६ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
६ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |6 February 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

६ फेब्रुवारी चालू घडामोडी

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

  • अंडर-१९ विश्वचषक २०२४ आता शेवटच्या आणि रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील ही चुरशीची लढत बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
  • अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ कोण असेल हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद लावतील, अशी आशा आहे.

सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला उपांत्य सामना मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होणार?

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या ३० मिनिटे आधी म्हणजेच दुपारी १ वाजता होईल.

उपांत्य फेरीची सामना कुठे बघता येईल?

  • तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्टवर आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचा उपांत्य सामना पाहू शकता. या सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील केले जाईल, जेथे तुम्ही या सामन्याचा पूर्णपणे विनामूल्य आनंद घेऊ शकता.

कर्ज काढून धनुष्य-बाण विकत घेतला पण तिरंदाजी सोडली नाही, अर्जुन पुरस्कार विजेती तिरंदाज आदितीचा प्रेरणादायी प्रवास वाचा!

  • अदिती गोपीचंद स्वामी ही महाराष्ट्रातील एक तिरंदाज आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून ती वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. त्याबरोबरच, जागतिक करंडक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली. याच स्पर्धेत तिने ज्योती सुरेखा वेण्णम आणि परनीत कौर यांच्या साथीने कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरला. २०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले. या यशानंतर ती एकदम प्रकाशझोतात आली. यानंतर तिला अर्जुन पुरस्कारही मिळाला.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साताऱ्यात अर्जुन पुरस्कार मिळवणारी अदिती ही तिसरी खेळाडू आहे. पहिला पुरस्कार ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना मिळाला होता. तर दुसरा पुरस्कार माणदेश एक्सप्रेस म्हणून ओळख असणारी धावपटू ललिता बाबर हिला मिळाला होता.
  • आदिती स्वामीच्या कुटुंबीयांवर साताऱ्यात कौतुकाचा वर्षाव झाला. वयाच्या १७ व्या वर्षी साताऱ्याच्या शेरेवाडी गावातील आदिती स्वामीने तिरंदाजी क्रीडा प्रकारात जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अन् गवसली तिरंदाजीतील आवड

  • साताऱ्याच्या शेरेवाडी या गावात राहणाऱ्या गोपीचंद स्वामी यांची आदिती ही कन्या. गोपीचंद हे सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत तर आई शैला ग्रामसेविका आहे. त्यांना स्वत:ला खेळाची अत्यंत आवड. त्या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा. आदिती १२ वर्षांची असताना गोपीचंद तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती, तर काही ॲथलेटिक्सचं प्रशिक्षण घेत होती. तर एका कोपऱ्यात काहीजण लक्ष्य ठरवून धनुष्य आणि बाणांची जुळवाजुळव करत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत होती. अदितीचे लक्ष तिकडेच होते. तिला हा खेळ आवडल्याचे गोपीचंद यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला तात्काळ तेथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. अदितीला क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी आपला मुक्काम गावातून सातारा शहरात हलवला.

शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी किती पदे? जाणून घ्या सविस्तर…

  • राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या जाहिराती शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खासगी अनुदानित शाळांतील पदांचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६७८ जागांवर शिक्षक भरती केली जाणार आहे.  
  • शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यमनिहाय जागांमध्ये सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यात मराठीसाठी १८ हजार ३७३, इंग्रजीसाठी ९३१, ऊर्दूसाठी १ हजार ८५०, हिंदीसाठी ४१०, गुजरातीसाठी १२, कन्नडसाठी ८८, तमिळसाठी ८, बंगालीसाठी ४, तर तेलुगूसाठी २ जागा उपलब्ध आहेत.  
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीचे बळकटीकरण करण्यासाठी साधन व्यक्ती नियुक्त करण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणे, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

वायूप्रदूषणामुळे २०५० पर्यंत कर्करोग रुग्णांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अंदाजानुसार २०५० पर्यंत जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. हा अहवाल प्रत्येकावर सारखाच परिणाम करत नसला, तरीही कर्करोगाच्या दरात अपेक्षित वाढ करणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणून हवा प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.कर्करोगावर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ ने कर्करोगाबाबत गंभीर इशारा दिला आहे. २०२२ च्या तुलनेत २०५० पर्यंत कर्करोगाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असे या संस्थेने म्हटले आहे.
  • २०५० मध्ये कर्करोगाची सुमारे ३.५ कोटी नवीन प्रकरणे उद्भवू शकतात. एक फेब्रुवारीला हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. कर्करोगाच्या या वाढत्या प्रमाणामागे तंबाखू सेवन, लठ्ठपणा, मद्यपान ही प्रमुख कारणे आहेत.
  • मात्र, त्याहीपेक्षा वायू प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. या देशांमध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे १४२ टक्के वाढ होऊ शकते. उच्च मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांमध्ये, सुमारे ४० लाख नवीन प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात. त्यामुळे कर्करोगाबद्दल जनजागृती आणि त्यावर लवकर उपचार करणे किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.या अहवालानुसार, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांवर याचा सर्वाधिक परिणाम होईल, कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूही याच देशांमध्ये होतील.

माजी पंतप्रधान नेहरूंनी खरंच भारतीयांना ‘आळशी’ म्हटलं होतं? वाचा १९५९ सालचं ‘ते’ भाषण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. तसंच, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १९५९ सालातील एका भाषणाचाही उल्लेख केला. त्यानुसार, पंडित जवाहरलाल नेहरू भारतीयांना आळशी समजत असत, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत काय म्हणाले?

  • “भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे”, म्हणजे नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत”, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून नेमकं काय म्हटलं होतं?

  • जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात लाल किल्ल्यावरून म्हटलं होतं की, “भारतीयांमध्ये कष्ट करण्याची सवय नाही. यात आपला दोष नाही, कधी कधी अशा सवयी तयार होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही. हे देश चमत्कारीतपणे एका रात्रीत विकसित झाले आहेत असं नाही. कठोर परिश्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे हे देश विकसित झाले आहेत.” इंडिया टुडेने या वि,यीचं वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधींबद्दल काय म्हणाले?

  • “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्य असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. आजच्या काँग्रेसकडे लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते”, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.