२४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२४ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२४ जानेवारी चालू घडामोडी

महिला ‘आयपीएल’मधील संघांच्या विक्रीतून ‘बीसीसीआय’ची ४००० कोटींची कमाई?

  • महिला इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पाच संघांचा लिलाव बुधवारी पार पडणार असून यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ४००० कोटी इतकी रक्कम अपेक्षित आहे.
  • महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाचे यंदा आयोजन केले जाणार असून यातील पाच संघांच्या खरेदीसाठी आघाडीचे उद्योग समूह उत्सुक आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रति संघामागे ५०० ते ६०० कोटी रुपयांची विजयी बोली लागण्याची शक्यता आहे. ‘‘महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा खूप मोठी आणि मौल्यवान ठरू शकते. प्रत्येक संघाच्या खरेदीसाठी किमान ५०० कोटी रुपयांची विजयी बोली लागू शकेल. ८०० कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता कमी आहे,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • महिला ‘आयपीएल’मध्ये संघ खरेदीसाठी ३० हून अधिक कंपन्या व फ्रेंचायझींनी पाच लाख रुपये किमतीची निविदा कागदपत्रे घेतली आहेत. यात पुरुष ‘आयपीएल’मधील दहाही संघ, तसेच अदानी समूह, टोरेंट समूह, हलदीरामचे प्रभूजी, काप्री ग्लोबल आणि आदित्य बिर्ला समूह यांसारख्या आघाडीच्या समुहांचा समावेश आहे. यातील काही समुहांनी २०२१ मध्ये पुरुष ‘आयपीएल’चे नवे दोन संघ खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता.

कार निर्मिती क्षेत्रातील दिग्गज फोर्ड कंपनी युरोपमध्ये तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

  • ‘मेटा’, ‘ट्विटर’, ‘स्नॅप’, ‘मायक्रोसॉफ्ट’, विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांनी याआधीच आपली कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर ‘अॅमेझॉन’ने दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. करोनानंतर अपेक्षित वृद्धीदर तेवढ्या वेगात न गाठल्याने या बड्या समाजमाध्यम, माहिती-तंत्रज्ञान, ई-वाणिज्य कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मंदीची चर्चा सुरू असताना या कंपन्या खर्च कमी करत आहेत. दरम्यान, हे टाळेबंदीचे वारे आता ‘आयटी’नंतर ‘ऑटो’ सेक्टरमध्येही शिरल्याचे दिसत आहे. कारण, अमेरिकेतील कार निर्मिती क्षेत्रातील नामांकीत असणाऱ्या फोर्ड कंपनीने युरोपमध्ये तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • फोर्ड कंपनीने युरोपमधून ३ हजार २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाहीतर कंपनीने काही प्रोजेक्ट युरोपमधून अमेरिकेत स्थलांतरित करण्याचाही निर्णय घेतला आहे.
  • यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विकास कामातील अडीच हजार नोकऱ्या आणि प्रशासकीय कामातील ७०० नोकऱ्या काढू इच्छित आहे. फोर्ड कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जर्मनीतील लोकांना बसणार आहे. फोर्ड कंपनी युरोपमध्ये जवळपास ४५ हजार लोकांना रोजगार देते.

GoMechanic नं केली ७० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा –

  • गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये थेट गुगलपासून अॅमेझॉनपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. त्यातच या वर्षी जून महिन्यात मंदी येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल सर्विसिंगची सेवा पुरवणाऱ्या GoMechanic या स्टार्टअपनं तब्बल ७० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी कंपनीची धोरणं आणि चुकीचे आर्थिक अंदाज जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

हिजाबप्रकरणी लवकरच त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी; सरन्यायाधीशांचे संकेत

  • कर्नाटकमधील शाळांत हिजाबबंदी करण्याच्या निर्णयाला आव्हान करणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठातील न्यायमूर्तीनी यापूर्वी परस्परविरोधी निकाल दिला आहे.
  • कर्नाटकमधील शाळांत ६ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असल्याने या खटल्यात आता अंतरिम आदेशाची गरज आहे, असे ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. व्ही. रामासुब्रमणियन, न्या. जे. बी. पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या पीठाच्या निदर्शनास आणले. त्या म्हणाल्या की, काही इयत्तांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार असून त्या सरकारी शाळांत होतील. त्यासाठी विद्याथ्र्यिनींना तेथे जावे लागणार आहे. हे लक्षात घेता या खटल्यात न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची गरज आहे.
  • त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही हे तपासून पाहू. हे प्रकरण त्रिसदस्यीय पीठाचे काम आहे. त्यासाठी तारीख दिली जाईल.हिजाब प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने गतवर्षी १३ ऑक्टोबरला परस्परविरोधी निकाल सुनावला होता. त्यामुळे हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी यापेक्षा मोठय़ा पीठापुढे ठेवावे, असेही या न्यायमूर्तीनी म्हटले होते. न्या. हेमंत गुप्ता गुप्ता यांनी हिजाबबंदीविरोधातील याचिका फेटाळण्याचा, तर न्या. सुधांशू धुलिया यांनी हिजाबबंदी अयोग्य असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला हिजाबबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सध्या लागू होतो.

१९४७ चे रेल्वे तिकिट व्हायरल! भारत-पाकिस्तानच्या रेल्वे प्रवासाची किंमत वाचून व्हाल थक्क

  • भारत-पाकिस्तान देशाच्या संबंधित अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असो वा सीमेवरील चकमक, या घडामोडींविषयी बातम्या वाचणं लोकांना आवडतं. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठीही लाखोंच्या संख्येत क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये बसलेले दिसतात. अशातच आता भारत-पाकिस्तानच्या एका नव्या गोष्टीमुळं चर्चेला तोंड फुटलं आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून गाड्यांचे जुने बिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही एका जुन्या रेल्वे तिकिटाच्या व्हायरल पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे हे रेल्वे तिकिट भारत देशाच्या स्वातंत्र्य काळातील आहे. भारत-पाकिस्तानचं हे रेल्वे तिकिट १९४७ चे आहे. त्यावेळी नऊ प्रवाशांनी पाकिस्तानच्या रावलपिंडी येथून अमृतसरला जाण्यासाठी हे तिकिट काढलं होतं.
  • व्हायरल झालेल्या तिकिटाचे दर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावेळी ९ लोकांसाठी रेल्वेचे तिकिट दर फक्त ३६ रुपये होते. या जून्या रेल्वे तिकिटाला पाकिस्तानच्या रेल लवर्स नावाच्या एका फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. पाकिस्तान रेल लवर्सने तिकिटाचं फोटो शेअर करुन म्हटलंय, “१७-०९-१९४७ ला स्वातंत्र्यानंतर ९ लोकांसाठी दिलेल्या एका रेल्वे तिकिटाचा फोटो..रावलपिंडी ते अमृतसरसाठी, ज्याची किंमत ३६ रुपये ९ पैसे आहे. भारतात आलेल्या एका कुटुंबियांचं हे रल्वे तिकिट असण्याची शक्यता आहे. हे रेल्वे तिकिट थर्ड एसी क्लासचं असल्याने, या तिकिटाची किंमत पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे:

  • 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाते.
  • यानिमित्त सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठय़ा बेटांना परमवीर चक्र विजेत्या सुरक्षादल अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले.
  • दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या नेताजी राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन केले.

INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल:

  • नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
  • या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
  • मुंबईत माझगाव डॉकयार्ड कलवरी मार्गातील पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.
  • डॉकयार्ड बांधलेल्या कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला अशा चार पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या होत्या.
  • आता यामध्ये INS Vagir च्या रुपाने पाचव्या पाणबुडीची भर पडली आहे.
  • सहावी आणि कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी वगशीर INS Vagsheer पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या सुरु असून एप्रिल 2024 मध्ये अखेरपर्यंत ती नौदलात दाखल होईल असा अंदाज आहे.
  • या पाणबुडीची लांबी सुमारे 67 मीटर असून उंची 12 मीटर एवढी आहे, एकुण वजन सुमारे 1700 टन एवढे आहे.
  • कलवरी वर्गातील इतर पाणबुड्यांप्रमाणे ही पाणबुडीही डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर कार्यरत रहाते.
  • एका दमात 12 हजार किलोमीटर अंतर पार करु शकते, समुद्रात जास्तीत जास्त 50 दिवस सलग संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे.
  • पाण्याखालील लक्ष्याचा भेद करण्यासाठी पाणतीर (torpedo) तर पाण्यावरील किंवा जमिनीवरील लक्ष्याला भेदण्यासाठी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.
INS Vagir

फुटबॉल सामन्यात प्रथमच पांढऱ्या कार्डचा वापर:

  • फुटबॉलमध्ये नियमभंगासाठी आतापर्यंत पंच पिवळे आणि लाल कार्ड वापरतात हे सर्वश्रुत होते.
  • पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर फुटबॉलमध्ये प्रथमच शनिवारी पोर्तुगाल येथील एका स्थानिक सामन्यात केला.
  • पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमधील बेन्फिका विरुद्ध स्पोर्टिग लिस्बन या सामन्यात पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर केला.
  • फुटबॉलमध्ये कार्ड दाखवण्याची परंपरा 1970च्या विश्वचषक स्पर्धेपासून सुरू झाली.
  • परंतु पंचांनी पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
  • खेळातील नैतिक मूल्य सुधारण्यासाठी आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक करण्यासाठी सामन्यादरम्यान पंचांकडून पांढऱ्या कार्डचा वापर केला जातो.

मेरी कोम देखरेख समितीचीही अध्यक्ष:

  • भारताची तारांकित बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समिती भारतीय कुस्तीगीर महासंघाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार असून, महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशीही करणार आहे.
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी याबाबतची घोषणा केली.
  • कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त शासकीय समितीत मेरीसह ऑलिम्पिकपटू कुस्तीगीर योगेश्वर दत्त, माजी बॅडिमटनपटू तृप्ती मुरगुंडे, केंद्र सरकारच्या लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजनेचे (टॉप्स) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन, क्रीडा प्राधिकरणाच्या माजी संचालिका राधिका श्रीमन यांचा समावेश आहे.

भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या संघात स्थान:

  • आयसीसीने 2022 मधील पुरुषांचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर केला आहे.
  • यामध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
  • विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही स्थान मिळाले आहे.
  • इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोस बटलरला आयसीसीच्या सर्वोत्तम टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

महिला टी-20 टीम ऑफ द इयर 2022 ची घोषणा:

  • आयसीसीने सोमवारी महिला टी-20 टीम ऑफ द इयर 2022 ची घोषणा केली.
  • या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
  • त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
  • या संघात निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.