२७ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२७ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 27 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२७ सप्टेंबर चालू घडामोडी

इटलीत नव-फॅसिस्ट विचाराचे सरकार:

  • इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नव-फॅसिस्ट विचारधारेच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाने सर्वाधिक मते मिळवली आहेत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील पहिले अतिउजव्या विचारसणीचे सरकार स्थापन होणार असून ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील, असे सोमवारी स्पष्ट झाले.
  • इटली हा युरोपीय महासंघाचा संस्थापक सदस्य देश आहे. शिवाय, युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था अशीही त्याची ओळख आहे. त्यामुळे अतिउजव्या आणि युरोपीय महासंघाच्या वाढत्या अधिकारांच्या विरोधात असलेल्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या बाजूने निवडणुकीचा कल झुकल्याने संपूर्ण युरोपचे भू-राजकीय वास्तव बदलल्याचे मानले जाते.
  • उजव्या आघाडीला सुमारे ४४ टक्के मते मिळाली आहेत, त्यापैकी मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाने  २६ टक्के मते मिळवली आहेत.  युरोपमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी मेलोनी यांच्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे.

अमेरिकन गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यांना रशियाचं नागरिकत्व: 

  • अमेरिकन सरकार गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यांना रशियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्नोडेन यांना रशियन नागरिकत्व देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रशियात आश्रय घेतलेल्या स्नोडेन यांना रशियन नागरिकाचा दर्जा मिळाला आहे.
  • ३९ वर्षीय एडवर्ड स्नोडेन यांनी २०१३ साली अमेरिकन सरकार आणि गुप्तहेर संघटनांचे संवेदनशील कागदपत्रे लीक केली होती. देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन गुप्तहेर संघटना कशाप्रकारे महत्त्वाच्या लोकांवर पाळत ठेवत आहेत, याचा भंडाफोड स्नोडेन यांनी केला होता. यामुळे अमेरिकन सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली होती. या पेपर लीकनंतर स्नोडेन यांनी रशियात आश्रय घेतला होता.
  • हेरगिरी केल्याप्रकरणी स्नोडेन यांच्यावर अमेरिकन सरकारने देशद्रोहाचा दाखल केला आहे. या फौजदारी खटल्याला सामोरं जाण्यासाठी स्नोडेन यांना अमेरिकेच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी अमेरिकन अधिकारी मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.

शिवसेनेतील फूट प्रकरण – घटनापीठापुढे आज सुनावणी:

  • राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशींना आव्हान दिले असून, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्दय़ांवर शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी आणि प्रभू यांच्या मुख्य प्रतोदपदी  नियुक्तीस शिंदे आणि त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.
  • मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. बहुसंख्य आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याबरोबर असल्याने खरी शिवसेना आपलीच असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. या मुद्दय़ावर निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक २० ऑक्टोबरला:

  • मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) लांबणीवर पडलेली निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होणार असून निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
  • या कार्यक्रमानुसार ‘एमसीए’च्या निवडणुकीत १४ जागांचा निर्णय होईल. २० ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवरील ‘एमसीए’च्या कार्यालयात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक पार पडल्यानंतर दोन दिवसांनी ‘एमसीए’ची निवडणूक होणार आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ‘एमसीए’ने माजी अध्यक्ष आशीष शेलार यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.
  • ‘एमसीए’ निवडणुकीसाठी ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी माघारीची मुदत संपल्यानंतर १४ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल.
  • भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी ‘एमसीए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. विद्यमान अध्यक्ष विजय पाटील निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपाध्यक्ष अमोल काळे आणि मुंबई टवेन्टी-२० लीगचे कार्याध्यक्ष मिलिंद नार्वेकर हेसुद्धा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. सचिव संजय नाईक हे पुन्हा या पदासाठी उत्सुक असून त्यांना कार्यकारी परिषदेचे सदस्य अजिंक्य नाईक आव्हान देऊ शकतील.

चंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव:

  • महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.
  • आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
  • 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे.
  • या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून,चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती:

  • राहुल द्रविडवरचा विश्वास बीसीसीआयने पुन्हा व्यक्त करत त्याच्यावर आयपीएलमधील प्रमुख समित्यांची जबाबदारी सोपवली आहे.
  • आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. वि
  • आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.