Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |23 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२३ जानेवारी चालू घडामोडी
अॅटलेटिको माद्रिदचा विजय
- खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या बळावर अॅटलेटिको माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉलमध्ये व्हालाडोलिड संघावर ३-० असा विजय मिळवला. अॅटलेटिको माद्रिदने सामन्यातील सर्व गोल हे पहिल्या सत्रात झळकावले.
- सामन्याच्या सुरुवातीपासूनच अॅटलेटिकोने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला त्यांच्या अलवारो मोराटाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पाच मिनिटांनी अनुभवी अँटोइन ग्रिझमनने (२३ व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाची आघाडी दुप्पट केली. मारिओ हेरमोसोने सामन्याच्या २८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा व्हालाडोलिडला चकवत गोल केला व संघाला ३-० अशा सुस्थितीत पोहोचवले.
- मध्यांतरापर्यंत संघाने आपली ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात व्हालाडोलिडने आपला बचाव भक्कम केला, मात्र त्यांना अॅटलेटिकोच्या बचावाला भेदण्यात अपयश आले. परिणामी, अॅटलेटिको माद्रिदने अखेपर्यंत आघाडी कायम राखत विजय नोंदवला.
राज्यातील ५२० हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक
- राज्यभरातील ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे. लोकसत्ताने पदोन्नतीबाबत वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला होता, हे विशेष.
- राज्य पोलीस विभागात कार्यरत असलेल्या २०१३ अर्हता परीक्षा उत्तीर्ण ५२० हवालदारांच्या पदोन्नतीबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने गृहमंत्रालयाकडून परवानगी घेतल्यानंतर १२ जुलैपर्यंत माहिती मागवण्यात आली होती. महासंचालक कार्यालयातून निवड केलेल्या हवालदारांची यादीही प्रकाशित केली होती. त्या सर्व हवालदारांची वैद्यकीय चाचणी आणि अन्य प्रक्रिया आटोपली होती. पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीच्या आदेशावर सही करून पदोन्नतीचा आदेश काढण्याची प्रक्रिया बाकी होती. ही प्रक्रिया रखडल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयात खळबळ उडाली.
- केवळ एका सहीसाठी पदोन्नती अडल्याचे लक्षात येताच पोलीस महासंचालकांनी हालचाली करीत सकारात्मक पाऊल उचलले. गेल्या १९ जानेवारी रोजी राज्यभरातील ५२० हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच पदोन्नतीची यादी जाहीर होणार असल्यामुळे राज्यभरातील पोलीस हवालदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांचे अर्ज; पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६८ हजार उमेदवार
- police recruitment students पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, बीटेक, एमकॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनीही आणि ६८ तृतीयपंथीयांनीही अर्ज केले आहेत.
- राज्य पोलीस दलातील १८ हजार ३३१ पदांसाठी सुमारे १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. पण तब्बल सहा लाख ३९ हजार ३१७ पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात कला व वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. याशिवाय विज्ञान शाखेतून पदवी संपादन केलेल्या तरुणांनीही अर्ज केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांनीही या भरतीसाठी अर्ज केले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.
- दरवर्षी ५५ टक्के अर्ज पदवीधर अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे असतात. पण या वर्षी हे प्रमाण कमी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य पोलिसांनीही संबंधित बदल संकेतस्थळावर केले असून त्यानंतर तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ६८ तृतीयपंथीयांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. मुंबईतही ७ हजार ७६ पदांसाठी भरती होत असून यासाठी सुमारे सहा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
चीनमध्ये तीन वर्षांनंतर चांद्र नववर्षांचे सोहळे; करोना निर्बंध हटविल्याने उत्साह
- चीन सरकारने आपले कठोर ‘शून्य कोविड धोरण’ हटवल्यानंतर रविवारी चीनी नागरिकांनी चांद्र नववर्ष उत्साहात साजरे केले. यावेळी प्रार्थनास्थळांत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. करोना महासाथीमुळे गेल्या तीन वर्षांपासून साजरा न झालेला हा सण यंदा मोठय़ा प्रमाणावर होत आहे.
- विशेष म्हणजे चांद्र नववर्षांरंभानिमित्त चीनमध्ये वार्षिक सुट्टी दिली जाते. चीनमध्ये साजरे होणाऱ्या या नवीन वर्षांत, प्रत्येक वर्षांचे नाव चिनी राशीच्या बारा चिन्हांनुसार ठेवले जाते. हे ‘सशाचे वर्ष’ आहे. चीनच्या बहुतेक भागांमध्ये करोना प्रतिबंध शिथिल केल्यानंतर टाळेबंदी आणि प्रवासबंदीची चिंता नसल्याने अनेक जण त्यांच्या आप्त-स्वकीय आणि कुटुंबीयांना पुन्हा भेटण्यासाठी त्यांच्या गावी रवाना झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी राजधानी बीजिंगमध्ये मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. या उत्सवानिमित्त चीनमध्ये सार्वजनिकरित्या साजरा केल्या जाणाऱ्या वसंतोत्सवाचे पुनरागमन झाले आहे .
- बीजिंगमध्ये, अनेक भाविकांनी लामा मंदिरात प्रात:कालीन प्रार्थना केली. परंतु महासाथीच्या आधीच्या दिवसांपेक्षा गर्दी कमी होती. तिबेटी बौद्ध संकेतस्थळाने सुरक्षेच्या कारणास्तव या मंदिरात प्रतिदिनी ६० हजार जणांना परवानगी दिली आहे. त्यासाठी आगाऊ आरक्षण आवश्यक आहे. दरम्यान नवीन वर्षांसाठी टैओरेंटिंग पार्क पारंपारिक चिनी कंदिलांनी सजवलेले असूनही खाद्यपदार्थाच्या दुकानांतील उलाढाल सामान्य स्थितीत सुरू नाही. याशिवाय, बदाचू पार्क येथील लोकप्रिय मंदिराची जत्रा या आठवडय़ात परत सुरू होणार आहे. परंतु डिटान पार्क आणि लॉन्गटन लेक पार्कमध्ये अद्याप पूर्ववत उत्सवाची प्रतीक्षा आहे. हाँगकाँगमधील वर्षांतील पहिली अगरबत्ती लावण्याच्या लोकप्रिय विधीसाठी शहरातील सर्वात मोठे ताओवादी मंदिर असलेल्या वोंग ताई सिन मंदिरात भाविकांची झुंबड उडाली होती. महासाथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा लोकप्रिय विधी स्थगित करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीशांचे कौतुक; प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याचा मुद्दा
- सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कौतुक केले.
- ‘‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचीही सूचना केली आहे. अनेक लोकांना विशेषत: तरुणांना मदत करणारा हा प्रशंसनीय विचार आहे.’’, असे मोदी यांनी नमूद करत चंद्रचूड यांच्या मुंबईतील कार्यक्रमाची चित्रफित ट्वीट केली.
- ‘‘भारतात विविध भाषा आहेत. याद्वारे आपल्या संस्कृतीच्या चैतन्याबरोबर जोडता येते. केंद्र सरकार भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सारख्या विषयांचे मातृभाषेत शिक्षण देण्याचा पर्यायाचा समावेश आहे,’’ असे मोदी यांनी अन्य एका ट्वीटमध्ये नमूद केले. न्यायालयीन निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून सामान्यांना दिलासा देण्याचा पंतप्रधानांनी यापूर्वी वेळा आग्रह धरला आहे.
फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्षे! या निर्णयाला कडाडून विरोध का होतोय?
- फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारविरोधात दहा लाखांपेक्षा अधिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मॅक्रॉन सरकारने नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ तयार केली असून या योजनेमध्ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्षे करण्यात आले आहे. त्याशिवाय संपूर्ण निवृत्तिवेतनासाठी आवश्यक सेवाकाळाचा अवधीही वाढविला आहे. फ्रान्सच्या नागरिकांचा या योजनेला तीव्र विरोध असून त्याविरोधात जनआंदोलन उसळले आहे.
- फ्रान्स सरकारची नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ काय आहे?
फ्रान्स सरकारने निवृत्तिवेतन कायद्यात सुधारणा केली असून नवी निवृत्तिवेतन योजना तयार केली आहे. या योजनेनुसार निवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. सध्या फ्रान्समध्ये ६२ वर्षे वयोमान पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. मात्र आता त्यात दोन वर्षांची वाढ करण्यात आली असून आता निवृत्तीची मर्यादा ६४ वर्षे करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण निवृत्तिवेतन पाहिजे असल्यास आवश्यक सेवाकालही वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान एलिजाबेथ बोर्न यांच्या मतानुसार २०२७पासून संपूर्ण निवृत्तिवेतानासाठी ४३ वर्षे काम करणे आवश्यक असेल. सध्या किमान सेवाकाल ४२ वर्षे आहे. फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे, की काम करणारे आणि सेवानिवृत्त यांच्यातील गुणोत्तर कमी झालेले असून ते वाढविण्यासाठी निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार सरकार करत आहेत. यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरच फ्रान्सच्या प्रतिनिधीगृहात तो मांडला जाणार आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा:
- सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्काराबाबतची माहिती देण्यात आली आहे.
- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
- आरोग्य सेवा प्रभावीपणे देणे, आरोग्य उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
मोहम्मद शमीने रचला नवा विक्रम:
- टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या संघाने न्यूझीलंडला अवघ्या 108 धावांत गुंडाळले.
- टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या वनडेत शानदार गोलंदाजी केली.
- त्याने न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना पॅव्हेलियमध्ये पाठवले.
- 3 विकेट्ससह,शमीने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली.
- हे करत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक वेळा 3 विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
- अजित आगरकरने टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 3 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
- जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानावर आहे. झहीर खान तिसऱ्या स्थानावर आहे.
- मोहम्मद शमी आणि अनिल कुंबळे यांनी 29 वेळा ही कामगिरी केली आहे.
टीम इंडिया ठरला जगातील पहिलाच देश:
- भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे.
- हा सामना खेळण्यासाठी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर उतरताच भारताने एक नवा किर्तीमान निर्माण केला.
- कारण भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे,ज्याने वेगवेगळ्या 50 क्रिकेट स्टेडियमवर वनडे सामने आयोजित करण्याचा पराक्रम केला आहे.
- भारत हा जगातील पहिला देश आहे,जिथे 50 मैदानांवर एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत.
- यातील बहुतांश मैदानांवर भारतीय संघ खेळला आहे.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २२ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २१ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २० जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १९ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १८ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |