३० जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |30 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० जानेवारी चालू घडामोडी

हॉकीसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतून ऑलिम्पिक पात्रता

 • या वर्षी होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा हॉकीसाठी ऑलिम्पिक पात्रता फेरी असेल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष इक्रम तय्यब यांनी रविवारी केली.
 • आशियाई क्रीडा स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसार गेल्या वर्षी चीनमध्ये हँगझू येथे होणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता या स्पर्धेचे आयोजन यंदा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत केले जाणार आहे. तय्यब ‘एफआयएच’चे अध्यक्ष असून हँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचे सदस्यही आहेत. आशियाई ऑलिम्पिक समितीचे प्रमुख भारताचे रणधीर सिंग या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.
 • ‘‘मी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचा सदस्य आहे. आशियाई स्पर्धा होणार यात शंका नाही,’’ असे तय्यब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘मार्चमध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्ण आढावा घेतला जाईल. सर्व केंद्र तयार असल्यामुळे नव्या तारखेनुसार स्पर्धा होण्यात काहीच अडथळे येणार नाहीत,’’ अशी माहितीही तय्यब यांनी दिली.
 • ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेतून नेहमीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळते. मात्र, या स्पर्धा एकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. चीनमधील करोनाच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या आयोजनाविषयी संदिग्धताच होती. परंतु, यातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे आता पात्रता फेरीसाठी वेगळय़ा कुठल्या स्पर्धेची गरज नाही,’’ असेही तय्यब यांनी सांगितले.

नोव्हाक जोकोविच १०व्यांदा बनला ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन, विजेतेपदाबरोबर केले नवीन विक्रम

 • गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. सर्बियाच्या टेनिस स्टारने वर्षभरानंतर शानदार पुनरागमन करत विक्रमी १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. रविवारी खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
 • जोकोविचने त्सित्सिपासला संधी दिली नाही – जोकोविचने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ असा घेतला. यानंतर त्सित्सिपासने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले पण जोकोविचने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ अशा फरकाने जिंकला. तिसर्‍या सेटमध्येही दोन्ही खेळाडू ६-६ ने बरोबरीत होते, त्यानंतर जोकोविचने टायब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि दहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
 • राफेल नदालशी बरोबरी केली – या विजेतेपदासह ३५ वर्षीय जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांच्या खात्यात आता २२-२२ जेतेपदे आहेत. निवृत्त रॉजर फेडरर २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचच्या २२ विजेतेपदांमध्ये १० ऑस्ट्रेलियन ओपन, २ फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.

जोकोविचनने अनेक विक्रम केले
पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू

 • २२- नोव्हाक जोकोविच
 • २२- राफेल नदाल
 • २०- रॉजर फेडरर
 • १४- पीट सॅंम्प्रास

विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार! भारताच्या लेकींच्या गौरवाचा नरेंद्र मोदी स्टेडियम होणार साक्षीदार

 • दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर १९ टी२० विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. यासोबतच या पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.
 • भारतीय महिलांनी अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी संघाचे ट्विट करून अभिनंदन केले. त्यात ते म्हणतात, “अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आमच्या युवा क्रिकेटपटूंनी देशाला अभिमान वाटावा अशी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या मोठ्या आणि आनंदाच्या प्रसंगामुळे तरुण महिला खेळाडू केवळ भारावून गेले नाहीत हे त्यांच्या जमिनीवर पाय घट्ट रोवून उभ्या असण्याचा स्वभाव दाखवून देतो.”
 • महिला विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार – भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. न्यूझीलंड सोबत सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी२० आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात ते म्हणतात,”मी शफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला आमंत्रित करतो. ती आणि तिचा विजयी संघ आमच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सहभागी होईल आणि १ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० चे साक्षीदार होईल. ही अतुलनीय कामगिरी साजरी करण्यासाठी निश्चितच उत्सवाची गरज आहे.”

एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ‘एमपीएससी’ने पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक विभागानुसार गुणवत्ता यादी (कट-ऑफ) जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने एकच विद्यार्थी सर्व विभागांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे.
 • ‘एमपीएससी’ने संयुक्त गट-ब आणि गट-क संवर्गातील ८,१६९ विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. लिपिक -टंकलेखक पदासाठी विभाग/प्राधिकारीनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या जाहिरातीत नमूद आहे. जाहिरातीत एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग/प्राधिकरण आहेत. यात अन्न व पुरवठा विभागात सर्वाधिक म्हणजे ११५३ जागा आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून निवड करू शकतात. 
 • त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करणार हे निश्चित आहे. आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक-टंकलेखक पदसाठी समान पूर्व परीक्षा घेणार आहे. मात्र, त्यांची गुणवत्ता यादी राज्यनिहाय जाहीर न करता ती विभागनिहाय जाहीर होणार आहे. परिणामी, गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच विभागामध्ये पात्र ठरतील. यामुळे त्यांच्या खालोखाल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतूनच बाद केले जाणार असल्याने त्यांना मुख्य परीक्षेची संधीच मिळणार नाही. याउलट राज्यनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केल्यास अन्य विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊन त्यांनाही मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने जाचक अटीमध्ये बदल करावा अशा मागणीचे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आयोगाला दिले आहे.
 • यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन आणि संदेशालाही उत्तर दिले नाही.

भारताच्या नसानसांमध्ये लोकशाही; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन

 • लोकशाही ही भारताच्या नसानसांमध्ये वाहत असून ती आपली संस्कृती आहे. गेल्या अनेक शतकांपासून लोकशाही आपल्या कार्यशैलीचे अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
 • केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया – द मदर ऑफ डेमोक्रसी’ या पुस्तकाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, की नैसर्गिकरीत्याच आपला समाज लोकशाहीवादी आहे. लोकशाहीची मातृभूमी या नात्याने आपण तिच्या मूल्यांबाबत नेहमी चर्चा केली पाहिजे आणि जगालाही ज्ञान दिले पाहिजे. यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल. 
 • इंडियन काऊंसिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चने हे पुस्तक संपादित केले असून त्यात जुन्या काळापासून देशात असलेल्या लोकशाही मूल्यांबाबत लेखांचा त्यात समावेश आहे.

जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो…

जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस (World Neglected Tropical Diseases Day) दरवर्षी 30 जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान म्हणून दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांबद्दल (NTDs) जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो जेणेकरून आपण त्यांच्या निर्मूलनाकडे प्रगती करू शकू. 2023 ची थीम “आता कार्य करा. एकत्र कृती करा. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांमध्ये गुंतवणूक करा”. हा दिवस ओळखण्याचा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरातीने मांडला होता.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.