२८ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२८ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 28 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२८ सप्टेंबर चालू घडामोडी

चंदीगड विमानतळाचे नाव बदलणार

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग यांच्या नावावर करण्याचा निर्णय जाहीर केला.
– स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून 25 सप्टेंबर 2022 रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– पंजाब सरकारने हरियाणाशी चर्चा करत चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग

_भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला

– टीम इंडियाने 23 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा T20 सामना जिंकला आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20 सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला.
– हैदराबादमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून संघाने ही उंची गाठली.
– सूर्यकुमार यादवला त्याच्या अर्धशतकासाठी “मॅन ऑफ द मॅच” म्हणून गौरवण्यात आले.

भारतीय हॉकीच्या माजी कर्णधाराची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड

– दिलीप तिर्की, माजी भारतीय हॉकी कर्णधार यांची 23 सप्टेंबर 2022 रोजी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
– टिर्की 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचाही सदस्य होता.
– हॉकी इंडियाच्या निवडणुका ऑक्टोबर 2022 मध्ये नियोजित होत्या, परंतु कोणत्याही पदासाठी उमेदवार नसल्यामुळे, अशा प्रकारे निकाल अगोदर जाहीर करण्यात आले.

दिलीप तिर्की, माजी भारतीय हॉकी कर्णधार

इटलीला पहिली महिला पंतप्रधान मिळाली

– 25 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनी निवडणूक जिंकली
– मेलोनी प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकली आणि तीही उजव्या विचारसरणीच्या सरकारची.
– जॉर्जिया मेलोनीने प्रबळ प्रतिस्पर्धी मारियो द्राघीचा पराभव केला.

इटली महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

झुलन गोस्वामी निवृत्ती

– दिग्गज महिला क्रिकेटपटू, झुलन गोस्वामीने 25 सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली.
– झुलनने 24 तारखेला लॉर्ड्सवर तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि तिने भारताच्या महिलांना एकदिवसीय मालिकेत इंग्लंडच्या महिलांना 3-0 ने पराभूत करण्यात मदत करून उत्कृष्ट कामगिरी केली.
– झुलनने 204 सामन्यांत 255 विकेट्स घेऊन तिच्या कारकिर्दीचा समारोप केला, जो एकदिवसीय महिलांचा विक्रम आहे.

दिग्गज महिला क्रिकेटपटू, झुलन गोस्वामी

ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन

– अमेरिकेतील ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी फ्रान्समध्ये निधन झाले.
– ती बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराची देखील प्राप्तकर्ता होती. तिच्या भूमिकांसाठी तिला दोन एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.

भारतातील पहिले हिमस्खलन-निरीक्षण रडार सिक्कीममध्ये स्थापित केले गेले

– भारतीय लष्कर आणि डिफेन्स जिओइन्फॉरमॅटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (DGRE) यांनी संयुक्तपणे उत्तर सिक्कीममध्ये भारतातील पहिल्या प्रकारचा हिमस्खलन मॉनिटरिंग रडार स्थापित केला आहे.
– हिमस्खलन शोधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या रडारचा वापर भूस्खलन शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

एम्स दिल्लीचे नवे संचालक म्हणून डॉ. एम श्रीनिवास यांची नियुक्ती

– एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कंपनी (ESIC) हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, हैदराबादचे डीन, डॉ एम श्रीनिवास यांची नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
– ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
– डॉ श्रीनिवास हे यापूर्वी एम्स-दिल्ली येथे प्राध्यापक होते. ते बालरोग शस्त्रक्रिया विभागात प्राध्यापक होते.

केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा:

 • मॅरेथॉन या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या शर्यतीमध्ये वर्षानुवर्षे वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या केनियाच्या एल्युड किपचोगेने रविवारी आपल्याच जागतिक विक्रमाला अर्ध्या मिनिटाने मागे टाकले. बर्लिन मॅरेथॉनमध्ये किपचोगेने ही कामगिरी केली. मॅरेथॉनसाठी अत्यंत पूरक असणाऱ्या हवामानात बर्लिनमध्ये तब्बल १२व्यांदा जागतिक विक्रमाची नोंद झाली. यात किपचोगेने चौथ्यांदा जागतिक विक्रमासह जेतेपद पटकावले. किपचोगेच्या या विलक्षण अशा विक्रमी मॅरेथॉन प्रवासाचा आढावा.
 • किपचोगेला धावण्याची सवय कशी लागली – लांब आणि मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत केनियाचे वर्चस्व आहे. किपचोगेलाही धावण्याची सवय शाळेपासूनच लागली. मात्र, शालेय जीवनात किंवा त्यानंतरही त्याने धावपटू होण्याचा विचार केला नव्हता. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज दोन मैल म्हणजे ३.२ किमी अंतर धावून जावे लागायचे. ही त्याची धावण्याची सवय त्याला पुढे कामी आली. वयाच्या १६व्या वर्षी किपचोगेला ऑलिम्पिक पदकविजेते पॅट्रिक सांग यांनी हेरले आणि त्याचा धावपटू बनण्याच्या प्रवासास सुरुवात झाली.
 • क्रॉसकंट्रीपासून सुरू झालेला किपचोगेचा प्रवास मॅरेथॉनपर्यंत कसा पोहोचला – किपचोगेने सर्वात प्रथम क्रॉसकंट्री शर्यतीत धावायला सुरुवात केली. जागतिक क्रॉसकंट्री शर्यतीत २००२मध्ये तो पाचवा आला. त्यानंतर किपचोगे पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत स्थिरावला होता. या स्पर्धा प्रकारात त्याने जागतिक स्पर्धेपासून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत अनेक पदके मिळविली. त्याने तीन हजार मीटर शर्यतीतही धाव घेतली. पण, तो या स्पर्धा प्रकारात फारसा रमला नाही.
 • पुढे त्याने ६ ऑक्टोबर २०१२मध्ये सर्वप्रथम अर्ध-मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पहिल्या वर्षी जागतिक स्पर्धेत तो सहावा आला. त्यानंतर २०१३मध्ये त्याने पूर्ण मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. यात हॅम्बर्ग मॅरेथॉनमधील त्याचे विजेतेपद पहिले ठरले. त्यानंतर त्याने तब्बल १५ वेळा मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत.

रुपयाच्या गटांगळ्या सुरूच; ऐतिहासिक नीचांकाच्या दिशेनं वाटचाल, ४० पैशांनी झाली घसरण:

 • गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकाही केली जात आहे. आर्थिक अडचणींचा परिणाम शेअर बाजारातही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रुपया दिवसेंदिवस अधिकच घसरत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला असून दररोज नवनवे नीचांक गाठताना दिसत आहे. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री रुपया इतर चलनांच्या तुलनेत कमी घसरल्याचा दावा करत असताना दुसरीकडे दररोज होणारी घसरण गुंतवणूकदार आणि आर्थिक विश्लेषकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे.
 • ४० पैशांची घसरण – बुधवारी रुपयानं तब्बल ४० पैशांची घसरण नोंदवली. त्यामुळे आत्तापर्यंतचा सर्वात नीचांकी दर रुपयानं आज गाठला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज सकाळी रुपयाचं मूल्य तब्बल ८१.९३ इतकं नोंदवलं गेलं. त्यामुळे प्रतीडॉलर ८२ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकाच्या दिशेनं रुपयाची वाटचाल सुरू असल्याचं या आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि पर्यायाने शेअर बाजारात चिंता पसरली आहे.
 • डॉलर वधारल्यामुळे सर्वच चलनांवर संकट – दरम्यान, डॉलरचा दर दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत असल्यामुळे जवळपास सर्वच देशातील चलनांसमोर संकट उभं ठाकलं आहे. यासंदर्भात डॉलरचं काही प्रमाणा अवमूल्यन घडवून आणण्यासाठी अमेरिका चलन करार करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, असा कोणताही विचार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचं अवमूल्यन अधिकच वेगाने होऊ लागलं आहे.
 • मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८१.५७ पैशांवर होता. मात्र, बुधवारी जवळपास ४० पैशांची घसरण होऊन थेट ८१.९३ वर पोहोचला. दरम्यान, मंगळवारी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी इतर देशांच्या चलनांशी रुपयाची तुलना करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.

देशात संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या पाहून बसेल धक्का; टक्का आणखी घसरला:

 • देशातील प्राचीन भाषा संस्कृतविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. भारतात संस्कृत केवळ २४ हजार ८२१ लोक बोलतात, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागाने दिली आहे. आग्र्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. देबाशिष भट्टाचार्य यांनी यासंदर्भात आरटीआय दाखल केली होती. देशातील बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उर्दू बोलली आणि समजली जाते, असेही या आरटीआयच्या उत्तरात सांगण्यात आले आहे.
 • भट्टाचार्य यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, २०११ च्या जनगणनेनुसार केवळ ०.००२ टक्केच लोक संस्कृत बोलतात, असे समोर आले आहे. संस्कृत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. संस्कृतला राज्यघटनेत अल्पसंख्याकांची भाषा म्हणून सूचीबद्ध केलेले नाही, असे भट्टाचार्य यांनी सांगितले आहे.
 • २०१० मध्ये उत्तराखंडने संस्कृतला राज्याची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित केले होते. असा निर्णय घेणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य आहे. संस्कृत भारतात क्वचितच बोलली जाते. तर दुसरीकडे संस्कृतसह इतर भाषांचे मिश्रण असलेली हिंदी भारताच्या बहुतांश भागात बोलली जाते. केंद्रीय हिंदी संस्थेकडून (KHS) संस्कृतसोबतच ब्रज, अवधी, भोजपुरीसह अन्य १८ भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती या संस्थेच्या भाषातज्ज्ञ डॉ. सपना यांनी दिली आहे. यासाठी तीन शब्दकोश तयार करण्यात आले आहेत. १५ शब्दकोशांवर काम सुरू आहे, असे सपना यांनी सांगितले आहे.
 • ९ सप्टेंबर २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या हमीरपूरच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. चंद्रभुषण त्रिपाठी यांनी संस्कृत भाषेत एका प्रकरणात निकाल दिला होता, अशी माहिती ‘इंडिया टुडे’ वृत्त वाहिनीला सामाजिक कार्यकर्ते समीर यांनी दिली आहे. न्यायाधीशांच्या या कृतीनंतर संस्कृत भाषा पुन्हा चर्चेत आली होती. डॉ. चंद्रभुषण त्रिपाठी यांनी संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. लोप पावत चाललेली संस्कृत भाषा दैनंदिन व्यवहारात आणण्यासाठी त्रिपाठी प्रयत्न करत आहेत.

भारतासह पाकिस्तानही अमेरिकेचा भागीदार; अमेरिकेची प्रतिक्रिया:

 • ‘भारत आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांकडे एकाच नजरेने अमेरिका पहात नाही. हे दोन्ही देश वेगवेगळय़ा प्रकारे अमेरिकेचे भागीदार मित्र आहेत,’ असा खुलासा अमेरिकेने केला आहे. पाकिस्तानला अमेरिकेने ‘एफ-१६’ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरची मदत दिल्याबद्दल, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी उपस्थित केलेल्या सवालानंतर अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने ही बाब स्पष्ट केली.
 • पाकिस्तानला ‘एफ-१६’ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेकडून दिली जाणारी ४५ कोटी डॉलरची मदत ही दहशतवादाशी लढण्यासाठी दिली जात आहे, या अमेरिकेच्या स्पष्टीकरणाबाबत परराष्टमंत्री जयशंकर यांनी भारत-अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की ‘एफ-१६’ या अत्याधुनिक विमानांचा वापर कुठे आणि कुणाविरुद्ध केला जातो, हे सर्वानाच ठाऊक आहे. असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही कुणाला मूर्ख तर बनवत नाही ना?
 • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, की भारत आणि पाकिस्तान आमचे वेगवेगळय़ा संदर्भात भागीदार आहेत. त्यांच्याकडे आम्ही एकाच नजरेने पहात नाही. भारताशी आमचे वेगळय़ा प्रकारचे संबंध आहेत. पाकिस्तानशी वेगळे नाते आहे. अनेक बाबतीत आमचे परस्परांशी वेगवेगळय़ा संदर्भातील हितसंबंध आहेत. या दोन्ही देशांचे परस्परसंबंध शक्य तितके सौहार्दपूर्ण असावेत, यासाठी आम्ही शक्यतो सर्व प्रयत्न करू इच्छितो.
 • अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने अफगाणी तालिबानी व हक्कानी नेटवर्क या दहशतवादी गटांना थारा दिल्याबद्दल ‘एफ-१६’ विमानांसंदर्भात मदत रोखली होती. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानची रोखलेली ही मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

आशा पारेख यांना फाळके पुरस्कार:

 • ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • ‘भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा सर्वोच्च पुरस्कार’ अशी ओळख असलेल्या या पुरस्काराची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली.
 • शुक्रवारी होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात 79 वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
 • आशा भोसले, हेमा मालिनी, पुनम धिल्लों, उदित नारायण, टी. एस. नागभरण या पाच मान्यवरांच्या समितीने पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
 • वयाच्या दहाव्या वर्षांपासून आशा पारेख यांनी आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला.
 • सुमारे पन्नास वर्षे अभिनय क्षेत्रातील त्यांची कारकीर्द गाजली. 95 पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले.
 • यापैकी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवाँ’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
 • 1992 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 • 2019 चा फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.