हिरवा झेंडा दाखवला.

भारत ऊर्जा सप्ताह 2023 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बेंगळुरू येथे आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, भारत सरकार हरदीप एस. पुरी यांनी द्वारे समर्थित अंतर्देशीय जलवाहिनीच्या डेमो रनचे उद्घाटन केले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.