८ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 July 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ जुलै चालू घडामोडी

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच पालिका निवडणुका’

  • ग्रामपंचायती वगळता महान्पालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, असे  राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 
  • मतदार याद्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ५ तारखेला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. १ जुलै रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या निवडणुकांमध्ये वापरल्या जातील, असा त्यात उल्लेख करण्यात आला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिल्याने निवडणुकांची घोषणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले.

‘मेटा’च्या ‘थ्रेड्स’वर लाखोंच्या उडय़ा! ‘ट्विटर’शी स्पर्धा; पहिल्याच दिवशी दोन कोटींहून अधिक सभासद

  • शब्दसंवादावर भर देणारे चर्चापीठ म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाशी थेट स्पर्धा करणारे ‘थ्रेड्स’ हे नवीन समाजमाध्यम फेसबुक, इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने गुरुवारपासून कार्यान्वित केले. इलॉन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यापासून ट्विटरवर वारंवार होत असलेल्या बदलांना त्रासलेल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा ‘थ्रेड्स’चा प्रयत्न असून पहिल्या दिवशी अवघ्या १२ तासांत सव्वा दोन कोटी जणांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली.
  • प्रथमदर्शनी ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे. ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेच्या जवळपास दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, छायाचित्रे आणि पाच मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल. या वैशिष्टय़ांमुळे ‘थ्रेड्स’ ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून केलेली कामगार कपात, त्यावरील ओळख पडताळणीसाठीची मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे.  जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा ‘थ्रेड्स’ला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • थ्रेड्सचा इंटरफेस अतिशय साधा असून त्यामध्ये ट्विटरसारखी व्यक्तिगत संदेश देवाणघेवाण करण्याची सुविधा नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी हे अ‍ॅप कार्यान्वित झाल्यानंतर भारतासह ब्रिटनमध्ये पोस्ट प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.

ISROच्या महत्वकांक्षी Chandrayaan 3 मोहिमेची तारीख आणि वेळ ठरली…

  • अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेले काही महिने चर्चेत असलेल्या इस्रोच्या (ISRO) चांद्रयान ३ ( Chandrayaan 3 ) मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १४ जुलैला दुपारी दोन वाजून ३५ मिनीटांनी आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटा इथून चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार आहे. त्या दिवसाची आणि वेळेची घोषणा आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO ( indian space research organisation ) ने केली आहे.
  • इस्त्रोचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे LVM3-M4 हे महाकाय रॉकेट – प्रक्षेपक हे उड्डाणाच्या ठिकाणी Chandrayaan-3 ला घेऊन पोहचले आहे. आता लवकरच त्यामध्ये इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि हवामान अनुकूल असेल तर नियोजित वेळी रॉकेट गर्जना करत अवकाशात झेप घेईल.
  • Chandrayaan-3 चे उड्डाण हे जरी १४ जुलैला होणार असले तरी चंद्रावर उतरण्यासाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लॅडरनधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.