३ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ ऑक्टोबर चालू घडामोडी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – स्केटिंगमध्ये महाराष्ट्राला सांघिक सुवर्ण:

  • महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी स्केटिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच नौकानयन, कुस्ती, तिहेरी उडी, स्केटिंग, जलतरण या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी महाराष्ट्राला रौप्यपदकाची कमाई करून दिली. जिम्नॅस्टिक आणि कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कांस्यपदके मिळविली.
  • स्केटिंग स्पर्धेचा अखेरचा दिवस महाराष्ट्र संघासाठी सोनेरी ठरला. विक्रम इंगळे, सिद्धांत कांबळे, सुरुद सुर्वे व आर्य जुवेकर यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. आर्य जुवेकरने १००० मीटर स्केटिंग शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
  • महाराष्ट्राला नौकानयनात विपुल घाटे आणि ओंकार म्हस्के यांनी रौप्यपदक मिळवून दिले. त्यांनी पुरुषांच्या गटातील कॉक्सलेस दुहेरी प्रकारात दोन हजार मीटरचे अंतर सहा मिनिटे ४२ सेकंदांत पूर्ण केले. आशिया पदक विजेती मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी स्कलमध्ये अंतिम फेरी गाठली.
  • जलतरणातील १०० मीटर फ्री-स्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राने रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या संघात पलक जोशी, अनुष्का पाटील, दिवा पंजाबी, अवंतिका चव्हाण यांचा समावेश होता. इशिता रेवाळेने ४१.८० गुणांसह आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये कांस्यपदक मिळवले. पूर्वा सावंतने तिहेरी उडीत १२.७६ मीटर उडी मारताना कांस्यपदक जिंकले. बास्केटबॉल आणि खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. बॅडिमटनमध्ये उपांत्य फेरीत महाराष्ट्राला तेलंगणाकडून हार पत्करावी लागली.

देशात ‘५जी’ सेवा सुरू; संपूर्ण स्वदेशी प्रणालीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण:

  • देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. विशेष म्हणजे ही ‘५जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली. भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘‘आज १३० कोटी भारतीयांना ५जीच्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. यामुळे अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे मोदी म्हणाले.
  • ‘५जी’ प्रणालीचा वापर करून पंतप्रधानांनी युरोपमध्ये गाडी चालवली. गाडी स्वीडनमध्ये होती, तर तिचे नियंत्रण ‘आयएमसी’मधील एरिक्सन कंपनीच्या मंडपात होते. पंतप्रधानांनी तिथे बसून हजारो किलोमीटरवर असलेली गाडी चालवली. यानिमित्ताने ‘५जी’ प्रणालीच्या वेगाची चाचणी घेतली गेली.
  • उद्योगजगताकडून स्वागत – ‘५जी’ सेवेच्या रूपाने आपण सर्वसमावेशक डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया ‘सीआयआय’चे अध्यक्ष संजीव बजाज यांनी व्यक्त केली. तर अतिवेगवान इंटरनेट शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे आहे, असे ‘असोचेम’चे महासचिव दीपक सूद म्हणाले. ‘फिक्की’चे अध्यक्ष संजीव मेहता यांनी, ‘‘आता देशात व्यवसाय करणे आणि जगणे सोपे होणार आहे,’’ अस सांगितले

मोबाइलमध्ये कधी?

  • ‘भारती-एअरटेल’ने मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि वाराणसीसह आठ शहरांमध्ये लगेच सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले.
  • आघाडीच्या रिलायन्स ‘जिओ’ने चार महानगरांमध्ये याच महिन्यात सेवा सुरू होईल, असे जाहीर केले. ‘व्होडाफोन-आयडिया’ने मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.
  • ‘जिओ’ने डिसेंबर २०२३ पर्यंत, तर ‘एअरटेल’ने मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देश ‘५जी’च्या जाळय़ात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले.

भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश:

  • भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील केवळ एका शहराचा समावेश आहे. या शहराचं नाव आहे नवी मुंबई. या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत इंदोर सलग सहाव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत आहे. सुरतनेही स्वच्छ शहर म्हणून दुसरा क्रमांक पटकावण्यात हॅटट्रिक केली आहे. राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांनी २०२२ ची ही स्वच्छ शहरांची यादी शनिवारी (१ ऑक्टोबर) जाहीर केली.
  • देशाची राजधानी आणि सत्तेचं केंद्र असलेल्या दिल्लीची या यादीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील वर्षी या यादीत पाचव्या क्रमांकावर असणारं दिल्ली शहर यंदा म्हणजे २०२२ मध्ये नवव्या स्थानावर घसरलं आहे. २०२० मध्ये दिल्लीचा क्रमांक या यादीत आठवा होता.
  • स्वच्छ शहरांच्या यादीत दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. एक यादी एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे, तर दुसरी यादी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ एकाच शहराचा समावेश असला, तरी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – ऐश्वर्या मिश्राची विक्रमासह सुवर्णकमाई:

  • महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. स्केटिंगमध्ये श्रद्धा गायकवाडने, तर टेनिसमध्ये पुरुष संघाने सोनेरी यश मिळविले.
  • अ‍ॅथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्याने ५२.६२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. यासह ऐश्वर्याने बीनामोलचा (५२.७१सेकंद) अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. महाराष्ट्राच्या डांयड्रा व्हॅलेदारेसने (११.६२ सेकंद) महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव (१६ मिनिटे ३९.९७ सेकंद) पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची मानकरी ठरली.
  • स्केट बोर्ड प्रकारात श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदक मिळविले. उर्मिला पाबळे, शुभम सुराणाने रौप्यपदक पटकावले. निखिल शेलाटकरने कांस्यपदक जिंकले. आर्टिस्टिक कपल डान्स प्रकारात महाराष्ट्राच्या यशस्वी शाह व इलुरी कृ्ष्णा साई राहुल या जोडीने सुवर्णपदक मिळविले. खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आगेकूच कायम राखली.
  • टेनिसमध्ये महिला रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. तलवारबाजीत अजिंक्य दुधारे आणि गिरीश जकाते यांना कांस्यपदके मिळाली. कुस्तीत समीर पाटीलने ग्रीको-रोमनच्या ७७ किलो वजनी गटात एकमेव कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राला सायकिलगमधील पहिले पदक मयुरी लुटेने मिळवून दिले. महाराष्ट्र महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघाने २६३.६० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, सिद्धी हत्तेकर, मानसी देशमुख, सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.

शहर स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरा:

  • केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
  • तसेच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले.
  • ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.
  • त्यानुसार, ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत आपले पहिले स्थान मध्य प्रदेशने कायम राखले.
  • तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली.
  • दुसरीकडे शंभरहून कमी स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या श्रेणीत त्रिपुरा अव्वल ठरले.
  • स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

देशात ‘5जी’ सेवा सुरू:

  • देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘5जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले.
  • ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे.
  • विशेष म्हणजे ही ‘5जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली.
  • भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘5जी’ प्रणालीचे उद्घाटन केले.

मीराबाई चानूचे आणखी एक सुवर्ण:

  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय पोस्टर गर्ल मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले.
  • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले.
  • तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात 191 किलोचा भार उचलून ही किमया साधली.
  • ऑगस्ट 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले.
  • लक्षणीय बाब म्हणजे मीराबाई ही तिच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.

क्रिकेटचे हे नऊ नियम बदलले:

  • आयसीसी क्रिकेट समितीने एक ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पुरूषांबरोबरच महिला क्रिकेट समितीकडे देखील हे पाठवण्यात आले आहेत. त्यांनी देखील या शिफारसींचे समर्थन केले आहे.
  • फलंदाज झेलबाद – जर फलंदाज झेलबाद झाला तर नवीन फलंदाज स्ट्राइकवर येईल. जरी फलंदाजांनी झेल घेण्यापूर्वी एकमेकांना ओलांडले असेल. आता एखादा फलंदाज झेलबाद झाला की पुढचा चेंडू फक्त नवीन फलंदाजाला खेळावा लागेल.
  • चेंडूला लाळ लावण्यावर बंदी – चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी.
  • स्ट्राइक फंलदाजाने वेळ लावल्यास तो बाद – आता विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज व्हावे लागेल, तर टी20 मध्ये ही वेळ पूर्वीप्रमाणेच 90 सेकंद ठेवण्यात आली आहे.
  • खेळपट्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर एकही धाव दिली जाणार नाही – जर एखादा फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न करताना खेळपट्टीच्या बाहेर गेला तर तो चेंडू बाद चेंडू असेल आणि फलंदाजाला एकही धाव मिळणार नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-20 मालिका भारताला विजयी आघाडी:

  • सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलच्या फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी मात केली.
  • यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
  • भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.