२३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 23 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ सप्टेंबर चालू घडामोडी

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक:

  • नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले.
  • गौरवपदक, 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
  • अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.
  • आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते.
  • अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या 80 वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.
  • त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

कास पठारावर ‘ई-बस’, ‘बायोटॉयलेट’ सुविधा सुरू:

  • जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ‘ई-बस’ व ‘बायोटॉयलेट’ सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीद्वारे लोकार्पण झाले.
  • कास पठार नैसर्गिक रीत्या अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर आहे.
  • राज्य शासनाच्या नवीन महाबळेश्वरच्या योजनेतून कास पठारच्या विकासाला प्राधान्य राहणार आहे.
  • वॉक वे तसेच दर्शन गच्ची (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा करणे, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही होईल असे लोढा यांनी सांगितले.

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका भारताचा ऐतिहासिक मालिका विजय:

  • कर्णधार हरमनप्रीत कौरचे आक्रमक शतक आणि नंतर रेणुका सिंगच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 88 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
  • 23 वर्षांनंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरला.
  • पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हरमनप्रीतच्या आक्रमक शतकामुळे 5 बाद 333 अशी मोठी धावसंख्या उभारली.
  • यानंतर भारताने इंग्लंडला 44.5 षटकांत 245 धावसंख्येवर रोखले.
  • भारताने 1999 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी मालिका जिंकली होती.

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक:

  • नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा  लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.
  • आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते. करोनामुळे दोन वर्षे पदक वितरण सोहळय़ात खंड पडला होता. परंतु आता निर्बंध उठवल्याने यंदा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
  • अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.  आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात लीलया संचार केला आहे. सन १९७३ सालापासून १९९२ पर्यंत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
  • सन १९९६ ते २००० या कालावधीत पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूरसारख्या’ नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ‘झुलता पूल’, ‘मेमरीख् भजन’,‘सामना’ आदी एकांकिका, ‘बेगम बर्वे’, ‘शनवार-रविवार’,‘महानिर्वाण’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. नाटकातून अभिनय करण्याबरोबरच आळेकर यांनी काही मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. 

ज्युलियस बेअर बुद्धिबळ  स्पर्धा – अर्जुन, प्रज्ञानंदचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश:

  • अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद या भारताच्या युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाइन जलद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्जुन आणि प्रज्ञानंद यांनी प्राथमिक फेरीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने ३४ गुणांसह प्राथमिक फेरीत अग्रस्थान पटकावले. दुसऱ्या स्थानावरील अर्जुनच्या खात्यावर २५ गुण आणि तिसऱ्या स्थानावरील अमेरिकेच्या हान्स निमनचे २४ गुण होते.
  • पहिल्या दिवशी तीन विजयांची नोंद करणाऱ्या प्रज्ञानंदने २३ गुणांसह चौथे स्थान मिळवले. त्याने प्राथमिक फेरीत पाच लढती जिंकल्या आणि त्याच्या आठ लढती बरोबरीत सुटल्या. त्याला दोन लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला.
  • १९ वर्षीय अर्जुनला प्राथमिक फेरीच्या अखेरच्या दिवशी चांगला खेळ करण्यात अपयश आले. पोलंडच्या वोजताजेकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवल्यानंतर अर्जुनने व्हिन्सेन्ट केयमार आणि अनिश गिरी यांच्याविरुद्धचे सामने गमावले. भारताचा तिसरा बुद्धिबळपटू बी. अधिबन १६व्या आणि अखेरच्या स्थानावर राहिला.

विश्लेषण: राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे… वन्यजीव, वनस्पतींना खरेच फायदा होईल का:

  • राज्यात नुकतीच १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. या घोषणेनंतर महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्राची संख्या एकूण ५२ झाली आहे. तर १३ हजार ७०० चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित झाले आहे. संबंधित क्षेत्राची परिस्थिती, वन्यप्राणी, वनस्पती तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येतात. मात्र, निव्वळ घोषणा करून उपयोग नाही तर उद्देशपूर्तीच्या दृष्टीने पावले उचलली जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अभयारण्य आणि संवर्धन राखीव क्षेत्रातील फरक काय?

  • अभयारण्य जाहीर करणे आणि जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही अतिशय कठीण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्थानिकांची जमीन संपादित करावी लागते. त्यासाठी स्थानिकांना त्यांचा त्या जमिनीवरील हक्क सोडावा लागतो. त्यामुळे अभयारण्याच्या निर्मितीला विरोध होतो. तुलनेने संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर करण्याची आणि त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. त्यासाठी लोकांच्या जमिनी संपादित कराव्या लागत नाहीत. त्यांचे त्या जमिनीवरील हक्क अबाधित राहतात. त्यामुळे स्थानिकांचा याला फारसा विरोध होत नाही.

संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा कुणाला?

  • कॉरिडॉर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गांना किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या कवच क्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात येतो. या क्षेत्रात पर्यावरणासह वने व वन्यजीवांना हानीकारक उद्याेगांना किंवा विकास प्रकल्पांना मान्यता दिली जात नाही. तर ज्या उद्योग किंवा विकास प्रकल्पांमुळे नुकसान होणार नाही, त्यांना मान्यता दिली जाते. ज्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी देखील मदत होते.

संवर्धन राखीव क्षेत्राला प्राधान्य का?

  • अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या निर्मितीला स्थानिकांकडून होणाऱ्या विरोधासोबतच खात्यातील अधिकाऱ्यांचीही ती मानसिकता नसते. कारण त्यासाठी खासगी जमिनीच्या संपादनासोबत त्यांचे हक्कही डावलले जातात. ज्या राजकीय नेतृत्वाचा तो मतदारसंघ असेल ते नेतृत्व मग या विरोधात खात्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. हा राजकीय हस्तक्षेप हाताळताना त्यांचीही दमछाक होते आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हाती काहीच लागत नाही. तुलनेने लहान आकारांचे संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करणे सर्व दृष्टीने सोयीचे असते. अभयारण्य जाहीर करुन अंमलबजावणी जिकरीची होते, तर संवर्धन राखीव क्षेत्रात फार काही करावे लागत नाही.

संवर्धन राखीव क्षेत्राची गरज का?

  • पर्यावरण संतुलनासाठी एकूण भूभागाच्या ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे, पण केवळ २० टक्केच वनक्षेत्र शिल्लक आहे. यामुळे जैवविविधतेसोबतच वन्यप्राण्यांचा अधिवास नाहीसा होत आहे. राखीव व संरक्षित या दोन प्रकारात राज्यातील वनक्षेत्र विभागले आहे. यातील राखीव वने वनकायद्याअंतर्गत तर संरक्षित वने वन्यजीव कायद्याअंतर्गत संरक्षित असतात वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी पाच टक्के वनांना संरक्षित वनांचा दर्जा आवश्यक असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी संरक्षित वनांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. संवर्धन राखीव क्षेत्र त्यासाठी सहाय्यक ठरतात.

संवर्धन राखीव क्षेत्र ही पद्धत कुठे वापरली जाते?

  • १९९८च्या संयुक्त वनव्यवस्थापनाअंतर्गत स्थानिकांना जंगल संरक्षण आणि संवर्धन उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले. त्याचेच दुसरे रूप म्हणजे संवर्धन राखीव कायदा आहे. संरक्षित वनांभोवतालचे बफर क्षेत्र, जंगलांना जोडणारे मार्ग, वन्यप्राण्यांचे भ्रमण मार्ग आणि यातील वनक्षेत्र की ज्यांच्यावर स्थानिक लोक उपजीविकेसाठी अवलंबून आहेत आणि मालकी हक्क जनतेचे किंवा शासनाचे आहेत. अशा ठिकाणी वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी प्रामुख्याने संवर्धन राखीवक्षेत्र ही पद्धत वापरली जाते.

पुन्हा एकदा भारत–पकिस्तान आमनेसामने, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर:

  • महिला टी२० आशिया चषकाचे नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले असून बांगलादेशमध्ये १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. महिला टी२० आशिया चषक १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर १५ ऑक्टोबरला त्याचा अंतिम सामना असणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल. ७ ऑक्टोबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.
  • बांगलादेश मध्ये पुढील महिन्यापासून महिला टी२० आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर आशिया चषकमध्ये भारत-पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत.
  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या अत्याचाराला बळी पडत असलेल्या महिलांना तेथील सरकाने परवानगी नाकारल्याने अफगाणिस्तानचा महिला संघ आशिया चषक मध्ये खेळणार नाही. आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात १ ऑक्टोबरला होणार आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल भारताने UN पुरस्कार जिंकले

– भारताला त्याच्या “इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह” साठी युनायटेड नेशन्स (UN) पुरस्कार मिळाला आहे.
– हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाब हस्तक्षेप आहे.
– 21 सप्टेंबर 2022 रोजी UN जनरल असेंब्ली साइड इव्हेंटमध्ये, IHCI ला “2022 UN इंटरएजन्सी टास्क फोर्स आणि WHO स्पेशल प्रोग्राम ऑन प्रायमरी हेल्थ केअर अवॉर्ड” मिळाला.
– भारतातील चार प्रौढांपैकी एकाला उच्च रक्तदाब आहे यावरून या उपक्रमाचे महत्त्व ओळखले जाऊ शकते.
– प्राथमिक काळजी प्रणालीमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पुढाकार हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि पक्षाघातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यास हातभार लावेल.

व्हॅलेरी पॉलीकोव्ह, रशियन अंतराळवीर यांचे निधन

– व्हॅलेरी पॉलीकोव्ह, सोव्हिएत अंतराळवीर ज्याने अंतराळात सर्वात जास्त काळ एकट्याने राहण्याचा विक्रम केला, त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 19 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले.
– 8 जानेवारी 1994 रोजी, पोल्याकोव्हच्या अंतराळात 437 दिवसांचा विक्रम सुरू झाला, जेव्हा तो आणि इतर दोघांनी सोव्हिएत स्पेस स्टेशन मीरला दोन दिवसांच्या उड्डाणातून उड्डाण केले.
– जानेवारी 1994 ते मार्च 1995 या कालावधीत त्यांनी मीर अंतराळ स्थानकावर सलग विक्रमी 437 दिवस व्यतीत केले.
– वेगवेगळ्या मोहिमांचा भाग म्हणून त्याने एकूण 678 दिवस, 16 तास आणि 32 मिनिटे कक्षेत घालवले.
– पोल्याकोव्ह यांना रशियाच्या अंतराळ कार्यक्रमातील त्यांच्या सेवेबद्दल इतर अनेक पुरस्कारांसह हिरो ऑफ रशिया या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

व्हॅलेरी पॉलीकोव्ह, रशियन अंतराळवीर यांचे निधन

पद्मश्री आचार्य रामायतन शुक्ल यांचे निधन

– पद्मश्री पुरस्कार विजेते, संस्कृतचे अभ्यासक आणि काशी विद्वत परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. आचार्य राम यत्न शुक्ल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
– संस्कृत व्याकरण आणि वेदांत अध्यापन आणि आधुनिकीकरणाच्या नवीन पद्धती शोधण्यात त्यांच्या योगदानामुळे त्यांना “अभिनव पाणिनी” म्हणून ओळखले जाते.
– आचार्य रामयत्न शुक्ल यांचा जन्म 15 जानेवारी 1932 रोजी भदोही जिल्ह्यात, उत्तर प्रदेश (UP) येथे झाला.
– त्यांना “महामहोपाध्ये” ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
– सामाजिक कार्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
– त्यांनी अनेक पुस्तके आणि शोधनिबंध लिहिले आहेत. “व्याकरण दर्शने सृष्टी प्रक्रीया विमर्श” हे त्यांचे प्रमुख प्रकाशन आहे.

पद्मश्री आचार्य रामायतन शुक्ल

लिंडा फ्रुविर्तोव्हाने चेन्नई ओपन २०२२ चे विजेतेपद पटकावले

– झेक प्रजासत्ताकच्या १७ वर्षीय लिंडा फ्रुविर्तोव्हाने चेन्नई ओपन २०२२ WTA 250 टेनिस एकेरी जिंकण्यासाठी शानदार पुनरागमन केले.
– चेन्नई ओपन ही 14 वर्षात भारतात झालेली पहिली WTA स्पर्धा होती.
– दुहेरीत, ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्की या अव्वल मानांकित जोडीने एकतर्फी अंतिम फेरीत रशियन टेनिस फेडरेशनच्या अॅना ब्लिन्कोवा आणि जॉर्जियाच्या नटेला डझालामिडझे यांचा 6-2, 6-1 असा पराभव केला.

लिंडा फ्रुविर्तोव्हाने

सरकारने उद्योगपती रतन टाटा यांची पीएम केअर फंडचे विश्वस्त म्हणून नियुक्ती केली

– पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश केटी थॉमस आणि लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांची पीएम केअर्स फंडाचे विश्वस्त म्हणून नामांकन करण्यात आले आहे.

– पीएम केअर फंड कोविड-19 महामारी दरम्यान तयार करण्यात आला होता.
– महामारीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीला तोंड देणे आणि बाधित व्यक्तींना दिलासा देणे हे या निधीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
– या निधीमध्ये व्यक्ती/संस्थांच्या स्वैच्छिक योगदानाचा समावेश आहे आणि त्याला कोणतेही अर्थसंकल्पीय समर्थन मिळत नाही.

गोलकीपर्स ग्लोबल गोल अवॉर्ड्स 2022

– बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने त्यांच्या वार्षिक गोलकीपर मोहिमेचा एक भाग म्हणून 4 चेंजमेकर्सना 2022 गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड्स देऊन सन्मानित केले.
– हा पुरस्कार त्यांच्या समुदायांमध्ये आणि जगभरातील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) दिशेने प्रगती करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देतो.
– गेट्स फाऊंडेशनचा सहावा वार्षिक गोलकीपर अहवाल, “प्रगतीचे भविष्य” प्रसिद्ध झाला.


4 पुरस्कार विजेते

उर्सुला वॉन डर जर्मनी
लेयेन वैनेसा नकाते युगांडा
झाहरा जोया अफगाणिस्तान
डॉ. राधिका बत्रा भारत

गोलकीपर्स ग्लोबल गोल अवॉर्ड्स 2022

जागतिक गेंडा दिवस 2022

– गेंड्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस पाळला जातो.
– हा दिवस सुमात्रन, काळ्या, ग्रेटर वन-शिंग, जावान आणि पांढर्‍या गेंड्याच्या सर्व पाच प्रजातींचा देखील साजरा करतो.

– अनेक वर्षांपासून सुरू असलेली शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे गेंडे जंगलात गंभीरपणे धोक्यात आले आहेत.
– यंदाचा जागतिक गेंडा दिवस “फाइव्ह राईनो स्पीसीज फॉरेव्हर” या थीमखाली साजरा केला जाणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.