३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ सप्टेंबर चालू घडामोडी

बेरोजगारीचा दर 8.3% वाढला

बेरोजगारीचा दर 8.3% वाढला

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 8.3 टक्क्यांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला कारण रोजगार अनुक्रमे 2 दशलक्षने घसरून 394.6 दशलक्ष झाला. जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.8 टक्के होता आणि रोजगार 397 दशलक्ष होता, असे CMIE डेटा जोडले आहे.

“शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा सुमारे 8 टक्के जास्त असतो, जो साधारणपणे 7 टक्के असतो. ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर 9.6 टक्क्यांपर्यंत वाढला आणि ग्रामीण बेरोजगारीचा दरही 7.7 टक्क्यांपर्यंत वाढला,” CMIE चे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले. व्यास पुढे म्हणाले की, अनियमित पावसामुळे पेरणीच्या कामांवर परिणाम झाला आणि हे ग्रामीण भारतातील बेरोजगारी वाढण्याचे एक कारण आहे.

ऑगस्टमध्ये हरियाणामध्ये सर्वाधिक 37.3 टक्के बेरोजगारी होती, त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 32.8 टक्के, राजस्थानमध्ये 31.4 टक्के, झारखंडमध्ये 17.3 टक्के आणि त्रिपुरामध्ये 16.3 टक्के बेरोजगारी होती.
छत्तीसगडमध्ये सर्वात कमी ०.४ टक्के, त्यानंतर मेघालयात २ टक्के, महाराष्ट्रात २.२ टक्के आणि गुजरात आणि ओडिशामध्ये प्रत्येकी २.६ टक्के बेरोजगारी होती, असे आकडेवारीवरून दिसून येते.

अलप्पुझा हा पाचवा पूर्ण डिजिटल बँकिंग जिल्हा म्हणून घोषित

अलप्पुझा हा राज्यातील पाचवा संपूर्ण डिजिटल बँकिंग जिल्हा बनला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक केरळ आणि लक्षद्वीपचे प्रादेशिक संचालक थॉमस मॅथ्यू यांनी याबाबत घोषणा केली आहे.अलाप्पुझापूर्वी बँकिंग सेवा डिजिटल झाल्या ती ठिकाणे म्हणजे त्रिशूर, कोट्टायम, पलक्कड आणि कासारगोड. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया प्रकल्पाचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) आणि संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासकीय सहाय्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या प्रकल्पाचा पुढाकार घेतला होता.

अलप्पुझा हा पाचवा पूर्ण डिजिटल बँकिंग जिल्हा म्हणून घोषित

पश्चिम ओडिशामध्ये नुआखाई उत्सव साजरा

नुआखाई हा ओडिशातील वार्षिक कापणी उत्सव आहे. नुआखाई जवळ येत असलेल्या नवीन हंगामाचे स्वागत करण्यासाठी आणि हंगामाच्या नवीन तांदळाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. नुखाई हा गणेश चतुर्थीच्या एका दिवसानंतर साजरा केला जातो आणि तो ओडिशातील सर्वात प्रलंबीत सणांपैकी एक आहे. एका विशिष्ट वेळी समलेश्‍वरी देवीला नबान्न अर्पण करून हा सण साजरा केला जातो. नुआखाई हा दोन शब्दांपासून बनलेला आहे, नुआ म्हणजे नवीन आणि खाई म्हणजे अन्न. या सणाचा अर्थ कष्टकरी शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या हंगामातील नवीन तांदूळ साजरा करणे. ओडिशाच्या पश्चिम भागातील लोक नुआखाई उत्साहाने साजरे करतात.

पश्चिम ओडिशामध्ये नुआखाई उत्सव साजरा

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे; ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच:

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) ला खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे. ८५ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांचा पराभव केला. पूर्व बंगालचा माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी ३३ -१ अशा फरकाने विजय नोंदवत भुतिया यांचा पराभव केला.

कोण आहेत कल्याण चौबे

  • कल्याण चौबे हे भाजपाचे नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे हे भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघासाठी कधीही खेळले नाहीत. मात्र, काही वेळा ते भारतीय फुटबॉल संघाचा भाग होते. ते मोहन बागान आणि पूर्व बंगाल टीममध्ये गोलरक्षक म्हणून खेळले होते. विशेष म्हणजे भुतिया आणि चौबे हे दोघेही एकेकाळी पूर्व बंगाल संघात खेळाडू होते.
  • दरम्यान, कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी राजस्थान फुटबॉल असोसिएशनच्या मानवेंद्र सिंग यांचा २९-५ अशा फरकाने पराभव केला. तर अरुणाचल प्रदेशच्या किप्पा अजय यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गोपालकृष्ण कोसाराजूचा ३२-१ अशा फरकाने पराभव केला.

‘विक्रांत’ युद्धनौकेचे राष्ट्रार्पण; छत्रपती शिवाजी महाराज नौदलाच्या नव्या ध्वजाचे प्रेरणास्थान – मोदी:

  • संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरणाद्वारे राष्ट्रार्पण करण्यात आले. यामुळे अशा युद्धनौका निर्मितीची क्षमता असलेल्या मोजक्या राष्ट्रांत भारताचा समावेश झाला आहे. ‘‘विक्रांत हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अतुलनीय ‘अमृत’ आहे,’’ अशा शब्दांत मोदी यांनी या युद्धनौकेचे वर्णन केले.
  • या निमित्ताने मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या नव्या चिन्हांकित नौदल ध्वजाचे अनावरणही केले. ‘‘देशाने आज गुलामीचे प्रतीक असलेल्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझे झुगारले आहे,’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. कोचीच्या ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’मध्ये (सीएसएल) हा सोहळा झाला. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी नौदलाची पूर्वीची युद्धनौका ‘विक्रांत’ हिचे नाव या नव्या युद्धनौकेस देण्यात आले आहे.
  • ‘आयएनएस विक्रांत’ला छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करीत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. इतिहास बदलण्याचे काम आज झाले असून, भारताने गुलामीच्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझेच झुगारून दिले आहे. आजपासून भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला आहे. जुन्या ध्वजावर आतापर्यंत गुलामगिरीचे चिन्ह होते. पण आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा ध्वज समुद्रावर आणि आकाशात डौलाने फडकणार आहे.’’ नवे नौदल चिन्ह समृद्ध भारतीय सागरी वारशानुसार बनवण्यात येणार असल्याची घोषणा नौदलाने यापूर्वीच केली होती.
  • नव्या युद्धनौकेच्या वैशिष्टय़ांबाबत मोदी म्हणाले, की हे पाण्यावर तरंगणारे जणू एक शहर आणि हवाईतळ आहे. ‘आयएनएस विक्रांत’वर निर्माण होणाऱ्या विजेमुळे सुमारे पाच हजार घरांची गरज भागू शकेल. विक्रांत नौदल ताफ्यात सामील झाल्याने स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांच्या निर्मितीची क्षमता असलेल्या अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्ससारख्या देशांच्या निवडक गटांत भारताचा समावेश झाला.

अभिमानास्पद! नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण:

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचं सांगितलं.
  • कसा आहे नौदलाचा नवा ध्वज : नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.
  • छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.

पलायनानंतर गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, कोलंबो विमानतळावर पक्षातील नेत्यांकडून स्वागत:

  • श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे शुक्रवारी सात आठवड्यांनंतर मायदेशी परतले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकन जनतेने थेट राष्ट्रपती भवनात उग्र आंदोलन केल्यानंतर गोटाबाय यांनी कुटुंबासह थायलंडला पलायन केले होते. कोलंबो विमानतळावर दाखल होताच पक्षातील नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. देशातील खराब आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे.
  • गोटाबाय राजपक्षे यांनी १३ जुलैला पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह पलायन केले होते. श्रीलंकन हवाई दलाच्या विमानातून त्यांनी देश सोडला होता. देश सोडण्याआधीपासूनच राजपक्षे यांच्या राजीनाम्याची जनतेकडून मागणी होत होती. थायलंडला जाण्याआधी राजपक्षे यांनी सिंगापूरला आश्रय घेतला होता. सिंगापुरात आपले राजकीय उत्तराधिकारी रनिल विक्रमसिंघे यांची भेट घेत त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडींनंतर ७३ वर्षीय राजपक्षे बँकॉकमधून सिंगापूर हवाई मार्गे एका व्यावसायिक विमानातून मायदेशी परतले आहेत.
  • देश सोडल्यापासून ५२ दिवस थायलँडमधील एका हॉटेलमध्ये राजपक्षे राहत होते. अनेक दिवसांपासून मायदेशी परतण्यासाठी ते आग्रही होते. रनिल विक्रमसिंघे यांनी एकेकाळच्या राजकीय दृष्ट्या शक्तीशाली असलेल्या राजपक्षे कुटुंबीयांना संरक्षण दिल्याचा आरोप श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजपक्षे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. श्रीलंकेतील प्रसिद्ध वृत्त संपादक लसंथा विक्रममाटुंगे यांच्या हत्येच्या कथित आरोपानंतर राजपक्षे यांना या प्रकरणी अटक व्हावी, यासाठी पत्रकारांचा दबाव वाढला आहे.  “राजपक्षे यांच्या मायदेशी परतण्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना लवकरच शिक्षा होईल”, असे ‘श्रीलंका यंग जर्नलिस्ट असोसिएशन’चे प्रवक्ते थारिंदू जयावर्धाना यांनी म्हटले आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.