२९ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२९ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२९ सप्टेंबर चालू घडामोडी

आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल:

 • ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
 • कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. आर वेंकटरामनी यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त करताना राष्ट्रतींना आनंद होत आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे ९१ वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे.
 • याआधी माझे वाढते वय पाहता आगामी काळात ही जबाबदारी पार पडणे मला शक्य होणार नाही, असे वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला कळवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आर वेंकटरामनी यांची अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्ती केली आहे.

लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख:

 • निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्ट. जन. चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस असतील. यासोबतच केंद्राच्या संरक्षणविषय विभागाचे ते सचिवही असतील. जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते. बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल ४० वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्ट. जन. चौहान यांची नियुक्ती जाहीर केली. काश्मीर खोरे आणि इशान्येकडील राज्यांमधील फुटिरतावाद्यांविरोधात अनेक मोहिमांचे चौहान यांनी नेतृत्व केले आहे.
 • लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे २०२१मध्ये निवृत्त झाले. तत्पुर्वी मेजर जनरल असताना उत्तर आघाडीवर बारामुल्ला इथे लष्कराच्या पायदळाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. याखेरीज लष्करी मोहिमांचे महासंचालक म्हणून अनेक मोहिमांमध्ये चौहान यांचे मार्गदर्शन राहिले आहे. या प्रदीर्घ कारकीर्दीत चौहान यांना परमविशिष्ट सेवापदक, उत्तम युद्ध सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवापदकाने गौरवांकित करण्यात आले आहे. सीडीएस पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर चौहान यांना जनरलपदाचा दर्जा प्राप्त होईल, असे संरक्षणदलातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 • जबाबदारी काय – लष्कर, नौदल आणि वायूदलामध्ये समन्वय करून देशाच्या एकूण सैन्यदलास बळ देण्याची मुख्य जबाबदारी संरक्षण दलप्रमुखावर असते. याखेरीज उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी आघाडय़ांची फेररचना, मोहिमांवेळी आघाडय़ा आणि सैन्यदलांमध्ये समन्वय ठेवणे हेदेखील सीडीएसने करायचे आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ:

 • दसरा-दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. १ जुलै २०२२ पासून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही भत्तावाढ लागू होईल. ४१.८५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होईल.
 • बारा महिन्यांच्या महागाई निर्देशांकाच्या सरासरीने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली़  ही वाढ १ जुलैपासून लागू असल्याचे ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 • चार टक्के वाढीमुळे महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. महागाई भत्त्यातील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ६,५९१.३६ कोटींचा बोजा पडणार आहे. जुलैपासूनच्या पुढील आठ महिन्यांत हा बोजा ४,३९४.२४ कोटींवर जाईल.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राचे कबड्डी संघ उपांत्य फेरीत:

 • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला संघाने गटातील तीनही सामने जिंकले, तर पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात सेनादलाकडून पराभव पत्करावा लागला.
 • महिला संघाने बुधवारी तिसऱ्या सामन्यात बिहारचे आव्हान ३६-२० असे परतवले. या सामन्यात विश्रांतीला महाराष्ट्राकडे १५-१४ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या सायली केरिपाळेच्या बचावामुळे सामन्यात महाराष्ट्राने उचल घेतली आणि त्यानंतर पूजा यादवच्या अष्टपैलू खेळामुळे विजय मिळविला. पूजाने चढाई चमक दाखवताना बचावात पाच पकडीही केल्या.
 • सोनाली शिंगटे, स्नेहल शिंदे यांच्या चढाया आणि अंकिता जाधवचा बचावही महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेश-हरयाणा आमनेसामने येतील.
 • महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सेनादलाने महाराष्ट्रावर ४८-३८ अशी मात केली. या पराभवामुळे महाराष्ट्रासमोर आता उपांत्य फेरीत बलाढय़ हरयाणाचे आव्हान असेल. दुसरी उपांत्य लढत सेनादल आणि उत्तर प्रदेश यांच्यात होईल.

लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख:

 • निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 • लेफ्ट. जन. चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस असतील. यासोबतच केंद्राच्या संरक्षणविषय विभागाचे ते सचिवही असतील.
 • जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते.
 • बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल 40 वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्ट. जन. चौहान यांची नियुक्ती जाहीर केली.
 • काश्मीर खोरे आणि इशान्येकडील राज्यांमधील फुटिरतावाद्यांविरोधात अनेक मोहिमांचे चौहान यांनी नेतृत्व केले आहे.
 • लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे 2021मध्ये निवृत्त झाले.

आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल:

 • ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
 • 1 ऑक्टोबर 2022 पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
 • विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे 91 वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ:

 • दसरा-दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
 • 1 जुलै 2022 पासून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही भत्तावाढ लागू होईल.
 • 41.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होईल.

‘पीएफआय’वर बंदी:

 • ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने बुधवारी पाच वर्षांची बंदी घातली.
 • आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ‘पीएफआय’वरील बंदीबाबत निवेदन प्रसृत केले.
 • त्यात ‘पीएफआय’सह तिच्याशी संबंधित 8 संघटनांवरही बंदी घालण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

रेशन कार्ड धारकांना ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य:

 • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत तीन महिने वाढवण्यात आली आहे.
 • त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार आहे.
 • त्यामुळे 80 करोड नागरिकांना याचा लाभ घेता येईल.
 • ग्रामीण भागाला 75 टक्के तर शहरी भागाला 50 टक्के मोफत धान्य दिलं जाणार आहे.

अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव:

 • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आज अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे.
 • त्याशिवाय या चौकात एक 40 फूट आणि 14 टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं.
 • यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामीबीया देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आली आहे.
 • या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं आहे.
 • या चित्त्याचं संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे.
 • यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.
 • हे केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे.
 • या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात:

 • पुनरागमनवीर अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि हर्षल पटेल या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी व 20 चेंडू राखून मात केली.
 • अखेर त्यांनी चाचपडत 20 षटकांत 8 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली.
 • भारताने हे लक्ष्य 16.4 षटकांत गाठत विजयी सलामी दिली.

दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप:

 • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 143 धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे.
 • हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 3-0 असा व्हाईटवॉश देणाचा पराक्रम प्रथमच केला.
 • या खेळीसह हरमनप्रीतने अनेक विक्रम मोडले आणि आता आयसीसी नेही तिच्या या खेळीची दखल घेत आज जाहीर केलेल्या महिलांच्या एकदिवसीय खेळाडू क्रमवारीत हरमनप्रीतचे प्रगती झाली आहे.
 • सलामीवीर स्मृती मंधाना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमावारीत आगेकूच केली आहे.
 • मंधानाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात अनुक्रमे 40 व 50 धावा केल्या त्याच्या जोरावर ती एक स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
 • टी20 च्या मध्ये फलंदाजांमध्ये मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अॅमेझॉनने राजस्थानमध्ये 3 सोलर फार्मची योजना आखली

– Amazon ने घोषणा केली की ते राजस्थानमध्ये 420 मेगावाट (MW) च्या एकत्रित क्षमतेसह तीन सोलर फार्म उभारणार आहेत.
– ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी भारतात सोलर फार्मची योजना आखत असल्याची ही पहिलीच वेळ असेल.
– अॅमेझॉन भारतातील 14 शहरांमध्ये अतिरिक्त 4.09 मेगावॅट वीज निर्माण करण्याच्या क्षमतेसह 23 नवीन सौर रूफटॉप प्रकल्प उभारणार आहे.
– यामुळे 19.7 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेसह देशातील सौर रूफटॉप प्रकल्पांची संख्या 41 पर्यंत वाढेल.

ओडिशाने भारतातील पहिला आदिवासी समुदाय आधारित ज्ञानकोश प्रकाशित केला

– 26 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते “ओडिशातील आदिवासींच्या विश्वकोश” चे अनावरण करण्यात आले.
– ज्ञानकोश ओडिशाच्या अद्वितीय आणि जुन्या परंपरा आणि संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (SCSTRTI) आणि ओडिशा राज्य आदिवासी संग्रहालय यांनी विश्वकोश प्रकाशित केला.
– ओडिशातील लोकसंख्येच्या 22.85% आदिवासी आहेत.
– राज्यात एकूण ६२ आदिवासी समुदाय राहतात.

DRDO ने अतिशय कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या केल्या

– चाचणी उड्डाणाचे ठिकाण चांदीपूर, ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी होती.
– क्षेपणास्त्रे दुहेरी थ्रस्ट सॉलिड मोटरद्वारे चालविल्या जाणार्‍या कमी उंचीवरील हवाई धोक्यांना तटस्थ करण्यासाठी बनविली जातात.

– DRDO द्वारे प्रक्षेपित करण्यात आलेली क्षेपणास्त्रे सशस्त्र दलांना तांत्रिकदृष्ट्या वाढविण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

पश्चिम विभागाने दुलीप ट्रॉफी 2022 जिंकली

– 2022 दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम दिवशी पश्चिम क्षेत्राने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव करून त्यांचे 19 वे विजेतेपद पटकावले आहे.
– 2022 दुलीप ट्रॉफी हा दुलीप ट्रॉफीचा 59 वा हंगाम होता.
– दुलीप ट्रॉफीला त्याच्या प्रायोजकत्वासाठी मास्टरकार्ड दुलीप ट्रॉफी म्हणून देखील ओळखले जाते आणि ही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा देखील आहे.
– ही स्पर्धा मूलतः भारताच्या भौगोलिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांद्वारे लढवली गेली होती. पण 2016 पासून बीसीसीआयने ट्रॉफीसाठी संघांची निवड केली.

दुलीप ट्रॉफी 2022

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमनने पहिला राणी एलिझाबेथ II पुरस्कार जिंकला

– ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या गृहसचिव, सुएला ब्रेव्हरमन यांना लंडनमधील एका समारंभात पहिल्या-वहिल्या राणी एलिझाबेथ II वुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
– 42 वर्षीय बॅरिस्टर, ज्यांची या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी मंत्रिमंडळात नियुक्ती केली होती, त्यांनी सांगितले की आशियाई अचिव्हर्स अवॉर्ड्स (एएए) 2022 समारंभात नवीन भूमिका स्वीकारणे हा तिच्या जीवनाचा सन्मान आहे.
– ब्रेव्हरमन पूर्वी 2020-2022 दरम्यान ऍटर्नी जनरल होती.
– पुरस्कार, आता त्यांच्या 20 व्या वर्षात, सार्वजनिक नामांकनांद्वारे ब्रिटनच्या दक्षिण आशियाई समुदायातील व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेतात.
– 2000 मध्ये दक्षिण आशियाई लोकांच्या यूकेमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली होती.

सुएला ब्रेव्हरमनने पहिला राणी एलिझाबेथ

_GoI ने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली

– भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे, जे भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील.
– NDA माजी विद्यार्थी सप्टेंबर 2019 मध्ये पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि 31 मे 2021 रोजी सेवेतून निवृत्त होईपर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
– त्यांनी अनेक नियुक्त्या केल्या आहेत आणि जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

GoI ने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान

वरिष्ठ IAS अधिकारी राजेंद्र कुमार यांची ESIC महासंचालक म्हणून नियुक्ती

– वरिष्ठ नोकरशहा राजेंद्र कुमार यांची कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
– तामिळनाडू केडरचे 1992 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेले कुमार सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आहेत.
– कर्मचारी राज्य विमा महामंडळ हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मालकीच्या दोन मुख्य वैधानिक सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे.

बथुकम्मा: तेलंगणा उत्सव सुरू झाला

– तेलंगणामध्ये बथुकम्मा नावाने ओळखला जाणारा राज्य पुष्पोत्सव सुरू झाला असून त्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
– काल रात्री राजभवनात राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी विविध पार्श्वभूमीतील महिलांसोबत बथुकम्मा साजरी केली.

आशा पारेख यांना ५२वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार

– ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या प्राप्तकर्त्या म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्या या सन्मानाच्या 52व्या पुरस्कारप्राप्त होत्या.
– तिने 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि 1998-2001 पर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षा होत्या. तिला 1992 मध्ये भारत सरकारने सिनेमातील सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
– दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे.
– 1969 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली, हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारासाठी सर्वोच्च सन्मान आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.